आजऱ्यात शिवसेनेचा.- नगरपंचायत पाणी प्रश्न व राष्ट्रीय महामार्ग बाबत.- रस्ता रोको..
( नगरपंचायत व राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना धरले धारेवर.)
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा शहरात मागील दोन महिन्यापासून राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने आजर्याच्या प्रमुख चौकातील रस्ता खुदाई करून ठेवला आहे परंतु नगरपंचायत पाईपलाईन या प्रश्नाबाबत रस्त्याचे काम न केल्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास होत असे बाबत आजरा शिवसेना उबाठा गटाच्या वतीने आजरा येथील संभाजी महाराज चौकात रास्ता रोको करून नगरपंचायत व राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये
संकेश्वर बांधा राष्ट्रीय महामार्ग आजरा येथील संभाजी चौक ते भाई-भाई चित्रमंदिर हा अविस्थेतील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, पोलीस प्रशासनाने संभाजी चौक ते आजरा बस स्थानकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेली वाहने व
खाजगी लक्झरी बसेस शहराबाहेर उभ्या करण्याबाबत सूचना कराव्यात., रस्त्याशेजारी असणारे दुतर्फा पदरचारींसाठी खुले करावेत., नवीन निळ पाणी योजनेकरिता खोदकाम तातडीने मुजवून घ्यावे, ऐतिहासीक व्हिक्टोरीया पुलावर डागडुजी व याठिकाणी विरंगुळा केंद्र तयार कारावे. सदर पुलाचे जतन ठेवावे, महामार्ग कामात प्रचंड वृक्षतोड झालेली आहे. पावसाळ्यात वृक्ष लागवडीसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी वरील विषयावर विचार करून आठ दिवसात योग्य ती कार्यवाही करावी यावेळी सुनिल शिंत्रे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख, शहरप्रमुख ओमकार माद्याळकर, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील ता. प्रमुख युवराज पोवार , गडहिंग्लज ता. प्रमुख दिलीप माने, युवा सेना अवधुन पाटील, महेश पाटील, उप.ता.प्रमुख संजय येसादे, दयानंद भोपळे, सह पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनाला पाठिंबा जनहित पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोरवी, सामाजिक कार्यकर्ते सलीम लतिफ आंदोलनाला उपस्थिती दर्शवली. अर्धा तास रस्ता रोको करण्यात आला यामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प होऊन वाहतुकीच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलकांनी आपल्या आंदोलनाचा प्रवाशांना व वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाचे म्हणणे ऐकून लागलीच आंदोलन रस्ता रोको थांबवून प्रशासनाला सहकार्य केले. यावेळी पोलीस बंदोबस्त होता.

चौकट.
शिवसेनेचे पदाधिकारी यांनी प्रशासकीय अधिकारी नगरपंचायत व राष्ट्रीय महामार्ग यांना रास्ता रोको संपल्यानंतर अधिकाऱ्यांना घेरावा घालून विविध प्रश्नांचा भडिमार केला. व येणाऱ्या आठ दिवसात सदर रस्त्याचे काम नाही झाल्यास यापेक्षाही मोठे आंदोलन हातात घेण्यात येईल याबाबतची कल्पना दिली..