आजरा तालुक्यातील दहावीचा निकाल ९९.४५% ( तालुक्यातून १२८३ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १२७५ विद्यार्थी उत्तीर्ण. )
आजरा.- प्रतिनिधी.
महाराष्ट्रातील दहावी परीक्षेचाचा निकाल आज सोमवारी दुपारी १ वा. जाहीर झाला. यामध्ये आजरा तालुक्याचा निकाल ९९. ४५ टक्के लागला असून. या परिक्षेसाठी तालुक्यातून १२८३ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १२७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी तालुक्यातील ३३ पैकी तब्बल २९ हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
तालुक्यातील दहावी हायस्कूलचा निकाल पुढीलप्रमाणे :
व्यंकटराव हायस्कूल आजरा : 98.99%
झाकीर हुसेन ऊर्दू हायस्कूल आजरा : 95.45%
उत्तूर विद्यालय : 98.48%
वसंतरावदादा पाटील हायस्कूल उत्तूर : 94.87
शंभर टक्के निकाल लागलेली हायस्कूल पुढील प्रमाणे :
आजरा हायस्कूल
पं. दीनदयाळ विद्यालय आजरा
शारदाबाई चव्हाण गर्ल्स हायस्कूल आजरा
रोझरी इंग्लिश मिडीयम स्कूल आजरा
पार्वती शंकर हायस्कूल उत्तूर
पेरणोली हायस्कूल
मडिलगे हायस्कूल
भादवण हायस्कूल
आदर्श हायस्कूल शिरसंगी
आदर्श हायस्कूल गवसे
एरंडोळ हायस्कूल
चाफवडे हायस्कूल
रवळनाथ हायस्कूल देवर्डे
दाभिळ हायस्कूल
माऊली हायस्कूल धनगरमोळा
डायनॅमिक पब्लिक स्कूल सुळेरान
वाटंगी हायस्कूल
मलिग्रे हायस्कूल
आदर्श माध्यमिक विद्यालय सरंबळवाडी
केदारी रेडेकर हायस्कूल पेद्रेवाडी
महात्मा फुले हायस्कूल हात्तिवडे
आण्णासाहेब गायकवाड हायस्कूल महागोंड
राजाभाऊ केसरकर हायस्कूल निंगुडगे
माध्यमिक विद्यालय आरदाळ
ल. बा. चोरगे हायस्कूल बेलेवाडी
कर्मवीर विद्यालय चिमणे
भैरवनाथ हायस्कूल बहिरेवाडी
छ. शिवाजी विद्यालय होन्याळी
कोविंद्रे हायस्कूल.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र वतीने हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा.