Homeकोंकण - ठाणेप्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार.I- MD ने दिला नवा अलर्ट.- तर कोकण, मराठवाडा,...

प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार.I- MD ने दिला नवा अलर्ट.- तर कोकण, मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता.- हवामान विभागाचा अंदाज🟥डोंबिवली एमआयडीसीत आणखी तीन मृतदेह सापडले;मृतांचा आकडा 11 शोधकार्य सुरुच.🟥धोकादायक कंपन्या डोंबिवलीतून बाहेर हलवणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा.🟥पुण्याच्या अपघात प्रकरणानंतर नागपूर पोलीस घेत आहेत ‘ही’ काळजी.- आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांची पत्रकार परिषेदेत माहिती.🛑नालेसफाईचा मुंबई महानगरपालिकेचा दावा धादांत खोटा, नालेसफाई नव्हे तर निव्वळ ‘हाथ की सफाई’ – प्रा. वर्षा गायकवाड.

🔴 प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार.I- MD ने दिला नवा अलर्ट.- तर कोकण, मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता.- हवामान विभागाचा अंदाज
🟥डोंबिवली एमआयडीसीत आणखी तीन मृतदेह सापडले;
मृतांचा आकडा 11 शोधकार्य सुरुच.
🟥धोकादायक कंपन्या डोंबिवलीतून बाहेर हलवणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा.
🟥पुण्याच्या अपघात प्रकरणानंतर नागपूर पोलीस घेत आहेत ‘ही’ काळजी.- आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांची पत्रकार परिषेदेत माहिती.
🛑नालेसफाईचा मुंबई महानगरपालिकेचा दावा धादांत खोटा, नालेसफाई नव्हे तर निव्वळ ‘हाथ की सफाई’ – प्रा. वर्षा गायकवाड.

नवी दिल्ली :- वृत्तसंस्था.

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरूच आहे. या पावसाचा मोठा फटका राज्याला बसला आहे. दरम्यान या पावसाची तिव्रता आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो.हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, चक्रीवादळाची निर्मीती होत आहे. चक्रीवादळामुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातील किनारपट्टी प्रदेशात मोठ्या हवामान बदलाची शक्यता आहे.
🅾️महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास येत्या दोन ते तीन दिवसांत या वादळाचा काहीप्रमाणात तडाखा हा राज्याला देखील बसू शकतो. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात राज्यात 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहू शकतात असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला कोकण, मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज
राज्यासह देशात सध्या ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. कुठे उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. तर कुठे अवकाळी पावसाचा तडाखा बसताना दिसत आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रात काही भागात जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. कोकण, मराठवाड्यासह विदर्भात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त इतर भागात उष्णतेच्या झळा बसण्याची शक्यता असून काही ठिकाणी तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअस वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
🅾️दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी , उत्तर कोंकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा पाहायला मिळणार असून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता. गेल्या आठवड्याभरापासून राज्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढलं आहे. राज्यात एकीकडे तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना विदर्भात सलग आठवडाभर पावसाची हजेरी लागताना दिसत आहे. पुढील तीन दिवसही विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह 30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

🟥डोंबिवली एमआयडीसीत आणखी तीन मृतदेह सापडले;
मृतांचा आकडा 11 शोधकार्य सुरुच.

🛑डोंबिवली:-डोंबिवली एमआयडीसीच्या फेज दोनमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशीही अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून शोधकार्य सुरु आहे. या शोधकार्यादरम्यान शुक्रवारी सकाळी उद्ध्वस्त अवशेषांमध्ये आणखी तीन मृतदेह सापडले आहेत.यापैकी एक मृतदेह केजी केमिकल्स कंपनीच्या आवारात आढळला. अग्निशमन दलाने हे मृतदेह एनडीआरएफच्या ताब्यात दिले असून ते आता रुग्णालयात पाठवले जातील. त्यामुळे आता मृतांची संख्या 11 वर पोहोचली आहे.
🟥एमआयडीसीमधील अमुदान कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलरचा स्फोट होऊन भीषण स्फोट झाला होता. या स्फोटाचे हादरे दोन ते किलोमीटरच्या परिसरात बसले होते. त्यामुळे या परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या होत्या. बॉयलरचे तुकडे दीड किलोमीटर लांबच्या अंतरावर फेकले केले होते. हे तुकडे चारचाकी वाहनांवर पडून कोसळून त्यांचेही नुकसान झाले होते.
🅾️अग्निशमन दलाने गुरुवारी रात्रीच एमआयडीसीमधील आगीवर नियंत्रण मिळवले होते. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरु झाले होते. शुक्रवारी सकाळी एमआयडीसीतील बेपत्ता असलेल्या कामगारांचे नातेवाईक घटनास्थळी आपल्या आप्तांना शोधण्यासाठी आले. त्यावेळी एनडीआरएफची पथकडे उद्ध्वस्त अवशेषांच्या ढिगाऱ्याखाली मृतदेहाचा शोध घेत होते. अखेर काही तासांनी तीन मृतदेह हाती लागले आहेत. कालच्या स्फोटानंतर एमआयडीसी परिसरात सध्या सर्वत्र रासायनिक धूर पसरला आहे. त्यामुळे या भागात प्रचंड दुर्गंधी येत आहे. याठिकाणी रंग तयार करण्याच्या कंपन्या आहेत. येथील केमिकल्स जळाल्याने त्यांची वाफ हवेत पसरली आहे.

🟥कंपनी मालकाविरोधात गुन्हा.

अमुदान कंपनीतील बॉयलरचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली होती. मात्र, या बॉयलरसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. या कंपनीत कोणतीही परवानगी घेतलेला अधिकृत बॉयलर नव्हता, अशी माहिती चौकशीदरम्यान पुढे आली. यानंतर पोलिसांनी कंपनीचे मालक प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

🟥धोकादायक कंपन्या डोंबिवलीतून बाहेर हलवणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

डोंबिवली एमआयडीसीत झालेल्या भीषण स्फोटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतलाय. डोंबिवलीकरांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांनी एमआयडीसीतील धोकादायक केमिकल कंपनींना डोंबिवलीच्या हद्दीतून बाहेर स्थालांतर करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार सर्व केमिकल युनिट्सना नोटीस दिल्या जातील.

🟥डोंबिवलीतील केमिकल फॅक्टरीत बॉयलरचा स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत. – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे :- प्रतिनिधी.

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका रासायनिक कारखान्यात गुरुवारी दुपारी स्फोटानंतर आग लागली, ज्यामुळे किमान 11 लोकांचा मृत्यू झाला आणि 60 हून अधिक जण जखमी झाले आहेत.स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि जखमींचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. या प्रकरणाच्या सविस्तर तपासानंतरच स्फोटाचे कारण समोर येईल, असे राज्याच्या उद्योग विभागाने सांगितले.
🔴अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरातील फेज-2 मध्ये असलेल्या ‘अमुदान केमिकल कंपनी’च्या बॉयलरला दुपारी 1.40 च्या सुमारास भीषण आग लागली आणि ती जवळपासच्या कारखान्यांमध्ये पसरली. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार या अपघातात मृत्युमुखी पडलेले लोक जवळच्या कारखान्यात काम करत होते.
🅾️राज्याच्या उद्योग आणि कामगार विभागाने एक निवेदन जारी केले की, कारखान्याचे बॉयलर इंडिया बॉयलर विनियम, 1950 अंतर्गत नोंदणीकृत नव्हते. ही घटना भीषण असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, केमिकल कारखान्याच्या आजूबाजूच्या कारखान्यांमध्ये आणखी काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे.ते पुढे म्हणाले, लोकांना वाचवणे हे आमचे प्राधान्य आहे. या अपघातात आठ जणांना आपला जीव गमवावा लागला असून साठहून अधिक जण जखमी झाले आहेत. सरकारने ही घटना गांभीर्याने घेतली आहे आणि उद्योगांना धोक्याच्या आधारावर अ, ब आणि क असे वर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यभरातील लाल श्रेणीत येणारे सर्व धोकादायक औद्योगिक युनिट तात्काळ बंद केले जातील. अशा युनिट्सना इतर ठिकाणी स्थलांतर करण्याचा किंवा अभियांत्रिकी आणि आयटी सारख्या वापर (श्रेणी) बदलण्याचा पर्याय दिला जाईल… लोकांच्या जीवनाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
🟥स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि जखमींचा खर्च सरकार उचलणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या प्रकरणाचा सविस्तर तपास केल्यानंतरच स्फोटाचे कारण समोर येईल, असे राज्याच्या उद्योग विभागाने सांगितले.
🔴ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी सांगितले की, या घटनेत पाच पुरुष आणि दोन महिलांचे मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटू शकली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून शोक व्यक्त करतो.जखमींवर एम्स, नेपच्यून आणि ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून सर्व मदत केली जात आहे, असे ते म्हणाले. मी त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. बचावकार्यासाठी विविध पथके आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी आहेत.
🅾️अधिकाऱ्यांनी सांगितले की, अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक अधिकारी यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल देखील बचाव कार्यात भाग घेत आहे. ज्या कारखान्यात स्फोट झाला तो कारखाना गेल्या काही महिन्यांपासून सुरू नसून काही दिवसांपूर्वीच तो पुन्हा सुरू झाल्याचे सामंत यांनी सांगितले. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार राजू पाटील यांनी मुंबईपासून 40 किमी अंतरावर असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसराला भेट दिली.
🟣घटनेबाबत एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, कारखान्यातील स्फोट इतका जोरदफर होता की त्याचा आवाज एक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्फोटामुळे जवळपासच्या इमारतींच्या खिडक्यांना तडे गेले तर काही घरांचेही नुकसान झाले. कारखान्यावर धुराचे दाट ढग दिसत आहेत.
🅾️मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये सांगितले की, घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बचाव आणि मदत कार्य सुरू असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील घातक रासायनिक कारखाने डोंबिवली येथून अंबरनाथ एमआयडीसीमध्ये हलविण्याची योजना आहे.

🔴 अमिताभ बच्चन यांचे डुप्लिकेट म्हणून ओळख असणारे प्रसिद्ध अभिनेते फिरोज खान काळाच्या पडद्याआड.

🟣अमिताभ बच्चन यांचे डुप्लिकेट म्हणून ओळख असणारे प्रसिद्ध अभिनेते फिरोज खान यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने फिरोज यांनी अखेरचा श्वास घेतला. या दु:खद बातमीनंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.मीडिया अहवालानुसार २३ मे ला उत्तर प्रदेशमधील बदाऊन येथे फिरोज खान यांना हृदयविकाराचा झटका आला. आणि त्यांचं निधन झालं.

🔴अमिताभ बच्चन यांचे डुप्लिकेट म्हणून मिळाली ओळख

रिपोर्टनुसार फिरोज काही काळ बदायूंमध्ये होते. शहरातील अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभागी होता. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते चाहत्यांमध्ये लोकप्रिय होते. फिरोज खानने 4 मे रोजी बदायूं क्लबमधील मतदार महोत्सवात शेवटचा परफॉर्मन्स दिला. अभिनयासोबतच ते अमिताभ बच्चन यांची नक्कल करण्यासाठीही ओळखले जात होते. डुप्लिकेट अमिताभ बच्चन अशी ओळख त्यांनी मिळवली होती.

🔴फिरोज खान यांची कारकीर्द

फिरोज खान यांनी अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘भाबीजी घर पर हैं!’, ‘जिजा जी छत पर हैं’, ‘साहेब बीबी और बॉस’, ‘हप्पू की उल्टान पलटन’ आणि ‘शक्तिमान’ या मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला. याशिवाय त्यांनी गायक अदनान सामीचे सुपरहिट गाणे ‘थोडी सी तू लिफ्ट करा दे’सह अनेक म्यूझिक गाण्यांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले होते.

🟥पुण्याच्या अपघात प्रकरणानंतर नागपूर पोलीस घेत आहेत ‘ही’ काळजी.- आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांची पत्रकार परिषेदेत माहिती.

नागपूर :- प्रतिनिधी

सध्या राज्यभरामध्ये पुण्यामध्ये झालेल्या अल्पवयीन मुलाने दारु पिऊन केलेल्या अपघाताची चर्चा आहे. पुण्यातील बड्या बिल्डरच्या लेकाने कल्याणीनगर परिसरामध्ये केलेल्या या अपघातामुळे दोन जणांचा जीव देखील गेला आहे. यामुळे हे प्रकरण जोरदार चर्चेमध्ये आले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यामध्ये लक्ष घालत आहेत. दरम्यान, नागपूरमध्ये देखील पुण्याच्या या प्रकारामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. नागपूर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषद घेत पोलीस यंत्रणा घेत असलेल्या उपाययोजना सांगितल्या. त्याचबरोबर नागपूर शिक्षण विभागाध्ये झालेला मोठा घोटाळ्यावर देखील पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

🔴पब आणि बार संबंधीत कारवाई

पुण्यातील धर्तीवर नागपूरमध्ये देखील पोलीसांनी पब आणि बार संदर्भात कडक नियम केले आहेत. पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल म्हणाले, “पब आणि बार संदर्भात सुरुवातीपासून कडक भूमिका घेतली आहे. कुठल्याही घटनेची माहिती मिळताच 144 crpc नुसार कारवाई करतो. पब किंवा बारमध्ये काही घडल्यास कारवाई करतो. आत्तापर्यंत 7 बार वर कारवाई केली असून ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली आहे. बारमध्ये 18 वर्षापेक्षा कमी असल्यास प्रवेश देऊ नये. मद्य पिण्यासाठी 25 वर्षाची अट आहे. त्याचे पालन करण्याचा सूचना दिल्या आहेत. जे दारू पिऊन बाहेर जातात त्यांना गाडी चालवू देऊ नये, डान्स करताना भांडण झाल्यास आम्हाला कळवावे असे सांगितले आहे. निवडणूक काळात आम्ही मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली आहे. उत्पादन विभागाकडे संपूर्ण जिल्हा असतो, त्यांना गरज पडल्यास आमची मदत मागितल्यास आम्ही देतो,” अशी माहिती रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली.

🟥आरटीई घोटाळा प्रकरण

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून 3 किलोमीटरच्या परिसरात ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेश दिला जातो. मात्र काही पालकांनी दलालांच्या मदतीने बोगस कागदपत्रांच्या आधारे नामांकित शाळेत प्रवेश मिळवला आरटीई (राईट टू एज्युकेशन) म्हणजेच शिक्षण हक्क कायद्यांतर्गत नागपुरातील विविध शाळेत बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रवेश मिळवल्याचे प्रकार नागपूरमध्ये घडले आहेत. या प्रकरणावर देखील रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. सिंगल म्हणाले, “मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. घरझडतीमध्ये डॉक्युमेंट मिळालेले आहेत. 4 ते 5 लोक अटकेत असून जे आरोपी आहेत त्यांना अटक करणार आहे. शासनाची फसवणूक करणे गंभीर गुन्हा आहे. काही काळापूर्वी शासनाच्या समितीत मुख्य आरोपी शाहिद शरीफ होता. त्याने शासनाची फसवणूक केली आहे. बनावट कागदपत्रे तयार केली आहे. बनावट कागदपत्रे कोणी बनवले? कसे बनवले? याची चौकशी सुरू आहे. सायबर गुन्ह्याबाबत जागरूकता करणे आवश्यक आहे. लोकांचे अधिकार काय आहेत हे माहीत असणे आवश्यक आहे. सायबर पोलीस स्टेशन मध्ये जे तक्रारी येतात तर त्यांनी लगेच गुन्हा दाखल करावा अशा सूचना आहेत,” अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

🛑नालेसफाईचा मुंबई महानगरपालिकेचा दावा धादांत खोटा, नालेसफाई नव्हे तर निव्वळ ‘हाथ की सफाई’ – प्रा. वर्षा गायकवाड.

( नालेसफाईच्या कामातील गैरव्यवहारात भाजपाचेही हात बरबटलेले, भाजपा जबाबदारी झटकू शकत नाही.)

मुंबई. – प्रतिनिधी.

मुंबईत मान्सूनपूर्व नालेसफाईसाठी सत्ताधारी पक्ष आणि सरकार नियुक्त मुंबई महानगरपालिका प्रशासकानी करदात्यांचे २५० कोटींहून अधिक रुपये खर्चूनही कामाचे वास्तव भयावहच आहे. अनेक भागात अजून ५० टक्केही काम झालेले नाही. महापालिका प्रशासकाने नालेसफाईच्या कामाची अधिकृत आकडेवारी जनतेसमोर विस्तृतपणे मांडावी व नालेसफाई घोटाळ्याची चौकशी त्वरित करून सर्व दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा.वर्षा गायकवाड यांनी केली आहे.ज्ञनालेसफाईवर बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ७५ टक्के नालेसफाईचे काम झाल्याचा मुंबई महापालिकेचा दावा धादांत खोटा आहे. अनेक भागांत नालेसफाईची कामे झालीच नाहीत हे वास्तव आहे. अनेक ठिकाणी गाळ, कचरा, राडारोडा अजून तिथेच पडून आहे. प्रत्यक्षात ५० टक्के पेक्षाही कमी काम झाले आहे, ते ही समाधानकारक नाही. सत्ताधारी पक्ष आणि पालिका प्रशासनाच्या भ्रष्ट व ढिसाळ कारभारामुळे यंदाही मुसळधार पाऊस झाल्यास मुंबई तुंबण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ही नालेसफाई नव्हे तर सत्ताधारी, महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये ‘सेटिंग’ झालेली निव्वळ ‘हाथ की सफाई’ आहे.नालेसफाईबद्दल लोकांमध्ये असलेला तीव्र आक्रोश लक्षात घेता भाजपा या पापामधून स्वतःचे हात झटकण्याचे प्रयत्न करत आहे पण या महाघोटाळ्यात ते देखील तितकेच वाटेकरी आहेत हे जनता जाणून आहे.तेव्हा भाजपाला यातून पळ काढता येणार नाही, मुंबईकरांना हिशोब तर द्यावाच लागेल, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.