Homeकोंकण - ठाणेसिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन ठप्प काम.- ( प्रवाशी संघटनेच्या दणक्याने सुरू- उपविभागीय अभियंता...

सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन ठप्प काम.- ( प्रवाशी संघटनेच्या दणक्याने सुरू- उपविभागीय अभियंता जोशी यांची पाहणी व चर्चा.)🛑अपंगांच्या मागण्यांसाठी आजरा तहसिलदार व पंचायतसमिती कार्यालयावर मोर्चा तर नगरपंचायत बेमुदत ठिय्या आंदोलन करणार – संग्राम सावंत.

🛑सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन ठप्प काम.- ( प्रवाशी संघटनेच्या दणक्याने सुरू- उपविभागीय अभियंता जोशी यांची पाहणी व चर्चा.)
🛑अपंगांच्या मागण्यांसाठी आजरा तहसिलदार व पंचायतसमिती कार्यालयावर मोर्चा तर नगरपंचायत बेमुदत ठिय्या आंदोलन करणार – संग्राम सावंत.

सिधुदूर्ग नगरी २७ प्रतिनिधी.

सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरण कामात दिरंगाईमुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत सिंधुदुर्ग रेल्वे प्रवासी संघटना ,संघर्ष समिती यांच्या मार्फत लक्ष वेधले असता बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी विनायक जोशी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि सदरचेअत्यावश्यक काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून घेण्याबाबत संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या
सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन वरील सुशोभीकरण काम मंजूर करण्यात आले आहे सदरचे सुशोभीकरण काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असून त्याचा फटका रेल्वे प्रवाशाना बसत असल्याच्या तक्रारी होत्या याबाबत सिंधुदुर्ग प्रवासी संघटना आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रवासी संघर्ष समन्वय समिती यांच्या मार्फत रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली आणि प्रत्यक्ष प्रवाशांची होणारी गैरसोय बाबत सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी अभियंता सर्व गोडलक्ष वेधले असता बांधकाम उपअभियंता विनायक जोशी यांनी सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन कामाची पाहणी केली असा सिंधुदुर्ग रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शुभम परब स्वप्निल गावडे संजय वालावलकर बाबुराव गावडे व अन्य प्रवासी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते रिक्षाचालक उपस्थित होते
सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनचे काम गेले अनेक महिने सुरू आहे गेल्या दोन महिन्यात अत्यंत धीम्या गतीने सुरू असलेल्या कामामुळे स्टेशनवर जाणाऱ्या प्रवाशांना नजीकच मारलेला गटाराचा चर आणि स्टेशन आणि सुशोभीकरण काम यामधील असलेला खड्डा पाणी साचलेले गटार व एकूण कामात असलेली दिरंगाई बाबत त्यांचे लक्ष वेधले गेले अनेक महिने सदरचे काम धिम्या गतीने सुरू असून पावसाळा जवळ आला तरी काम उरकलं नसल्यामुळे त्याचा फटका रेल्वे प्रवाशांना होत आहे पत्रा शेडमध्ये लाईट नसल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांना रात्रीच्या वेळी चाचपटत जावे लागते या सर्व प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्या अशी मागणी प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आणि प्रत्यक्ष कामाबाबत लक्षवेधले यावेळी संबंधित ठेकेदाराला याबाबत आवश्यक त्या कामाबाबत तातडीने पूर्तता करावी तसेच रेल्वे कडे येणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आकाशी झाडे रस्त्यावर पडण्याच्या स्थितीत आहेत ती तातडीने तोडून घ्यावी अशी ही सूचना केली याबाबत संबंधित उपविभागीय अभियंता विनायक जोशी यांनी येत्या काही दिवसात याबाबत आवश्यक ती कामे पूर्ण करू रस्त्यालगत असलेली आकाशी झाडे तातडीने तोडून घ्यावीत अशी सूचना केली सिंधुदुर्ग रेल्वे प्रवासी संघटना आणि संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून या प्रश्नाकडे लक्ष वेधल्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय आणि पावसाळ्यात होणारे त्रास त्यामुळे दूर होतील आज पासून तातडीने लाईट फिटिंग आणि पेवर ब्लॉक बसविण्याचे कामही संबंधित ठेकेदाराने तातडीने सुरू केले आहे त्यामुळे संघटनेच्या वतीने आणि प्रवाशांच्या वतीने संबंधितांना धन्यवाद देण्यात येत आहेत , प्रवाशांच्या प्रश्नाकडे संघटनेच्या माध्यमातून लक्ष वेधल्यामुळे प्रवाशांसह रिक्षा संघटनाने ही धन्यवाद दिले आहे सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करा अशी मागणी करण्यात आली यापुढे रेल्वे प्रवाशाच्या प्रश्नाकडे संघटना लक्ष देईल वेळ पडल्यास आम्हाला आंदोलन करावे लागेल . तेही करू असे अध्यक्ष शुभम परब यांनी स्पष्ठ केले.

🛑अपंगांच्या मागण्यांसाठी आजरा तहसिलदार व पंचायतसमिती कार्यालयावर मोर्चा तर नगरपंचायत बेमुदत ठिय्या आंदोलन करणार – संग्राम सावंत.

आजरा.- प्रतिनिधी.

अपंगांच्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी तहसीलदार व मुख्याधिकारी,नगरपंचायत व गटविकास अधिकारी, आजरा यांना मुक्ती संघर्ष समिती यांच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने अपंगांच्या-दिव्यांगांच्या बाबतीतील सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून कायदेशीररित्या त्याची ताबडतोब सोडवून करावी.अपंगांच्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी तहसीलदार,मुख्याधिकारी, नगरपंचायत व गटविकास अधिकारी आजरा यांना निवेदन देऊन चर्चा केली. याबाबतीत तहसीलदार, मुख्याधिकारी, नगरपंचायत व गटविकास अधिकारी आजरा यांनी सकारात्मकरित्या प्रश्न सोडवण्यासाठीचा पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावले नाहीतर, आम्ही याबाबतीत अपंगांच्या विविध मागण्यांसाठी तहसिलदार व पंचायतसमिती कार्यालयावर मोर्चा व नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत. मागण्यांच्या बाबतीत मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने दिव्यांग- अपंगांना देण्यात येणाऱ्या पेन्शन योजनेबाबतीत त्यांची रक्कम त्यांच्या खात्यात वेळोवेळी आणि वेळच्या वेळी जमा झाली पाहिजे. यासाठी दिव्यांगांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. यासाठी आपण दिव्यांगांच्या पेन्शन बाबतीत जे अडथळे आहेत ते दूर करून त्यांची पेन्शन जर महिन्याला त्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा झाली पाहिजे. तशीच दिव्यांगांच्या इतर मागणीबाबत आपण लक्ष घालून संबंधित सर्व विभागांना याबाबतीत सूचना करून याबाबतीतील बैठक लावून संघटनेबरोबर चर्चा करून या प्रश्नाची सोडवणूक करायला हवी आहे. मात्र आजपर्यंत कोणत्याही अधिकारी यांनी पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे संघटनेला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. या निर्णयात विविध बारा मागण्या करण्यात आले आहेत. वरील मागण्यांच्या यासंदर्भात ठोस पावले प्रशासनाने गांभीर्यपूर्वक उचलली नाहीत. आंदोलन करणार आहोत.असा इशारा मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले आहे. यावेळी मुक्ती संघर्ष समितीच्या राज्याध्यक्ष संग्राम सावंत, सुरेश खोत, रविंद्र भोसले, भारती पवार, रूजाय डिसोझा, अबु माणगावकर, संजय डोंगरे, बबन चौगुले, अहमद नेसरीकर, दिलीप कांबळे, इम्तियाज दीडबाग, अमिन कानडीकर, गौस माणगावकर, सुलेमान दरवाजकर बबन कुरळे, आबुसय्यद मानगावकर, जगदीश कुरुमकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.