Homeकोंकण - ठाणेनिकालाआधीच नव्या सरकारच्या शपथविधी भव्य सोहळ्याची तयारी सुरु!( ९ किंवा १० जून...

निकालाआधीच नव्या सरकारच्या शपथविधी भव्य सोहळ्याची तयारी सुरु!( ९ किंवा १० जून ला शपथविधीची शक्यता.)🟥भाजपला बहुमत मिळणार नाही तर इंडीया आघाडी वरचढ ठरेल.- योगेंद्र यादवाचं गणित काय सांगत?🟥डॉ.अजय तावरेसह तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ. – आणखी 7 दिवसांची रिमांड.👇

🟥निकालाआधीच नव्या सरकारच्या शपथविधी भव्य सोहळ्याची तयारी सुरु!
( ९ किंवा १० जून ला शपथविधीची शक्यता.)
🟥भाजपला बहुमत मिळणार नाही तर इंडीया आघाडी वरचढ ठरेल.- योगेंद्र यादवाचं गणित काय सांगत?
🟥डॉ.अजय तावरेसह तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ. – आणखी 7 दिवसांची रिमांड.👇

नवी दिल्ली – प्रतिनिधी.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान अद्याप शिल्लक आहे. त्यानंतर ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र त्या पूर्वीच भारतीय जनता पार्टी आणि या पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएने आपल्या शपथविधीची तयारी सुरू केली आहे.
🔴यावेळेचा शपथविधी सोहळा अगदी भव्य असा करण्याचे त्यांचे नियोजन आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार नव्या सरकारचा शपथविधी यावेळी कर्तव्य पथ येथे म्हणजे पूर्वीचा राजपथावर होणार आहे. त्यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
🅾️राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणाऐवजी कर्तव्यपथावर सोहळा ठेवण्यामागचे कारण म्हणजे जास्तीत जास्त लोकांना त्यावेळी उपस्थित राहता यावे हे आहे. निवडणुकांचे निकाल हाती येताच या तयारीला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. माध्यमाने दिलेल्या बातमीनुसार २४ मे रोजी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाची बैठक झाली होती. बैठकीला ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनचे अधिकारी उपस्थित होते. त्यात शपथविधी सोहळ्याच्या कव्हरेज संदर्भात पूर्ण योजना तयार करण्यात आली.
🟥कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यासाठी साधारण १०० कॅमेरे वापरले जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी कालच ९ जून रोजी शपथविधी सोहळा होणार असल्याचे संकेत दिले आहेत. १० जून हा त्यांच्या पक्षाचा स्थापना दिवस आहे. पक्षाच्या बैठकीत अजित पवार यांनीच सांगितले की यावेळी ते शपथविधी सोहळ्यात व्यस्त राहतील त्यामुळे यावेळी पक्षाचा वर्धापन दिन सोहळा साजरा करणे शक्य होणार नाही.
🔴२०१४ आणि २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली तेंव्हा राष्ट्रपती भवनात त्या सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मात्र ठिकाण बदलण्यात आले. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पानंतर आता हा परिसर नव्याने झळाळून उठला आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून नव्या भारताची झलक संपूर्ण जगाला दाखवण्याचा यामागे विचार आहे. राष्ट्रपती भवनात सोहळा आयोजित केल्यावर प्रोटोकॉलमुळे लोकांच्या उपस्थितीला मर्यादा येतात. मात्र सोहळा जर कर्तव्य पथावर झाला तर कैकपटीने अधिक लोकांना सहभागी होता येईल.

🟥भाजपला बहुमत मिळणार नाही तर इंडीया आघाडी वरचढ ठरेल.- योगेंद्र यादवाचं गणित काय सांगत?

नवी दिल्ली – प्रतिनिधी.

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान येत्या 1 जून रोजी पार पडणार आहे. त्यानंतर सर्वांच्या नजरा या एक्झिट पोल आणि 4 जूनला लागणाऱ्या निकालाकडे लागलेल्या आहेत. मात्र, त्याआधी राजकारणी ते निवडणूक विश्लेषक बनलेल्या योगेंद्र यादव यांनी मोठा दावा करत मोदींसह भाजपचं टेन्शन वाढवलं आहे. द वायर’ या न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
🔴यंदाच्या लोकसभा निवडणूकीत भाजपला बहुमत मिळणार नाही असे भाकित यादव यांनी केले आहे. तर, इंडिया आघाडीबाबतही यादव यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या या भाकितामुळे भाजपच्या गोटात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, 4 जूनला निकाल आल्यानंतर यादव यांचे भाकित कितपत खरे ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपला सुमारे 50 जागा कमी पडू शकतात असा अंदाज यादव यांनी व्यक्त केला आहे.

🅾️कोण किती जागा जिंकणार काय म्हणाले योगेंद्र यादव?

लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपनं 400 पारचा नारा दिला आहे तर, विरोधी इंडिया आघाडी आपल्या विजयाचा दावा करत आहे. या सर्व दाव्यांमध्ये निकालापूर्वीच यादव यांनी इंडिया आघाडी एनडीएपेक्षा जास्त जागा जिंकेल असे सांगत भाजपला 250 पेक्षा कमी जागा मिळतील असे म्हटले आहे.

🔴‘भाजपला बहुमत मिळणार नाही’

सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार भाजपला 250 पेक्षा कमी जागा मिळतील असे गणित मांडत शेवटच्या टप्प्यात भाजपला उत्तर प्रदेश आणि बिहारमधून धक्का मिळू शकतो. यामुळे इंडिया आघाडी भाजपला त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत. योगेंद्र यादव यांच्या दाव्यानुसार भाजपला 250 किंवा त्यापेक्षा कमी म्हणजे 230 पर्यंतही असू शकतो.

🅾️काँग्रेस चांगली कामगिरी करेल.

*भाजपच्या विजयी जागांबद्दल बोलल्यानंतर यादव यांनी काँग्रेस किती जागांवर विजय मिळवेल यावरही भाष्य केले. ते म्हणाले की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 2019 च्या तुलनेत चांगली कामगिरी करेल आणि साधारण 90 ते 100 जागांवर विजयाचा गुलाल उधळेल असे यादव म्हणाले.

🟥डॉ.अजय तावरेसह तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ. – आणखी 7 दिवसांची रिमांड.

पुणे :- प्रतिनिधी.

शहरातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघातप्रकरणी आधी अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह आजोबाला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर, ब्लड अहवालात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरेंसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.याप्रकरणी डॉ अजय तावरे, डॉ श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलिस कोठडीत आणखी 7 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. या तिघांना आज न्यायालयात हजर केले असता, 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
🔴अपघात व ब्लड फेरफार प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि शिपायास 27 जूनला अटक केली होती. त्यानंतर, न्यायालयात हजर केले असता, सुरुवातीला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. आता, त्यांच्या पोलीस कोठडीत आणखी 7 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयात जबरदस्त युक्तिवाद केल्याचंही दिसून आलं.
🅾️पुणे अपघात आणि ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण गुन्ह्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कलम समाविष्ट करण्यात आल्याने संपूर्ण तपास एसीपी दर्जाचे अधिकारी करणार आहेत. डॉ. श्रीहरी हळनोर याने अल्पवयीन मुलाचे रक्त घेतले होते. ज्या सिरींजमध्ये ते घेतले ती सिरिंज कचरा पेटीत न टाकता कुणालातरी दिल्या. आता, त्या सिरींज कुणाला दिल्या, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, रक्त नमुण्यावरील सील जप्त करणार आहेत. आरोपीने एका महिलेचे रक्त घेतले होते. ते कुणाचे याचा तपास पोलिसांना करायचा आहे. तसेच, त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला, त्याचाही तपास करायचा आहे. एकमेकांशी कॉल झाले त्याचा तपास करायचा आहे, याप्रकरणी आणखी काही जण संशयित आहेत, त्यांचा तपास करायचा आहे. त्यामुळे, पुढील तपासासाठी पोलिसांनी कोर्टाकडे आरोपींची कोठडी वाढवून मागितली होती. त्यानंतर, न्यायालयाने आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान, रक्त तपासणीसाठी रक्त घेताना मुलाचे रक्त सीसीटीव्ही असलेल्या ठिकाणी घेतले. तर, महिलेचे रक्त CMO च्या खोलीत घेतले, जिथं सीसीटीव्ही नाहीत, अशी माहितीही पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.