Homeकोंकण - ठाणेअखेर जामीन रद्द!- अल्पवयीन आरोपीला रिमांड होममध्ये ठेवण्याचा निर्णय!( बाल हक्क मंडळाचा...

अखेर जामीन रद्द!- अल्पवयीन आरोपीला रिमांड होममध्ये ठेवण्याचा निर्णय!( बाल हक्क मंडळाचा महत्त्वाचा निर्णय. )

🛑 अखेर जामीन रद्द!-
अल्पवयीन आरोपीला रिमांड होममध्ये ठेवण्याचा निर्णय!
( बाल हक्क मंडळाचा महत्त्वाचा निर्णय. )

पुणे:- प्रतिनिधी.

पुण्यात भरधाव वेगात आलिशान पोर्शे कार चालवून दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यानं अल्पवयीन आरोपीला आज पुण्यातील बाल हक्क मंडळात हजर करण्यात आलं. भरधाव वेगात महागडी कार चालवीत दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण व तरुणीच्या मृत्यूत कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
🛑पोलीस तपासानंतर तो सज्ञान आहे की अज्ञान आहे ते ठरवलं जाणार आहे. आता त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणाचा संपुर्ण तपास करण्यात येणार आहे. त्यानंतर हा अल्पवयीन आरोपी सज्ञान आहे की अज्ञान आहे ते ठरवलं जाणार आहे.या अपघाताचा संपुर्ण तपास होईपर्यंत त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. अपघात प्रकरणाचा तपास पुर्ण झाल्यानंतर तो सज्ञान आहे की अज्ञान ते ठरवले जाईल. तोपर्यंत त्याला १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात ठेवण्यात येणार आहे.

पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याला आता बालसुधारगृहात पाठवण्यात येणार आहे. दारू पिऊन नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवत या अल्पवयीन आरोपीने दोघांचा जीव घेतला, त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द करत अल्पवयीन आरोपी हा सज्ञान आहे की नाही हे पोलिस ठरवतील असंही बाल न्याय मंडळाने म्हटलं आहे.

🟥पोलिसांनी त्याच्यावर पुन्हा नवीन कलम लावलं आणि त्याचा जामीन रद्द करावा अशी मागणी केली होती. त्यानंतर आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला.

🟥पोर्शे गाडीच्या कॅमेऱ्यातील अपघाताचा व्हिडीओ तपासणार
कल्याणी नगरमधील ‘हिट ॲंड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपी चालवत असलेल्या मोटारीमधील कॅमेऱ्याने टिपलेले अपघाताचे चित्रीकरण तपासण्यात येणार आहे. या चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांना गुन्ह्याच्या तपासात मदत होणार आहे.
🅾️कल्याणीनगर येथे रविवारी (दि.१९) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास भरधाव आलिशान मोटारीने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात आयटी अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत दोन्ही पब, घटनास्थळ आणि येरवडा पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन आरोपीने मद्य सेवन केल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. आता पोलिस त्या आलिशान मोटारीतील कॅमेऱ्याचे चित्रीकरण तपासणार आहेत. याबाबत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी बोलताना दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.