🛑विनापरवाना शर्यती प्रकरणी आयोजकासह बैलगाडी धारकांवर गुन्हा दाखल
🛑 हरपवडे रासूबाई देऊळ बंद- बाबत आजरा तहसील कार्यालयात बैठक संपन्न. तोडगा अद्याप नाही..
आजरा, ता. १३.प्रतिनिधी.
विना परवाना व बेकायदेशीररित्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी आयोजकासह बैलगाडीधारकावर आजरा पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस हवालदार आनंदा शिवाजी नाईक यांनी आजरा पोलीसात फिर्याद दिली आहे. सुळे गावच्या यात्रेनिमित्त (ता. २) सुळे महागाव रोडवर बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. याबाबत कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. या प्रकरणी आज सोमवार (ता. १३) आयोजक विशाल पोवार, बाबासो भोसले, राहुल जाधव, वसंत वाळवे रा. सुळे (ता. आजरा) व प्रकाश बामणे व अन्य चार ते पाच बैलगाडीधारकांवर गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस हवालदार आंबुलकर अधिक तपास करीत आहेत.
🛑हरपवडे रासूबाई देऊळ बंद- बाबत आजरा तहसील कार्यालयात बैठक संपन्न. तोडगा अद्याप नाही..
आजरा.- प्रतिनिधी.

हरपवडे ता. आजरा येथील देऊळ बंद बाबत आंदोलन करून निवेदन देऊन देखील प्रशासनाचे दुर्लक्ष केलेच्या निषेधार्थ. आजरा तालुक्यातील हरपवडे येथील गुरव समाजाने लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असले बाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. याबाबत आजरा प्रशासनाने लागलीच नागरिकांची समजूत काढून निवडणूक झाल्यानंतर बैठकीचे आयोजन करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सांगितले होते. या अनुषंगाने आज दि. १३ रोजी
श्री रासुबाई देवी चे मंदिर खुले करण्यासाठी, आजरा तहसिलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, बैठकीसाठी नायब तहसिलदार म्हाळसाकांत देसाई व देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापुर चे पदाधिकारी श्री. दिंड्डे, उत्तम मिटके व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत बैठक तहसील कार्यालय आजरा येथे संपन्न झाली. बैठकी मधील सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांनी आपण वरिष्ठांशी चर्चा करून दोन दिवसामध्ये श्री रासुबाई देवीच्या मंदिराबाबत निर्णय देऊ असे आश्वासित केले आहे. परंतु मंदिर खुले करण्याबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नसल्याने गुरव समाज संभ्रम अवस्थेत आहे.