Homeकोंकण - ठाणेकर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे कोकण रेल्वे मार्गावरील मोठा अपघात टळला.‌👇🛑दुर्गंधी लेंडओहळ - करणारे आजरा...

कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे कोकण रेल्वे मार्गावरील मोठा अपघात टळला.‌👇🛑दुर्गंधी लेंडओहळ – करणारे आजरा शहरातील काही व्यापारी, नागरिक ( नगरपंचायतच्या स्वच्छता विभागाच्या आंधळा कारभार चव्हाट्यावर )

🟥कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे कोकण रेल्वे मार्गावरील मोठा अपघात टळला.‌👇
🛑दुर्गंधी लेंडओहळ – करणारे आजरा शहरातील काही व्यापारी, नागरिक ( नगरपंचायतच्या स्वच्छता विभागाच्या आंधळा कारभार चव्हाट्यावर )

रत्नागिरी :- प्रतिनिधी

कोकण रेल्वे मार्गावर उडुपीजवळील संभाव्य अनर्थ रेल्वे रुळ सांभाळणारे प्रदीप शेट्टी यांच्या सतर्कतेमुळे टळला. रविवारी पहाटे सव्वादोन वाजता शेट्टी यांना इनांजे ते पाडुबिद्री दरम्यान ट्रॅक वेल्ड बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना या बिघाडाची माहिती दिल्याने संभाव्य रेल्वे अपघात टळला. रुळावरील बिघाड तातडीने दुरुस्त करण्यात आला आणि पहाटे ५ वाजून ५८ मिनिटांनी ट्रॅक-फिट प्रमाणपत्र देण्यात आले आणि त्यावर धावणाऱ्या गाड्यांना ताशी २० किमी वेगाचे बंधन घालण्यात आले.
🔴कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी शेट्टी यांच्या तत्परतेची दखल घेत तातडीने २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. दुपारी ट्रॅक साइटवर शेट्टी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कारवारकडे जाणाऱ्या पंचगंगा एक्स्प्रेसमधील प्रवासी विशाल शेणॉय यांनी सांगितले की, पडुबिद्रीपासून दक्षिणेला सुमारे ९ किमी अंतरावर असलेल्या नंदिकूर स्थानकात गाडी थांबविण्यात आली होती. त्याचवेळी तिरुवनंतपुरम सेंट्रलकडे जाणारी नेत्रावती एक्स्प्रेसही इनांजे येथे थांबविण्यात आली.

🟥शेणॉय यांनी रुळ दुरुस्तीच्या कामासाठी पाडुबिद्रीच्या दिशेने जाणारी रेल्वे मेंटेनन्स व्हेइकल पाहिली. गाडी क्रमांक १६३४५ ही मुंबई एलटीटी-तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेस उडुपीहून पहाटे ३ वाजता निघणार होती, तर गाडी क्रमांक १६५९५ ही केएसआर बेंगळुरू-कारवार पंचगंगा एक्स्प्रेस रविवारी पहाटे ४ च्या सुमारास प्रभावित भागातून जाणार होती. रुळातील बिघाड दूर होईपर्यंत दोन्ही गाड्या थांबल्या होत्या. कोकण रेल्वेच्या जनसंपर्क व्यवस्थापक सुधा कृष्णमूर्ती यांनी वेगावर निर्बंध असतानाही ट्रॅकला सुरक्षित ऑपरेशनचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू झाल्याची माहिती दिली. मात्र, रेल्वे रुळातील बिघाडाचे कारण कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अद्याप जाहीर केलेले नाही.

दुर्गंधी लेंडओहळ – करणारे आजरा शहरातील काही व्यापारी, नागरिक ( नगरपंचायतच्या स्वच्छता विभागाच्या आंधळा कारभार चव्हाट्यावर )

आजरा.- संभाजी जाधव.

Oplus_2

आजरा शहराच्या मुख्य चौकातील व आंबोली – गोवा महामार्गावर जाणाऱ्या मुख्य वळणावरील लेंडओहळ मागील अनेक वर्षापासून प्लास्टिक बॉटल व कचऱ्याच्या साम्राज्यात अडकले आहे. बऱ्याच वर्षापासून स्वच्छता न केल्यामुळे सडलेला कचरा दुर्गंधी साचलेले पाणी यामुळे यामध्ये रोगराई पसरवणारे मच्छर, व हेच पाणी नदीला जात असल्याने पाणी प्रदूषण याला सर्वस्वी जबाबदार हे या चौकातील काही व्यापारी व नगरपंचायत आहे. सद्यस्थितीत राष्ट्रीय महामार्ग संकेश्वर बांदा या महामार्गाचे काम मागील दोन वर्षापासून चालू आहे. आजरा शहरातील व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक आजरा या चौकाच्या वळणावर असलेली ही लेंडओहळ ( पुलाचे ) रखडले आहे. महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या सर्वे मध्ये सदर पुलाची नव्याने करण्याची नोंद नसल्याने सदर काम आजऱ्यातील काही गरजवंत नागरिकांनी व अन्याय निवारण समिती यांनी पुढाकार घेऊन सदर पुलाचे काम व्हावे. यासाठी सातत्याने प्रयत्न केला परंतु या प्रयत्नांना फारसे यश आले नसले तरीही प्रयत्न करणं महत्त्वाचं होतं. या प्रयत्नामध्ये काही लोकप्रतिनिधी वगळता आजरा शहरातील लोकप्रतिनिधी यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. व नगरपंचायत प्रशासन यांनी तर आपली जबाबदारी नाही. असेच दुर्लक्ष केल्याने सदर काम रखडले आहे. सद्या काम चालू होण्या अगोदर सदर लेंडओंहळ मधील कचरा बाहेर काढल्यास कदाचित स्वच्छ होईल अन्यथा यापुढेही स्वच्छता करणे अशक्य आहे.
मुळात या ठिकाणी कचरा टाकणारी मंडळी कोण आहेत. याचा शोध घेणे गरजेचे आहे. नगरपंचायत ची घंटागाडी असताना त्या घंटागाडीला ठेंगा दाखवुन सदर कचरा या ठिकाणी फेकण्याची उत्तम सोय असल्याची गृहीत धरून. आजूबाजूचे व लेंडओहळ मध्ये मागच्या बाजूने काही दुकानदार अनेक वर्षापासून कचरा टाकत आहे. तर काही वेळा ग्रामीण भागातून येणारे अडवारी भाजी व अन्य वस्तूंचे व्यापारी शिल्लक राहिलेला कचरा या ठिकाणी टाकतात.‌ यामध्ये प्लास्टिक बाटलींचा व प्लास्टिक पिशव्या यांचा अधिक समावेश आहे. काही ठराविक व्यापारी नियमित आपला कचरा नगरपंचायत घंटागाडी मध्ये टाकतात परंतु अन्य व्यापारी घंटागाडीत कचरा टाकत नसतील तर मग कचरा कुठे टाकला जातो. याचा शोध नगरपंचायतने घ्यावा. व संबंधित व्यापारी यांच्यावर निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई करून. सदर दुकान गाळे दोन – तीन दिवसांसाठी बंद ठेवावे अशा पद्धतीच्या कारवाया केल्यास सदर कचरा हा घंटागाडी मध्ये नक्कीच टाकला जाईल. पण मुळात कचरा फेकण्याचे घंटागाडी साधन असताना या ठिकाणी टाकण्याचे नेमकं कारण काय हा कचरा नदीला जाऊन पाणी प्रदूषण होतं. यामध्ये अस्वच्छ पाणी नदीला जातं पण काही राहिलेला कचरा त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून कुजत आहे.‌ व तेच पाणी आपल्याला प्यायला मिळते याचा देखील भान कचरा टाकणाऱ्या व्यापारी व नागरिकांना नसते याची खंत वाटते.‌
मग यामध्ये प्रश्न उपस्थित होतो. की याकडे नगरपंचायत स्वच्छता विभाग का कानाडोळा करत आहे. या ठिकाणी स्वच्छता देखील केली जात नाही.‌ व अस्वच्छता करणाऱ्या लोकांच्यावर कारवाई देखील केली जात नाही. अर्थात कचरा न टाकणाऱ्यांची दुर्गंधी करणाऱ्यांची जेवढी जबाबदारी स्वच्छता ठेवण्याची आहे. तितकी जबाबदारी देखील नगरपंचायतची आहे अस्वच्छता असेल त्या ठिकाणी स्वच्छता करणे एकंदरीत नगरपंचायत चा अंदाधुंद कारभार यामुळे दुर्गंधी लेडओंहळ मुळे उघड्यावर पडला आहे… अशीच अस्वच्छता शहरात राहिली तर आजरा नगरपंचायतचा का उपयोग.. कसे होणार आजरा स्वच्छ व सुंदर..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.