🟥डोंबिवलीच्या केमिकल कंपनीत 4 बॉयलरचे स्फोट. तिघांचा मृत्यू,.- मंत्री उदय सामंत यांची माहिती.
🛑हरपवडेतील रासुबाई देवीचे मंदिर व पुज्या-अर्चा पुर्ववत चालु करावी, अन्यथा “आत्मदहन”..जिल्हाधिकारी कोल्हापुर यांना निवेदन.
ठाणे :- प्रतिनिधी
डोंबिवली एमआयडीसीमधील फेज 2 मधील एका केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर धुरांचे मोठे लोट परिसरात पसरले.आगीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
🟥घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. कंपनीजवळ एका वाहनाच्या कंपनीचे शोरुम आहे. या कंपनीपर्यंत ही आग पसरली आहे.30 ते 40 कामगार या आगीत जखमी झाले आहेत.आगीची भीषणाता पाहून उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे येथून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. वाढत्या तापमानामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे अवघड झाले आहे.स्फोट झाल्यानंतर अनेक वस्तू हवेत उडाल्या. आगीची माहिती मिळाल्यावर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
-दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्फोटानंतर कंपनीत किती जण अडकले होते, याबाबत माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या स्फोटाबाबत माहिती दिली आहे.’डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. 8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली असून, तेही 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाच्या चमू पाचारण करण्यात आल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
🛑हरपवडेतील रासुबाई देवीचे मंदिर व पुज्या-अर्चा पुर्ववत चालु करावी, अन्यथा “आत्मदहन”..जिल्हाधिकारी कोल्हापुर यांना निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील मौजे. हरपवडे गावचे ग्रामदैवत रासुबाई देवीचे मंदिर गेली ०६ महिने पुज्या-अर्चासाठी व कुलुपबंद आहे. याबाबत देवदास गुरव हरपवडे यांनी जिल्हाधिकारी सह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व संबंधित अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मागील अनेक महिन्यापासून मंदिर बंद असल्याने हरपवडे गावातील व पंचक्रोशीतील भक्तांना याची अडचण निर्माण होत आहे. गावातील काही मोजक्या राजकीय मंडळीमुळे संपूर्ण गावच्या रासूबाई देवीच्या भक्तांना अडचण निर्माण झाली आहे. तरी आपण यावर योग्य तो निर्णय घेऊन सदर मंदिर खुले करून व पुज्या-अर्चा पुर्ववत चालु करुन द्यावी. रासुबाई देवी मंदिर हे पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्याकडे देखभाल दुरुस्तीसाठी आहे. त्यांच्याकडून गावातील स्थानिक व्यवस्थापण कमिटीकडे देखभाल दुरुस्तीसाठी दिले जाते. स्थानिक देवस्थान समिती हरपवडे व पुजाऱ्यांमध्ये वाद होऊन मंदिराला टाळा ठोकण्यात आला. हा विषय घेऊन पूजारी व ग्रामस्थ दि.१०/०५/२०२३ रोजी पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडे लेखी अर्ज केला. कि, पुज्या अर्चा कोण करते, यांचा द्या. पण पश्चिम महाराष्ट कोल्हापुरकडे पुजा-र्याची नोंद असताना सुद्धा इतके पुज्या-अर्चा बंद ठेवली जाते. हा मला पडलेला मोठा प्रश्न आहे. यामध्ये अस मला वाटत.
हरपवडे गावची ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिताचे कारण पुढे करून आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही हरपवडे या गावी येऊन आपल्याला निर्णय दिला जाईल. असे तहसीलदार कार्यालय आजरा या ठिकाणी आश्वासन देऊन गेले, त्यानंतर वेळोवेळी पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर या ठिकाणी अर्ज देऊन सुद्धा ते आजतागायत हरपवडे या गावी फिरकलेच नाहीत. तसेच लोकसभा निवडणूक २०२४ यावर बहिष्कार टाकण्यात आला होता. पण तहसीलदार आजरा यांच्या लेखी आश्वासनानंतर तो बहिष्कार मागे घेऊन, दि. १३/०५/२०२४ रोजी तहसीलदार कार्यालय आजरा येथे बैठक घेण्यात आली. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांनी वरिष्ठाशी चर्चा करून दोन दिवसात निर्णय कळवतो असे आश्वासन देऊन गेले. त्यानंतर अधिकारी मिटके फोनवरुन चौकशी केली असता, कळवलेले आहे. व आपल्याला एवढी का गडबड लागले असे सांगण्यात आले. यामुळे राजकीय वादातून देवाची पूजाअर्चा बंद का यामुळे आमच्या खालील मागणी आहेत.
चौकट.
१) हरपवडे गावच्या रासुबाई मंदिराच्या पुजा अर्चा जानुन-बुजुन करण्यांपासुन बंद करून ०६ महिने वंचित ठेवले आहे.
२) रासुबाई मंदिर हे भक्तांना, पश्चिम महाराष्ट कोल्हापुर
यांच्याकडुन खुले करण्यात यावे.
३) देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट कोल्हापुर यांचेकडे पुजा-अर्चाची नोंद आहे किंवा नाही याचे लेखी पत्र मिळावे.
४) दि.२७/०५/२०२४ पर्यंत आपण मंदिर खुले करुन व पुर्वीप्रमाणे
पुज्या-अर्चा करण्यासाठी आदेश द्यावेत.
५) अन्यथा मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार दिनांक
२८/०५/२०२४ रोजी “आत्मदहन” करणार.., याची नोंद घ्यावी.
या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहिल. व लवकरच
दि.२७/०५/२०२४ रोजी आपण रासुबाई देवीचे मंदिर भक्ताना खुले करुन देऊन पुर्वीप्रमाणे पुज्या-अर्चा करण्यासाठी आदेश द्यावेत. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर देवदास बळवंत गुरव यांची सही आहे.