🟥जागतिक तंबाखू विरोधी दिन कोल्हापूर येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र येथे साजरा.
कोल्हापूर :- प्रतिनिधी
आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर येथे आज ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन तंबाखूमुक्ती बाबतची शपथ घेऊन साजरा करण्यात आला. प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ.योगेश साळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते.
🟥जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी 31 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश तंबाखूच्या धोक्याबद्दल जनजागृती करणे हा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यावेळेची जागतिक तंबाखू विरोधी दिन 2024 ची थीम ‘तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपा पासून मुलांचे संरक्षण’ ही आहे. ही थीम धोरणे आणि उपायांसाठी वकिली करण्यावर लक्ष केंद्रित करते जे तंबाखू उद्योगाला हानिकारक तंबाखू उत्पादनांसह तरुणांना लक्ष्य करण्यापासून प्रतिबंधित करते. हे तरुण लोक, धोरणकर्ते आणि तंबाखू नियंत्रण वकिलांना या समस्येवर चर्चा करण्यासाठी आणि सरकारांना कारवाई करण्यास उद्युक्त करण्यासाठी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.
🛑संघटनेच्या मते तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांमुळे दरवर्षी जगामध्ये सुमारे 8 लाख लोकांचा मृत्यू होतो. तंबाखूच्या सेवनामुळे घसा, तोंड, फुफ्फुस, पोट व इतर अवयवांना कर्करोग होतो. हृदयाला त्रास होतो. पक्षाघात, मधुमेह देखील होतो. या दिवसाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व काय आहे याबाबत 31 मे या जागतिक तंबाखु दिनानिमित्त जनजागृती केली जाते. आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर येथे तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू सेवनामुळे होणारे दुष्परिणाम व आजार याबाबतची परिपूर्ण माहिती प्रशिक्षणार्थीना देण्यात आली. यावेळी श्री.खोत सर श्री. देशमुख सर, श्रीम.गोरवाडे मॅडम, श्रीम.कुळकर्णी मॅडम उपस्थित होते.तसेच आरोग्य सेवक प्रशिक्षणार्थी बॅच क्रं 33 व 34 चे सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.