Homeकोंकण - ठाणेटोलविरोधी लढा तालुक्याच्या सर्वपक्षीय नेतृत्वाखाली यशस्वी करणार.. आजरा टोलविरोधी समितीची स्थापना.( १०...

टोलविरोधी लढा तालुक्याच्या सर्वपक्षीय नेतृत्वाखाली यशस्वी करणार.. आजरा टोलविरोधी समितीची स्थापना.( १० जुन रोजी आंदोलन टोल नाक्यावर धडकणार. )

टोलविरोधी लढा तालुक्याच्या सर्वपक्षीय नेतृत्वाखाली यशस्वी करणार.. आजरा टोलविरोधी समितीची स्थापना.
( १० जुन रोजी आंदोलन टोल नाक्यावर धडकणार. )

आजरा.- प्रतिनिधी.

राष्ट्रीय महामार्ग संकेश्वर बांधा या मार्गावर आजरा शहरा नजीक एमआयडीसी जवळ टोल नाका होत आहे. हा टोल नाका रद्द करावा व आजरा तालुक्यातील नागरिकांना टोल मुक्ती द्यावी याबाबत टोलविरोधी लढा तालुक्याच्या वाहनधारक नागरिक व सर्वपक्षीय नेते पदाधिकारी वतीने यशस्वी करण्यासाठी टोलविरोधी समितीची स्थापना. व याबाबतची बैठक रवळनाथ मंदिर येथे दि. ३१ रोजी आजरा येथे संपन्न झाली. सुरुवातीला जनहित पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोरवी यांनी स्वागत व प्रस्तावित करताना म्हणाले टोल नाक्याला विरोध तसेच बाधित शेतकऱ्यांच्या समस्या उर्वरित महामार्गाची कामे आजरा शहरातील लेंडहोळ राहिलेले काम या सर्व उर्वरित काम व टोल नाका स्थलांतर व्हावा. असे अनेक मुद्दे या महामार्गाच्या कामात अजून असताना टोल नाकाकडून टोल वसुलीची गडबड केली जात आहे. याला आजरा तालुक्यातील सर्वपक्षीय व तालुक्यातील वाहनधारकांनी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले. या बैठकीत
बोलताना शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई म्हणाले. गडहिंग्लज मधील बाधित शेतकऱ्यांना एक दर व आजरा तालुक्यातील रस्त्याच्या दुतर्फा व ज्यांच्या शेतातून रस्ता गेला त्यांना एक दर दिला आहे याबाबत येथील उपविभागीय अधिकारी यांनी आग्रा तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांवर कमी दर देऊन अन्याय काय केला जातो त्याबाबत अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजेत व योग्य तो दर दिला पाहिजे. असे असताना अजूनही काही उर्वरित कामे शिल्लक आहेत. तर आजरा एमआयडीसी टोल नाका करून अन्यायकारक टोल वसुली सुरू होणार आहे. आम्ही वाहने घेताना रोड टॅक्स भरतो. व केंद्राकडून महामार्गाला निधी दिला असताना ही टोल वसुली कशासाठी. टोल नाका बंद करावा. यासाठी आजरा तालुक्यातील सर्व वाहनधारकांनी या टोलविरोधी आंदोलनात सहभाग नोंदवावा असे मत श्री देसाई यांनी व्यक्त केले. यावेळी काँमेंट संपत देसाई म्हणाले हा टोल नाका जर झाला तर कायमस्वरूपी आजरा तालुक्यातील वाहनधारकांना टोल भरावा लागणार आहे. यामुळे हा टोलचा लढा सर्वपक्षीयांनी एकत्रित येऊन हा लढा लढायचा आहे “आज नाही. तर कधीच नाही.” टोलची अन्यायकारक वसुली थांबवली पाहिजेत. आजरा शहरा नजीक हा टोल नाका जर होत असेल तर आजरा तालुक्यातील एमआयडीसीच्या पलीकडे असणारी तालुक्यातील गावे व तेथील रहिवासी यांच्या डोक्यावर नेहमीच टोल बसणार आहे. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गाला केंद्र शासनाने जर निधी दिला आहे. सदरचे काम विकास काम असेल तर मग हा टोल नाका कशासाठी त्याचबरोबर आजरा तालुक्यातील एखादा नागरिक टोलनाक्याच्या पलीकडच्या गावात घरी जात असेल तरी त्याला तोंड भरावा लागणार आहे यामुळे हा टोल नाका रद्द करावा व हे आंदोलन तालुक्याच्या वतीने मोठ्या ताकतीने उभा करून लढा यशस्वी करूया असे श्री देसाई म्हणाले.‌

Oplus_131072


यावेळी परशुराम बामणे, विलास नाईक, संजय पाटील, संजय तर्डेकर, मसनू सुतार, दिगंबर देसाई, परेश पोतदार, यांनी दोन विरोधी भूमिकेत मत व्यक्त केले
याबाबत टोल धोरण शासन नियम व याबाबत राष्ट्रीय महामार्गाची नेमकी भूमिका काय आहे. याची लेखी माहिती मिळावी याबाबत निवेदन देण्याचे ठरले व दि. १० जुन रोजी आजरा एमआयडीसी येथे होत असलेल्या टोलनाक्यावर आजरा तालुक्यातील वाहनधारक व सर्व पक्षांच्या वतीने धडक मोर्चा बाबत अंतिम निर्णय होऊन. टोल नाक्याचे शासन धोरण व आंदोलनाबाबत उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.‌
या टोलविरोधी बैठकीला अशोक जांभळे, मानसिंग देसाई, रशीद पठाण, अनिरुद्ध केसरकर, प्रकाश मोरस्कर, रवींद्र भाटले, दिनेश कांबळे, महेश पाटील, बाळू जोशी, बंडा चव्हाण, शरद कोलते, संजय देसाई , शांताराम पाटील, निवृत्ती कांबळे, पी. जी. पाटील, सह टोल विरोधी समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Oplus_131072

चौकट.‌

टोलविरोधी बैठकीला आजरा वासियांची पाठ.

आजरा शहरा नजीक एमआयडीसी येथे होत असलेल्या टोल विरोधी बैठकीला आज शुक्रवार असल्याने आजरा वासियांना पाठ दाखवणे भाग पडले असावे. आजरा शहरातून काही मोजकीच दहा आजरावासीय उपस्थित होते.‌
परंतु नक्कीच या टोलविरोधी आंदोलनात सर्वात मोठा सहभाग हा आजरा शहरातून असेल अशी अपेक्षा समितीने दर्शवली आहे.
आजरा शहरातील दोन लोकप्रतिनिधी वगळता अन्य प्रतिनिधी यांनी उपस्थिती दर्शवली नाही.‌ तर तालुक्यातील पहिल्या फळीतील नेते मंडळी देखील या बैठकीला अनुपस्थितीत राहिले असली तरीही सोमवार दि.१० जून रोजी होणाऱ्या टोलनाक्यावरील धडक आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे यावेळी समितीकडून सांगण्यात आले.‌

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.