गावचा सिटीसर्वे मनमानी पद्धतीने.- नव्याने करण्याची मागणी.- वझरे ग्रामपंचायतचे
( जिल्हा अधीक्षक सो, भूमी अभिलेख कोहापूर यांना निवेदन )
आजरा.- प्रतिनिधी.
चुकीच्या व मनमानी पद्धतीने झालेला सिटी सर्व्हे नव्याने करून मिळणे बाबत सरपंच ग्रामपंचायत मौजे वझरे, ता आजरा जि. कोल्हापूर
ग्रामपंचायत मौजे वझरे ता आजरा यांनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोहापूर यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ग्राम पंचायत मौजे वझरेचा सन २०२२ मध्ये झालेला सिटी सर्व्हे हा अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालेला आहे. सदरचा सिटी सर्व्हे ग्रामपंचायतीने दिलेल्या माहितीच्या आधारे न करता मनमानी पद्धती ने केला आहे. मोजणी अधिकारी यांनी
कोणत्याही जागेचे प्रत्यक्ष मोजमाप न करता सनद वर क्षेत्रफळच्या नोंदी घातल्या आहेत. काही खाते दारांचे क्षेत्रफळ कमी तर काहींचे जास्त नोद झाले आहे. काहींचे तर नोंदच झाले नाही. सिटी सर्व्हे चुकीचा झालेबद्दल अनेक तक्रारी ग्रामपंचायत कार्यालयाकडे प्राप्त होत आहेत. ज्या जागेवर वाद न्यायालयात प्रलंबित आहे. ती जागा सामाईक ठेवणे आवश्यक असताना ती एकाच्याच नावावर लावणेत आली आहे. तसेच एका सिटी सर्व्हे नंबर वर १० वेगवेगळ्या मिळकत धारकांची नोंद केली आहे. त्यामुळे कोणच्या नावावर किती क्षेत्र लागले आहे याची महिती समजून येत नाही. सिटी सर्व्हे झालेनंतर सुनावणी घेणे आवश्यक असताना अशी
कोणतीच सुनावणी अथवा सूचना आपले कार्यालयाकडून ग्रामस्थांना प्राप्त झाली नाही. म्हणजेच सदरचा सिटी सर्व्हे हा ग्रामपंचायतीला व ग्रामस्थांना विश्वासात न घेता परस्पर केलेला दिसून येतो. तरी भविष्यात मिळकत धारकांच्या मध्ये सिटी सर्व्हे वरून वाद विवाद होण्याची व त्यातून त्यांचे मानसिक व आर्थिक नुकसान शक्यता आहे. या करिता आपण वैयक्तिक लक्ष घालून ग्रामपंचायत मौजे वझरे ता. आजरा कडील सिटी सर्व्हे नव्याने करणेत यावा. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर
सरपंच शांताबाई गुरव, संदीप गुरव, गणेश गुरव, उमेश पाटील यांच्या सह ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या आहेत.