Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्र“मलिग्रे हायस्कूल शाळेतील एस.एस.सी.१९९५ च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा”

“मलिग्रे हायस्कूल शाळेतील एस.एस.सी.१९९५ च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा”

“मलिग्रे हायस्कूल शाळेतील एस.एस.सी.
१९९५ च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा”

आजरा.- प्रतिनिधी.‌

मलिग्रे हायस्कूल मलिग्रे या शाळेतील एस.एस.सी.१९९५ या बँचने दि. ०५/०५/२०२४ रोजी २९ वर्षानंतर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी एकत्र येऊन श्री माऊली वारकरी संप्रदाय मंडळ मलिग्रे व कागीणवाडी यांच्या“रौप्य महोत्सव” निमितान्ने ५००० पेक्षा अधिक गावकऱ्यांना महाप्रसाद देऊन साजरा करण्यात आला.
या शाळेतील विद्यार्थी यांनी सन १९८५-१९९५ या वर्षातील सर्व मराठी व हायस्कूल शाळेतील गुरुजी, शिक्षक व शिपाई या सर्वांना बोलवून“विद्यार्थी स्नेह मेळावा” या कार्यक्रमाचे नियोजन करून प्रत्येक शिक्षकांचे त्यांनी केलेले उच्च संस्कार व शिकवणी तसेच परिस्थितीला तोंड देऊन आत्मविश्वासाने यश संपादन करण्याचे ज्ञान दिल्याबदल सर्व विद्यार्थाच्या वतीने शिक्षकांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मुर्तीचिन्ह, भेटवस्तू तसेच त्या त्या काळातील सर्व आठवणीना उजाळा देऊन अँड. चंद्रकांत निकम यांनी सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त करून त्यांचा आशीर्वाद व प्रेम असेच प्रत्येक विद्यार्थांना लाभो अशी प्रार्थना करून त्यांचेही पुढील आयुष्य निरोगी व समाज कार्यात सतत घडो अशी प्रार्थना ईश्वर चरणी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या निमितान्ने सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी आपआपल्या काळातील आठवणींना उजाळा देण्यात आला तसेच २९ वर्षांनी ६० पेक्षा अधिक विद्यार्थी प्रथमच एकत्र येऊन शाळेतील वेगवेगळ्या आठवणी त्याचबरोबर शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील त्या वेळची भीती व गरीब परिस्थिती असताना देखील कोणताही दुजाभाव न करता प्रत्येक विद्यार्थी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने वनभोजन, वेगवेगळे खेळ, ध्वजारोहणाचा कार्यक्रम व गावातील मोठ मोठ्याने घोषणा देऊन काढलेली मिरवणूक, सहली त्याचसोबत आजरा व निंगुडगे येथे चौथी व सातवीच्या वेळेस झालेल्या स्काँलरशिप परीक्षा अशा अनेक आठवणी पुन्हा एकदा जागृत करण्यात आल्या.
मलिग्रे हायस्कूलचे माजी मुख्याधापक कै. चिंचणेकर सर यांनी शिकवलेल्या अनेक गोष्टी त्याचबरोबर“रायगडला जेव्हा जाग येते”“बटाट्याची चाळ”, “नटसम्राट” यासारख्या अनेक कादंबरी वाचून दाखवताना जणूकाही त्यातील प्रत्येक पात्र आपल्या समोर उभे आहे अशा पद्धतीने वेगवेगळे आवाज व त्यातील गांभीर्य त्याचबरोबर प्रत्येक शब्दातील अर्थ प्रत्येक विद्यार्थांच्या मनामध्ये कायमचे बिंबवण्याचे अशक्य कार्य चिंचणेकर सर करत होते. या सर्व आठवणींना उजाळणी देताना उपस्थित सर्व विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.
प्रथमच एस.एस.सी. १९९५ बँचच्या विद्यार्थी मधील त्यांचे चार सवंगडी यांचे निधन झाले होते, त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई वडिलांना साडी चोळी, टाँवेल टोपी तसेच स्मुर्तीचिन्ह देऊन त्यांच्या दुखात आम्ही सर्व विद्यार्थी त्यांच्या सोबत असल्याची जाणीव करून त्या काळातील सर्व आठवणींना उजाळा देण्यात आला.
एस.एस.सी. १९९५ च्या बँचने आयोजित केलेल्या या स्नेह मेळाव्यामध्ये सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी पारंपारिक पोशाखामध्ये एकत्र जमून प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या नावासोबत त्यांच्या आईच्या नावासह प्रत्येक विद्यार्थ्याचा व इंजल गुरुजींचा फोटो असलेले आठवण म्हणून स्मुर्तीचिन्ह देऊन तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देऊन उपस्थित शिक्षकांकडून सत्कार करण्यात आला.
भारतीय सैन्यातून सेवा निवृत्त झालेले वर्ग मित्र सुरेश कागीणकर व विजय इंजल त्याचबरोबर संपूर्ण भारतात अग्रगण्य कंपनी चे सी. ई. ओ. राजेश कापसे, अस्मिता कुरळे तसेच दुबई मध्ये उच्च अधिकारी पदावर काम करत असलेले बबन सावंत यांचाही गुरुजींच्या हस्ते शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर अँड. चंद्रकांत निकम यांनी आजपर्यंत वेगवेगळ्या विद्यापिठातून अनेक विविध डिग्री घेतल्याबद्दल तसेच समता ट्रस्टच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम करत असल्याबदल व मुंबई उच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या पदावर कार्य करत असल्याबदल त्यांचाही गुरुजींच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सावंत गुरुजी, चौगुले गुरुजी, देसाई गुरुजी, करवळकर सर, जांभुटकर सर, वाघराळकर सर, पाटील सर तसेच पापालाल व नारायण सर उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांना त्या काळातील वेगवेगळ्या आठवणीसह विद्यार्थ्यांनी केलेली प्रगती पाहून त्यांना अत्यानंद झाला व इथून पुढेही अशीच प्रगती राहो व मलिग्रे हायस्कूलचे नाव सातासमुंदर पोह्चो हीच अपेक्षा व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Oplus_131072

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.