अज्ञान कार्ट्याने केलेला अपघात निषेधार्थ.- पराक्रम पडला महागात.- पण अनेक षडयंत्र पडली बाहेर.
🟥अग्रवाल कुटुंबाचा पाय खोलात.- वडील, आजोबांच्या अटकेनंतर अल्पवयीन आरोपीची आई बेपत्ता.
पुणे – प्रतिनिधी.

कल्याणीनगर येथील पोर्शे कार हिट अँड रन गुन्ह्यात पुणे गुन्हे शाखेकडून वेगवान कारवाई सुरु झाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक झाली आहे. ससून हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.तर ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. अल्पवयीन आरोपीच्या रक्त नमुन्यात फेरफार केल्या प्रकरणी जेजेच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांच्या त्रिसदस्यीय समितीने कारवाईचा बडगा उगारला आहे. तर गुन्हे शाखा आता अधिक तपासासाठी अल्पयीन आरोपीच्या आईची चौकशी करणार आहे, त्याआधीच शिवानी अग्रवाल बेपत्ता झाल्या आहेत.
🟥कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीला 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. त्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ अल्पवयीन आरोपीचा असल्याचे सांगितले जात होते. तेव्हा माझ्या मुलाचा हा व्हिडिओ नसल्याचे सांगत पुणे पोलीस आयुक्तांकडे मदतीची मागणी करत आरोपीच्या आईने व्हिडिओ तयार केला होता. मात्र या अपघात प्रकरणात आता पोलिसांना अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्या अटकेनंतर शिवानी अग्रवाल यांच्याकडून कार चालकाला धमकावल्याप्रकरणी चौकशी करायची आहे. त्यासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक अग्रवाल यांच्या चौकशीसाठी त्यांच्या घरी गेले असता शिवानी अग्रवाल बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
🔴शिवानी अग्रवाल कुठे गायब झाल्या?
पुणे गुन्हे शाखेचे पथक आपल्याला ताब्यात घेईल या भीतीने शिवानी अग्रवाल बेपत्ता झाल्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांचा फोनही बंद येत आहे. अल्पवयीन आरोपीची आई तथा विशाल अग्रवाल यांची पत्नी नेमकी कुठे गेली आहे, याची माहिती त्यांच्या बंगल्यातील कोणालाही नाही. त्यामुळे शिवानी अग्रवाल नेमक्या कुठे गायब झाल्या, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
🛑पोर्शे कार अपघातानंतर अल्पवयीन मुलाची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. या अपघातानंतर मुलाच्या आईने चालक गंगाराम याला धमकावले होते का, याचा तपास गुन्हे शाखा करत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करण्यात येत आहे. याच अनुषंगाने पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना आणि शिवानी अग्रवाल यांना चौकशीचा निरोप दिला होता. चौकशीसाठी त्यांना पोलिस ठाण्यात येण्याचा निरोप देण्यात आला होता. मात्र आता त्या बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.