🟥पुणे-सोलापूर मार्गावर होर्डिंग कोसळलं.- बँड पथकासह घोडाही अडकला.- अनेक वाहनांचे नुकसान..
🛑गळ्यातील सोन्याचा जिन्नस हिसकावून घेऊन पळ काढल्याची आजरा तालुक्यातील दुसरी घटना.
पुणे :- प्रतिनिधी.
पुणे- सोलापूर रस्त्यावरील कवडीपाट टोल नाका जवळील भलं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. हे होर्डिंग गुलमोहर लॉन्स या कार्यालयासमोरील होर्डिंग होतं. या होर्डिंगखाली मिरवणुकीसाठी आणलेला बँड पथकातील घोडा अडकला आहे. होर्डिंग अंगावर पडल्यामुळे घोडा गंभीर जखमी झाला आहे. तसेच गुलमोहर लॉन्स कार्यालयासमोर दुचाकी, कारसह बँड वादकांच्या वाहनांचं मोठे नुकसान झाले आहे. मिरवणुकीसाठी आणलेला घोडा सुद्धा होर्डिंग अंगावर पडल्यामुळे गंभीर जखमी झाला आहे.
🟥पुणे-सोलापूर मार्गावरील कवडीपाट टोल नाका जवळ गुलमोहर लॉन्स या कार्यालयासमोरच रस्त्याकडेला असलेले होर्डिंग कोसळले. याखाली दुचाकी, चारचाकी वाहनांसह बँड पथकाच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. यावेळी नवरदेवाला मिरवणुकीसाठी आणलेला घोडा सुद्धा होर्डिंग अंगावर पडल्यामुळे गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत बँड पथकाचं मोठं नुकसान झालं असून त्यांचा नवरदेवासाठी आणलेला घोडाही गंभीर जखमी झाला आहे.
🟥पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर या ठिकाणी ही घटना घडली आहे. या घटना वारंवार घडत असूनही प्रशासनाकडून काहीच उपाय योजना होत नसल्याचे समोर आले आहे. होर्डिंग गुलमोहर लॉन्समध्ये लग्न समारोह पार पडला होता. यावेळी बँड पथक कार्यालयाबाहेर उभे होते. त्यावेळी होर्डिंग कोसळले व त्याखाली बँड पथकासह मिरवणुकीसाठी आणलेला घोडाही अडकला होता. होर्डिंग अंगावर पडल्यामुळे घोडा गंभीर जखमी झाला आहे. त्याला बाहेर काढण्यात आले. गुलमोहर लॉन्स कार्यालयासमोर अनेक दुचाकी, कार पार्किंग केल्या होत्या. त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
🛑गळ्यातील सोन्याचा जिन्नस हिसकावून घेऊन पळ काढल्याची आजरा तालुक्यातील दुसरी घटना.
आजरा .- प्रतिनिधी.
गळ्यातील सोन्याचा जिन्नस हिसकावून घेऊन पळ काढल्याची आजरा तालुक्यातील दुसरी घटना घटली आहे. पहिली घटना
शेळप ता. आजरा येथील महिलेची सोन्याची माळ लांबवल्याची घटना ताजी असतानाच बहिरेवाडी ता. आजरा येथील महादेवी परशराम चौगुले या महिलेचे अज्ञात दुचाकी स्वारांनी सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेऊन पळ काढल्याची घटना घडली आहे. महादेवी चौगुले व आक्काताई शिंदे या दोघी शेताच्या दिशेने चालल्या होत्या. दरम्यान अज्ञात दुचाकी स्वारांनी त्यांना रस्त्यात गाठून सोलापूरच्या दिशेने जाणारा रस्त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली. ही चौकशी करत असतानाच त्यापैकी एकाने महादेवी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले व गडहिंग्लजच्या दिशेने सुसाट निघून गेले. शनिवारी सकाळी हा प्रकार घडला याबाबतची फिर्याद महादेवी चौगुले यांनी आजरा पोलिसात दिली आहे.