🛑राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांचा आजऱ्याच्या चौकातील पुलाचे काम होणार नाहीच..- स्पष्ट भूमिका.
( का? होणार नाही खुलासा देण्याची मागणी. )
🛑देशात संस्कृती टिकवण्याची नितांत गरज ! ह.भ.प धना पाटील जिल्हा अध्यक्ष.- अखिल भारतीय वारकरी मंडळ.
🛑आजरा एसटी आगाराच्या भोंगळ कारभाराबाब बैठक घेणेबाबत.- प्रवाशी संघटनेचे निवेदन.
आजरा.- संभाजी जाधव.

आजरा येथील धर्मवीर संभाजी महाराज चौकातील पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी व्हावे अशी मागणी आजरा वासियांची होत होती पण अद्यापही याबाबत राष्ट्रीय महामार्गाचे येथील पुलाचे काम होईल असे वाटत नाही. दि. २२ रोजी पुन्हा आजरा अन्याय निवारण समितीने विनंती पुर्वक राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना घेराव घालुनही या ठिकाणी पूल का व्हावा याबाबत भूमिका मांडत गरज असल्याने आपण या ठिकाणी पूल करावा अशी विनंती केली. अधिकारी आपल्या मताशी व झालेल्या सर्वे प्रमाणे काम करणार अशी भूमिका घेत आहेत.
याबाबत झालेला सर्वे चुकीच्या पद्धतीने झालेला असून या मार्गावर लहान – लहान पुलाचे सर्वे घेतले पण शहरातील मुख्य पुलाचा सर्वे कसा झाला नाही. याबाबत सर्वे करणारी अधिकारी यांनी सर्वे करून सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे दिला आहे. आता यामध्ये बदल होऊ शकत नाही. असे अधिकारी सांगत आहे. पण मुळात सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग झाला आहे. मग सदर सर्वे करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कशासाठी दिला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वर्ग झाल्यानंतरच राष्ट्रीय महामार्गाचा सर्वेला परवानगी मिळाली आहे. मग यामध्ये बांधकाम विभागाचा संबंध का? जोडला जात आहे.
गुरुवार दि.२३ रोजी तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलण्यात आलेली असल्याचे अन्याय निवारण समिती यांच्याकडून समजते. परंतु काही झालं तरी सद्यस्थितीत व सदर पुलाचे काम आपल्याकडे नोंद असलेले आम्ही सदर पुलाचे काम करणार नसल्याचे संबंधित अधिकारी सांगत आहेत. याला पर्याय आजरा तालुक्यातील किंवा आजरा शहरातून ज्यादा चा खर्च वर्गणी स्वरूपात द्यावा लागेल का? राष्ट्रीय महामार्गाला…. याबाबत आजरा वासियानी विचारणा केली पाहिजेत {. आजरा शहरातून जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग याची थोडीफार जबाबदारी आजरा नगरपंचायत यांची आहे. परंतु लेडओहळ मधील कचरा देखील मागील पाच वर्षापासून काढला नसल्याचे दर्शनी दिसते. या ठिकाणी पुल व्हावा. यासाठी आजरा शहरातील नागरिक व अन्याय निवारण समिती धडपडत असताना किंवा शहरातील काम लवकर व्हावं यासाठी प्रयत्न करत असताना आजरा नगरपंचायत मधील काही लोकप्रतिनिधी व नगरपंचायत याकडे बघ्याची भूमिका घेत कानारोळा करत असल्याचे समजते. दि २३ रोजी तहसील कार्यालय या ठिकाणी अंतिम बैठक होऊन याबाबत योग्य मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे परंतु राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी सदर पुलाचे काम करणार नसल्याची मानसिकता दिसत आहे.. }
🛑देशात संस्कृती टिकवण्याची नितांत गरज ! ह.भ.प धना पाटील जिल्हा अध्यक्ष.- अखिल भारतीय वारकरी मंडळ.
आजरा.- प्रतिनिधी.

सामाजीक कार्यातून पुण्य मिळवण्यासाठी, सेवा भावी असावे, अहंकार आणि गर्वाने प्रगती होत नाही. भ्रष्टाचारामुळे देशाचे समाजाचे नुकसान होत असून, निकोप समाजासाठी देशात संस्कृती टिकवण्याची नितांत गरज असल्याचे मत हभप धना पाटील जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांनी सिरसंगी ता आजरा येथील वारकरी मेळावा व आजरा तालूका कार्यकारणी समिती उदघाटन सोहळा प्रसंगी व्यक्त केले. स्वागत सि आर देसाई यांनी तर प्रास्ताविक हभप गौरव सुतार तालूका अध्यक्ष यांनी केले
पुढे बोलताना हभप अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अभिनंदन करून समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी वारकरी मंडळाने पुढं यावे इतरांना मोठे करा तुम्ही मोठे व्हावे मुलांना चांगले संस्कार देवून, आध्यात्मिक सांगड घालावी. मोबाईल वापर कमी करत, कृतीशीलता रहावे. असा सल्ला देत अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विचार गावा गावात पोहोंचविण्याचे आवाहन केले. काॅ. संपत देसाई यांनी वारकरी चळवळ ही जाती भेदाच्या पलिकडे समतेचा पुरस्कार करणारी असून, ही चळवळ पुढे नेण्याकरिता आजरा तालूका वारकरी भवन उभारणी साठी जागेची मागणी चे निवेदन देण्यात आले आहे. त्यासाठी आम्ही वारकरी मंडळ सोबत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हभप कृष्णात खाडे, सिरसंगी गावचे सरपंच संदीप चौगले, कारखाना संचालक सुभाष देसाई, बाळासाहेब सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आजरा चंदगड गडहिंग्लज येथून आलेल्या दिंड्याना व कार्यकारणी समितीला प्रमाणपत्राचे मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष संतू कांबळे, गंगाराम येडगे, नामदेव सुतार, जानबा धडाम, पांडूरंग जोशिलकर, लक्ष्मण शिंत्रे, संभाजी पालकर, रेणुका सुतार, दिपाली गुरव, मंगल बुडके, सुशिला परीट, महादेव सुतार, हरिबा आडे, शिवाजी सुतार, गणपती कांबळे यांच्यासह वारकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन संजय घाटगे यांनी केले .आभार बाबूराव आडे यांनी मानले.
🛑आजरा एसटी आगाराच्या भोंगळ कारभाराबाब बैठक घेणेबाबत.- प्रवाशी संघटनेचे निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा एसटी आगाराच्या भोंगळ कारभाराबाब बैठक घेणेबाबत.- प्रवाशी संघटनेचे निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा आजरा जि. कोल्हापूर येथे एसटी आगार कार्यरत आहे. मात्र गेल्या पाच-सहा वर्षापासून आजरा आगारात प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरु आहे. तसेच आगारात विविध समस्या निर्माण आल्या आहेत. याचा फटका आजरा तालुक्यातील प्रवासी वर्गाला बसत आहे. यामुळे आजरा एसटी आगाराच्या भोंगळ कारभार व समस्या बाबत आपली आपल्या उपस्थितीत दि. ३१ में २०२४ पूर्वी आजरा बसस्थानक येथे बैठक आयोजित करण्यात यावी अन्यथा १ जून २०२४ रोजी एसटी दिनादिवशी आजरा बसस्थानक परिसरात लाक्षणिय उपोषण येईल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष सचिन इंदूलकर सह पदाधिकारी, सदस्य यांच्या सह्या आहेत.