Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रउच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बिद्री साखर कारखान्याच्या लेखापरिक्षणाचा मार्ग मोकळा :- बाबा नांदेकर...

उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बिद्री साखर कारखान्याच्या लेखापरिक्षणाचा मार्ग मोकळा :- बाबा नांदेकर माजी सभापती, पंचायत समिती, भुदरगड सत्ताधारी के.पी.पाटील गटाला धक्का.🛑पत्रकरांच्यावर हल्ला करणाऱ्या भेकड प्रवृत्तीचा आजाऱ्यातील पुरोगामी पक्ष संघटनांच्यावतीने जाहीर निषेध.🛑आजऱ्यात सोमवारी पाणी, महामार्ग प्रकरणी. – शिवसेनेचा रास्ता रोको .👇

🛑उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बिद्री साखर कारखान्याच्या लेखापरिक्षणाचा मार्ग मोकळा :- बाबा नांदेकर माजी सभापती, पंचायत समिती, भुदरगड सत्ताधारी के.पी.पाटील गटाला धक्का.
🛑पत्रकरांच्यावर हल्ला करणाऱ्या भेकड प्रवृत्तीचा आजाऱ्यातील पुरोगामी पक्ष संघटनांच्यावतीने जाहीर निषेध.
🛑आजऱ्यात सोमवारी पाणी, महामार्ग प्रकरणी. – शिवसेनेचा रास्ता रोको .👇

गारगोटी :- प्रतिनिधी.

दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना, बिद्री (मौनीनगर) या कारखान्याच्या चाचणी लेखापरीक्षणास (Test Audit) स्थगिती देण्याचा सहकार मंत्र्यांचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्दबादल केला असल्याने कारखान्याच्या लेखापरीक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सत्ताधारी माजी आमदार के.पी पाटील गटास मोठा धक्का बसला असून सत्ताधारी गटाकडून या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता असल्याचे समजते. साखर सहसंचालक, कोल्हापूर यांच्या आदेशानुसार बिद्री कारखान्याचे विशेष लेखापरीक्षण सहकार खात्यामार्फत सुरू करण्यात आले होते. या लेखापरीक्षणास स्थगिती मिळवण्यासाठी बिद्री कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार के.पी.पाटील यांनी राज्याचे सहकारमंत्री नामदार दिलीप वळसे – पाटील यांच्याकडे याचिका दाखल केली होती. सहकार मंत्र्यांनी दि. २० नोव्हेंबर २०२३ रोजी लेखापरीक्षणास स्थगिती दिली होती. सदर निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य दत्तात्रय उगले, महाराष्ट्र राज्य आत्मा कमिटी सदस्य अशोक फराकटे, विजयराव बलुगडे, बाबा नांदेकर आणि विश्वनाथ पाटील (अर्जुनवाडा) आदींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयात दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला. मे. उच्च न्यायालयाने दि. १० मे २०२४ रोजी दिलेल्या निर्णयात लेखापरीक्षणास सहकार मंत्र्यांनी दिलेली स्थगिती रद्द केल्याने कारखान्याच्या लेखापरीक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तथापी साखर कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणेसाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.‌ अर्जदारांच्या वतीने ॲड. प्रशांत भावके यांनी तर सत्ताधाऱ्यांच्या वतीने ॲड. पटवर्धन, ॲड.जहागीरदार यांनी युक्तिवाद केला.

चौकट.

बिद्री कारखान्याचे ऑडिट हिंदुस्थानातल्या कोणत्याही ऑडिटरांना आणून करण्याचे आव्हान वार्षिक सभेत आत्मविश्वासपुर्वक देणाऱ्या चेअरमन माजी आमदार के.पी.पाटील यांनी कारखान्याचा पैसा सर्वोच्च न्यायालयात जाणेसाठी खर्च न करता ऑडिटला सामोरे जावे.
बाबा नांदेकर माजी सभापती, पंचायत समिती, भुदरगड

🛑पत्रकरांच्यावर हल्ला करणाऱ्या भेकड प्रवृत्तीचा आजाऱ्यातील पुरोगामी पक्ष संघटनांच्यावतीने जाहीर निषेध

आजरा – प्रतिनिधी.‌

Oplus_131072

मुरगुड ता कागल येथील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी सकाळच्या पत्रकारांना केलेली मारहाण ही निषेधार्ह असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारी आहे. समाजात घडणाऱ्या घटना निर्भीडपणे मांडण्याचा अधिकार पत्रकारांना आहे. पण सत्य पचनी पडत नसल्याने आणि पराभव समोर दिसत असल्याने राजेखान जमादार यांनी सकाळच्या पत्रकारांना मारहाण केली. ही घटना अत्यंत लाजिरवाणी आहे.
हा हल्ला केवळ एका पत्रकारांवर नसून माध्यमांच्या स्वातंत्र्यावरचा हा हल्ला आहे. त्यामुळे आम्ही या घटनेचा तीव्र निषेध तर करतोच पण असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी मागणी पुरोगामी पक्ष संघटनांच्या वतीने कॉ संपत देसाई, प्रा डॉ नवनाथ शिंदे, प्रकाश मोरुस्कर, दशरथ घुरे, संजय घाटगे, काशिनाथ मोरे, कॉ शांताराम पाटील, नारायण भडांगे, मायकेल बारदेस्कर, नारायण राणे, भीमराव माधव यांनी केली आहे.

🛑आजऱ्यात सोमवारी पाणी, महामार्ग प्रकरणी. – शिवसेनेचा रास्ता रोको .

आजरा.- प्रतिनिधी.

आजऱ्यात सोमवारी रास्ता रोको गेली अनेक महिने आजरा शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत नसल्याने लोकांचे पाण्याविना हाल होत आहेत. नगरपंचायतीला वारंवार लेखी, तोंडी सूचना देवूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
याशिवाय आंबोली मार्गावरील भाई भाई थिएटर ते तहसिल कार्यालय पर्यंतचे काम रखडले आहे.यामुळे वाहतूकीची समस्या निर्माण झाली आहे.किरकोळ अपघात होत आहे. व्यावसायिक व नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.महामार्ग ठेकेदाराचे याकडे दुर्लक्ष आहे. यांच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी ११ वाजता शिवसेना (ठाकरे गट) यांच्या वतीने संभाजी चौकात रास्ता रोको करण्यात येणार आहे. आजरा पोलिस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले आहे.निवेदनावर उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार,शहर प्रमुख ओमकार माद्याळकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.