🛑सिंधुदुर्ग जिल्ह्याचा असाक्षरांच्या परीक्षेचा निकाल १०० टक्के.
🛑कोकणातील रेल्वेप्रवासी वेटिंग वरच.- दादर /मडगाव लोकल कागदावरच.
सिधुदुर्गनगरी ११: प्रतिनिधी.

केंद्रपुरस्कृत उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रम (NBSK) सन 20 २२ २७
अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दि. १७ मार्च, २४ रोजी घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षेला जिल्ह्यातून २२५ असाक्षर प्रविष्ठ झाले होते. या सर्व असाक्षरांची परीक्षा जवळच्या प्राथमिक / माध्यमिक शाळेमध्ये घेण्यात आली. सदर परीक्षेचा निकाल दि. ६ मे २४ रोजी राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेच्या (NIOS) www.nios.ac.in or https://results.nios.ac.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेला आहे. या परीक्षेत २२५ असाक्षर नवसाक्षर झाले. सदर परीक्षेच्या निकालाची सांख्यिकीय माहिती खालीलप्रमाणे आहे.
ज्या असाक्षरांची नोंद उल्लास ॲपवर करण्यात आली होती, अशाच असाक्षरांना परीक्षेला बसण्याची परवानगी होती. उल्लास ॲपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांची संख्या २५६ होती. पैकी २२५ असाक्षर परीक्षेला प्रविष्ठ होते. ३१ असाक्षर परीक्षेस प्रविष्ठ झाले नाहीत. उल्लास ॲपवर नोंद होणाऱ्या असाक्षरांची परीक्षा चालू वर्षी माहे सप्टेंबर, २० २४ मध्ये आयोजित केली जाणार आहे.
तपशील मुद्दा परीक्षा दिलेल्या असाक्षरांची संख्या उत्तीर्ण नवसाक्षर संख्या सुधारण आवश्यक असा शेरा नमूद असलेले असाक्षर संख्या शेकडा उत्तीर्ण
पुरूष (M) २६ २६ 0 १00
स्त्रिया (F) १९९१ ९९ 0 १00
तृतीयपंथी (T) 0 0 0 —
एकूण २२५ २२५ 0 100
जिल्हाधिकारी किशोर तावडे म्हणाले, सन २0 २३- २ ४ मध्ये दि. १७ मार्च, २४ रोजी घेण्यात आलेल्या असाक्षरांच्या परीक्षेचा निकाल १00 टक्के लागला. उत्तीर्ण परीक्षार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच सर्व प्राथमिक / माध्यमिक शिक्षक, सर्व स्वयंसेवक, सर्व सर्वेक्षक, सर्व मुख्याध्यापक व तालुकास्तरावरील सर्व अधिकारी-कर्मचारी यांचेही अभिनंदन. सिंधुदुर्ग जिल्हा १०० टक्के साक्षर करण्यावर सर्वांनी भर द्यावा.
मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख म्हणाले, सन २०२२ ते सन २०२७ या कालावधीत नव भारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून सन २०२४- २५मध्ये ४७२१ असाक्षरांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून असाक्षर व्यक्तींनी आपली नावे आपल्या गावातील प्राथमिक / माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक यांच्याकडे नोंद करावीत व साक्षरतेचा टक्का वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
शिक्षण संचालनालय (योजना) तथा सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे शिक्षण संचालक, डॉ. महेश पालकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा साक्षरतेत प्रथम क्रमांकावर असून चालू वर्षी एकूण २२५ असाक्षरांनी परीक्षा दिली. असाक्षरांचा निकाल १०० टक्के लागला असून साक्षरतेत २२५लोकांची भर पडली आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व नवसाक्षरांना साक्षरतेचे प्रमाणपत्र मुख्याध्यापक यांचेकडे शिक्षण संचालनालय (योजना) यांचेमार्फत दिली जाणार आहेत.
वैयक्तिक निकाल प्राप्त करण्यासाठी Path www.nios.ac.in or https://results.nios.ac.in ला भेट देणे
Examination / Result Click here for Result ULLAS Nav Bharat Saksharta Karyakram Marksheet Cum Certificate Enrollment Number, Year, Month आणि Captcha टाकून Submit बटनावर Click करावे Print
केंद्र शासनाने वरीलप्रमाणे संकेतस्थळावर ऑनलाईन गुणपत्रक / प्रमाणपत्र दि. ६ मे २० २४ रोजी माहितीसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. सदरील वैयक्तिक गुणपत्रक / प्रमाणपत्राची संकेतस्थळावरून ऑनलाईन Print घेता येईल. गुणपत्रक / प्रमाणपत्राची प्रमाणित हार्ड कॉपी शिक्षणाधिकारी (योजना) यांच्यामार्फत सर्व संबंधितांना मुख्याध्यापकांमार्फत यथावकाश वितरीत करण्यात येईल. अशी माहिती सदस्य सचिव, जिल्हास्तर नियामक परिषद/ कार्यकारी समिती, नव भारत साक्षरता कार्यक्रम तथा शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, प्रदीपकुमार कुडाळकर यांनी दिली आहे.
🛑 कोकणातील रेल्वेप्रवासी वेटिंग वरच;दादर मडगाव लोकल कागदावरच.
सिधुदुर्गनगरी ११: – प्रतिनिधी.
गणेश चतुर्थी सणाच्यानिमित्ताने कोकण रेल्वे गाड्यांचे अवघ्या काही मिनिटांत आरक्षण फुल्ल झाले. त्यामुळे पुन्हा एकदा याप्रकराची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. चाकरमानी ये जा मोठ्या प्रमाणात करत असल्याने काही रेल्वे कायमच हाऊसफुल्ल धावत आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी पर्यंत कायमस्वरूपी गाडी सोडण्याची मागणी केली जात आहे.परंतु रेल्वे प्रशासनाकडून या मागणीला केराची टोपली दाखवत आहेत वाढत्या प्रवाशी संख्येमुळे दादर सावंतवाडी मडगाव पर्यंत नियमित रेल्वे सोडणे क्रमप्राप्त झाले आहे
नियमित हाऊसफुल वेटिंग वर असलेल्या गाड्या आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे तोट्यात म्हणणाऱ्या रेल्वे प्रशासनाने तात्पुरत्या रेल्वे गाड्या न सोडता कायमस्वरूपी दादर सावंतवाडी मडगाव नियमित रेल्वे सोडावी अशी सातत्याने मागणी होत आहे परंतु या मागणीला प्रतिसाद मिळत आहे उद्या नव्याने निवडून येणाऱ्या खासदारांकडे याबाबतअधिक प्रकर्षाने या मागणीकडे लक्ष द्यावा लागेल असे प्रवाशांचे म्हणणे आहे
कोकणकन्या एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, दिवा पॅसेंजर, जनशताब्दी एक्स्प्रेस अशा रेल्वेगाड्यांना गर्दी पाहून कायमस्वरूपी रेल्वे सावंतवाडी पर्यंत धावली पाहिजे. या रेल्वे गाड्यांना कायमच गर्दी असते. रेल्वे तिकीट आरक्षण असले तरी आरक्षण असलेल्या जवळपास वेटींग वर असलेले प्रवासी बसतात त्यामुळे आरक्षण करुनही प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच अचानक जाणाऱ्या, आजारी असलेल्या, किंवा अन्य
कारणांमुळे प्रवाशांना जावे लागते त्यांना तिकीट कन्फर्म मिळत नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. कोकण रेल्वे कोकणातील प्रवाशांची गैरसोय दूर करत नाही तसेच काही वेळा रेल्वे गाड्या उशिराने धावत असतात. कोकणातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी सावंतवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा दादर पर्यंत दुसरी एखादी एक्स्प्रेस सोडून प्रवाशांना दिलासा मिळाला पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. सावंतवाडी टर्मिनस लवकरच पूर्ण करून महाराष्ट्रातील कोकण रेल्वेचे सावंतवाडी जंक्शन बनले पाहिजे. तरच चाकरमानी लोकांची किमान गैरसोय टळू शकते.कोकणासाठी कोकण रेल्वे सुरू झाली परंतु कोकणातील प्रवाशांपेक्षा गोवा कर्नाटका केरळ व अन्य राज्यातीलच प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे कोकणातील प्रवाशांना आपल्या गावी येणे घरसे विजय होत आहे सध्या रेल्वे प्रशासनाने पनवेल थीम अशा जागा गाड्या सोडल्या आहेत वास्तविक पाहता कोकण कन्या त्यानंतर मुंबईकडे दादर पर्यंत जाणारे लोकल ट्रेन असणे गरजेचे आहे तसेच सकाळी पहाटे पाच नंतर गोव्याकडे जाणारी लोकल ट्रेन असावी अशी सातत्याने मागणी आहे गोव्यात रोजगारासाठी जाणाऱ्या अनेक तरुण व्यावसायिक आणि अनेक प्रवाशांना रुग्नानाते सोयीचे ठरणार असल्याची मागणी सातत्याने करू नये या मागणीकडे ना लोकप्रतिनिधी लक्ष देत नारेल्वे प्रशासन लक्ष देत यामुळे अनेक प्रवाशांना मेंढरा सारखा प्रवास करावा लागत आहेहे गरजेचे असून नव्या खासदारांकडून रेल्वेच्या या प्रश्नांबाबत काय उकल घेतली जाते याकडे प्रवाशांचे लक्ष असून रेल्वे प्रश्नाकडे दखल न घेतल्यास प्रवासी संघटना आंदोलनाच्या पवित्रात असल्याचा इशाराही काही संघटनाने यापूर्वी दिला आहे.