Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रलोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार प्रदान समारंभ यावर्षी ८ जून रोजी होणार...

लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार प्रदान समारंभ यावर्षी ८ जून रोजी होणार संपन्न. ( पत्रकार परिषदेत माहिती.)

लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार प्रदान समारंभ यावर्षी ८ जून रोजी होणार संपन्न. ( पत्रकार परिषदेत माहिती.)

आजरा.- प्रतिनिधी.

लोकशाहीर द ना गव्हाणकर पुरस्कार प्रदान समारंभ यावर्षी ८ जून रोजी गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे होत आहे. डॉ भारत पाटणकर यांच्या हस्ते आणि आ. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसंघर्ष मोर्चाच्या लढाऊ नेत्या प्रतिभा शिंदे यांना हा पुरस्कार दिला जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत पुरस्कार समितीचे अध्यक्ष जयंतराव शिंपी यांनी माहिती दिली.
पुरस्काराचे हे सातवे वर्ष असले तरी कोरोनाच्या काळात दोन वर्षे पुरस्कार न दिल्याने हा पाचवा पुरस्कार आहे. यापूर्वी हा पुरस्कार प्राच्यविध्यापंडीत डॉ आ. ह साळुंखे, प्रसिध्द आदिवासी कवी आणि सामाजिक कार्यकर्ते वाहरू सोनावणे, कॉम्रेड कृष्णा मेणसे, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना दिला गेला आहे. साहित्य, कला, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात लोकशाहीर द ना गव्हाणकर यांचा वारसा पुढे नेणाऱ्या कलावंत, विचारवंत, कार्यकर्त्याला हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार गुजरात महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात सातपुड्याच्या डोंगररांगातील आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांना देण्यात येत आहे.
या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे हा पुरस्कार लोकसहभागातून दिला जातो. जागतिक कीर्तीचे भाषाशाखज्ञ डॉ गणेश देवी, इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार, पत्रकार निखील वागळे, पत्रकार संजय आवटे याच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. तीच परंपरा पुढे नेत यावर्षी डॉ भारत पाटणकर यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे. शनिवार दि ८ जून रोजी गंगामाई वाचनालय आजरा येथे १२ वा. होणाऱ्या या कार्यक्रमाला तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने हजर रहावे असे आवाहन आम्ही लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार व स्मारक समितीच्या वतीने करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष शिंपी उपाध्यक्ष मोहनराव देसाई, कार्याध्यक्ष संपत देसाई,
सुनील पाटील सचिव, मु
कुंद दादा देसाई जेष्ठ सदस्य
लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार व स्मारक समिती, आजरा मायकल फर्नांडिस, रविंद्र भाटले, डॉ . गौरी भोसले, संजय घाटगे, मीना शिरगुप्पे, दिगंबर सावंत, नवनाथ शिंदे, युवराज पोवार
सह समितीचे सदस्य उपस्थित होते.

oplus_131074

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.