🟥चक्रीवादळ मध्यरात्री धडकणार.. हवामान खात्यांची माहिती.
नवी दिल्ली.- वृत्तसंस्था.
🅾️भारतीय हवामान खात्याने बंगालच्या खाडीमध्ये रविवारी रात्री चक्रीवादळाचा धोका दिल्यानंतर यंत्रणा सज्ज झाली आहे. पश्चिम बंगालच्या सागरद्विप आणि बांग्लादेशच्या खेपुपुरा येथे हे वादळ धडकणार आहे. या बंगालच्या खाडीमध्ये येणारे मान्सूनपूर्व पहिले चक्रीवादळ आहे आणि हिंदी महासागर क्षेत्रामध्ये या चक्रीवादळाला रेमल नावाने ओळखले जात आहे. रेमल हे नाव ओमान देशाने दिले आहे. कारण रेमल याचा अर्थ वाळू असा आहे. या चक्रीवादळाची सुरवात वाळवंटातून झाली आहे. चक्रीवादळ प्रतितास १२० किमी इतक्या वेगाने मार्गक्रमण करीत असून रविवारी रात्री हे वादळ सीमावर्ती भागात धडकणार आहे त्यामुळे यंत्रणेला अलर्ट करण्यात आले आहे.
🟥उत्तरी ओडिसाच्या किनारपट्टीवरील गावांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या वादळांत शेतीसह वनसंपत्तीचे आणि मनुष्य आणि वित्तहानीचा धोका वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरून लोकांना दूर हाकलण्यात आले आहे. बंगालच्या खाडीमध्ये समुद्राचे तापमान ३० डिग्री सेल्सिअस आहे आणि बंगालची खाडी व अरबी समुद्र देखील उष्ण आहे. त्यामुळेच उष्णकटिवद्बीय चक्रीवादळ उग्र स्वरूप धारण करू शकते. हे वादळ वायू मंडळात महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात असे हवामान खात्याने म्हटले आहे. तामिळनाडू आणि ओरिसासह आसामपर्यंत या वादळाचा तडाखा बसणार आहे. हे वादळ मध्यरात्री धडकणार असल्याने काळजी वाढली आहे.