Homeकोंकण - ठाणेअक्षयतृतीये निमित्त गणपतीपुळेच्या गणपती बाप्पास आंब्याची आरास.🛑संभाजीनगर, सांगली, अहमदनगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना...

अक्षयतृतीये निमित्त गणपतीपुळेच्या गणपती बाप्पास आंब्याची आरास.🛑संभाजीनगर, सांगली, अहमदनगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपले; – पुण्यातही वरूणराजा बरसला.🛑हाजगोळी खुर्द येथे नारळाच्या झाडावर पडली वीज.- घरातील इलेक्ट्रिक उपकरणे नादुरुस्त.

🟥अक्षयतृतीये निमित्त गणपतीपुळेच्या गणपती बाप्पास आंब्याची आरास.
🛑संभाजीनगर, सांगली, अहमदनगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपले; – पुण्यातही वरूणराजा बरसला.
🛑हाजगोळी खुर्द येथे नारळाच्या झाडावर पडली वीज.- घरातील इलेक्ट्रिक उपकरणे नादुरुस्त.

रत्नागिरी :- प्रतिनिधी.

अक्षयतृतीयेनिमित्त आज शुक्रवारी श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील गणपती बाप्पाची आंब्याने पूजा करण्यात आली. मंदिराच्या गाभाऱ्यात आंब्याची आरास करण्यात आली आहे. रत्नागिरी शहरातील सिध्देश विजय वैद्य व मंजिरी वैद्य यांनी पूजेसाठी पिकलेले आंबे पाठविले आहेत. वैद्य कुटूंबियांकडून गेली दहा बारा वर्षे गणपतीसाठी आंबे पाठविण्यात येत आहे.वैद्य कुटूंबियांच्या आंब्याचा व्यवसाय असून गणपतीवर त्यांची अपार श्रध्दा आहे.
🔴दरवर्षी पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपती व गणपतीपुळे येथील मंदिरात दोन डझनचा आंबा प्रसादासाठी पाठवितात. सिध्देश वैद्य यांचा हा उपक्रम गेली १० ते १२ वर्षे सुरू आहे. मात्र सिध्देश यांना गणपतीपुळ्यातील गणेश मंदिरात आंब्याची आरास करण्याची संकल्पना सुचली. त्यांनी तेथील पुजाऱ्यांना याबाबत विचारले, तेव्हा त्यांनीही सकारात्मकता दर्शविली. दरवर्षी आंब्याच्या हंगामात एखादा चांगला दिवस पाहून आंब्याने बाप्पाची पूजा केली जाते. आंब्याच्या पूजेचा हा उपक्रम आठ वर्ष सुरू आहे.यावर्षी अक्षयतृतीयेला पूजा बांधण्याचा निर्णय घेतला त्यासाठी गुरूवारी (दि.९) नऊ डझन पिकलेले आंबे त्यांनी गणपतीपुळे येथे पूजेसाठी पाठविले. गणपतीमंदिरातील आंब्याची आरास पाहण्यासाठी भाविकांनीही गर्दी केली होती. कित्येक भाविकांनी मोबाईलमधून पूजेचे फोटो टिपले आहेत.आंबा हंगामातील कामामुळे दरवर्षी पूजेसाठी खास जाता येत नाही. परंतु हंगाम संपल्यानंतर आवर्जून संपूर्ण कुटूंबासह दर्शनासाठी जात असल्याचे सिध्देश यांनी सांगितले. गणपतीवर माझी व माझ्या कुटूंबियांची मनोभावे श्रध्दा आहे, श्रध्देतूनच आम्ही आंबे पूजेला पाठवित आहोत, असे सांगितले.

🛑संभाजीनगर, सांगली, अहमदनगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपले; – पुण्यातही वरूणराजा बरसला.-
🟣गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.

मुंबई :- प्रतिनिधी

राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज शुक्रवारी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. सांगली, छत्रपती संभाजीनगर व अहमदनगरसह अनेक जिल्ह्यात गारपिटीसह जोरदार पाऊस कोसळला. गारपिटीमुळे सांगली, नगरसह राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आंबा, भाजीपाला आणि इतर फळांचे मोठे नुकसान झाले आहे. नागपूर शहराला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीने झोडपून काढले. पुण्यातही आज जोरदार पाऊस बरसल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.
🅾️सांगलीतील वाळवा तालुक्यातील कुरळप परिसरात गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे. विजेच्या कडकडासह आणि वाऱ्या वादळासह वीस मिनिटे सांगलीत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शिवाय, गारांचाही पाऊस झालाय. अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे परिसरातील आंबा, भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.
🔴संभाजीनगर आणि सांगलीनंतर अहमदनगर शहर परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. अहमदनगर शहरासह परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र, अवकाळी पावसामुळे फळबागांसह इतर पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या सभांनाही फटका बसणार आहे.
🅾️विदर्भासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात आज पावसाने हजेरी लावली. संभाजीनगर, पुणे, सांगली व अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात अवकाळीने हजेरी लावली. भर दुपारी कडक उन्हात वातावरणात बदल होऊन अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली. कोल्हापूर, सातारा परिसरात आज सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते मात्र पाऊस झाला नाही.या अवकाळी पावसामुळे फळबागांसह इतर पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार सभांनाही फटका बसणार आहे.

🛑हाजगोळी खुर्द येथे नारळाच्या झाडावर पडली वीज.- घरातील इलेक्ट्रिक उपकरणे नादुरुस्त.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

हाजगोळी खुर्द ता. आजरा येथील आनंदा दत्तू हरेर यांच्या घराशेजारील शेतातील नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाडांनी पेठ घेतलं यासोबत शेजारी असलेले घरातील इलेक्ट्रिक स्विचला गेला आहे, तीन बल्ब गेले आहेत. तर ट्यूब फॅन खराब झाले आहेत. बॅटरीचा चार्जर स्विचला वीज पडल्याने त्याचे दोन तुकडे झाले आहेत
नारळीचे झाड श्री. हरेर यांच्या क्षेत्रात आहे.‌ याबाबत संबंधित विभागाने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी हरेर कुटुंबाकडून होत आहे.
गावच्या शेजारीच वीज पडली परंतु कोणतीही दुर्घटना घडली नसल्याची समजते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.