जाहीर निषेध..
राजेखान जमादार, जिल्हाध्यक्ष, शिवसेना कोल्हापूर (एकनाथ शिंदे गट ) यांच्यावर कडक कारवाई होणेबाबत. आजरा पत्रकारांचे निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन आजरा तालुका व आजरा पत्रकार संघ यांच्यावतीने आजरा पोलीस निरीक्षक व आजरा तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मुरगुड येथे दै.सकाळमध्ये खरी, वस्तुनिष्ठ बातमी लावल्याच्या रागातून राजेखान जमादार यांनी दै.सकाळचे मुरगूड प्रतिनीधी प्रकाश तिराळे (रा.कुरूकली) यांना मारहाण केली आहे. गुरूवारी ता. ९ मे २०२४ रोजी सायंकाळी मुरगूड शहरात ही घटना घडली. पत्रकारिता आणि लोहशाहीला मारक ही घटना असून पत्रकारांवर दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.
या घटनेचा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या, व आजरा पत्रकार संघ यांच्या वतीने आम्ही जाहिर निषेध करीत आहोत.
प्रकाश तिराळे यांनी दिलेल्या बातमीत कोणाच्याही नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. घडलेल्या घटनेचे वॄत्तांकन करण्याचे काम पत्रकार प्रकाश तिराळे यांनी केले आहे.समाजात अनेक घटना घडत असतात. त्याची माहिती संकलीत करून कार्यालयात पोहोचविण्याचे काम पत्रकार करत आले आहेत.त्यांना झालेली मारहाण म्हणजे पत्रकारिता आणि लोकशाहीवर केलेला हा हल्ला आहे. त्यामुळे राजेखान कादरखान जमादार व त्याला सहकार्य करणाऱ्या आसिफखान उर्फ मॉन्टी आसदखान जमादार, संदीप अशोक सणगर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत तातडीने कडक कारवाई करावी ही विनंती. त्याचबरोबर पत्रकार प्रकाश तिराळे यांच्या बरोबरच त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण मिळावे. आजरा ता. अध्यक्ष कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन संभाजी जाधव, आजरा पत्रकार संघ अध्यक्ष बशीर मुल्ला, तसेच रणजीत कालेकर दैनिक सकाळ,, सदाशिव मोरे दैनिक लोकमत, कृष्णा सावंत दैनिक पुढारी, ज्योती प्रसाद सावंत मृत्युंजय न्यूज, प्रा . रमेश चव्हाण आर न्यूज, विकास सुतार विकास न्यूज, अमित गुरव लिंक मराठी, श्रीकांत देसाई प्रेस फोटोग्राफर, सुभाष पाटील लाईव्ह मराठी सर्व दैनिकांचे व चॅनलचे पत्रकार आजरा तालुका कोल्हापूर डिस्ट्रिक्ट वेल्फेअर असोसिएशन. आजरा तालुका सर्व पत्रकार संघ सर्व सदस्य उपस्थित होते.

