🟥प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.श्री.निवृत्ती इंदुरीकर महाराज दि. २८ मे रोजी उद्योजक विशाल परब यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थांनी करणार “हरि कीर्तनाचा” कार्यक्रम.
सावंतवाडी :- प्रतिनिधी.
भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या सावंतवाडी येथील “विराज मॅन्शन” सर्व्ह नंबर १५२ – तिलारी काॅलनीजवळ चराठे सावंतवाडी या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ मंदिर कलशारोहण सोहळा मंगळवार दि.२८ मे रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.
🅾️तसेच यानिमित्त समाजप्रबोधनकार ह.भ.प.श्री. निवृत्ती देशमुख – इंदुरीकर महाराज यांचा “हरि कीर्तनाचा कार्यक्रम सायंकाळी ठीक ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्वानी श्री स्वामी समर्थ मंदिर कलशारोहण सोहळ्याचा तसेच “हरि किर्तना”चा लाभ घ्यावा असे आवाहन उद्योजक व भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांनी केले आहे.