Homeकोंकण - ठाणेकोल्हापुरात मतदानाच्या रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू,- कार्यकर्त्यांची तारांबळ.( तर महाडमध्येही मतदानासाठी निघालेल्या...

कोल्हापुरात मतदानाच्या रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू,- कार्यकर्त्यांची तारांबळ.( तर महाडमध्येही मतदानासाठी निघालेल्या मतदाराचा रस्त्यातच दुर्देवी मृत्यू ) – तर भुये येथे दुचाकीवरून पडून वृद्धा जखमी.

कोल्हापुरात मतदानाच्या रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू,- कार्यकर्त्यांची तारांबळ.
( तर महाडमध्येही मतदानासाठी निघालेल्या मतदाराचा रस्त्यातच दुर्देवी मृत्यू ) – तर भुये येथे दुचाकीवरून पडून वृद्धा जखमी.

निवडणूक इतिवृत्तांत.

➡️उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर मतदानासाठी गेलेले महादेव श्रीपती सुतार (वय ६९, रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर) हे रांगेतच चक्कर येऊन कोसळले. नातेवाईकांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे मतदान केंद्राच्या परिसरात काही काळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली.
🅾️याबाबत अधिक माहिती अशी की, महादेव सुतार हे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास मतदानासाठी घरातून बाहेर पडले. जवळच असलेल्या रमाबाई आंबेडकर शाळेतील केंद्रावर त्यांचे मतदान होते. मतदानासाठी रांगेत उभे असतानाच चक्कर येऊन ते कोसळले. हा प्रकार लक्षात येताच सोबत असलेल्या नातेवाईकांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला.
🟣मतदान केंद्रावरील राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी सुतार यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

🟥महाडमध्ये मतदानासाठी निघालेल्या मतदाराचा रस्त्यातच दुर्देवी मृत्यू.

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मतदान करण्यासाठी निघालेल्या एका मतदाराचा रस्त्यातच चक्कर येऊन दुर्देवी मृत्यू झाला आहे. प्रकाश चिनकटे असं या मृत मतदाराचं नाव आहे. चिनकटे हे महाड तालुक्यातील दाभेकर कोंड (किंजळोली बु) येथील रहिवासी आहेत. त्यांच्या अचानक मृत्यूने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

🅾️प्रकाश चिनकटे हे दाभेकर कोंड येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी सकाळीच घरातून बाहेर पडले होते. सकाळी 9 वाजता ते मतदान केंद्राकडे पायी निघाले होते. अत्यंत उत्साहात ते निघाले होते. त्यांच्यासोबत गावातील काही लोक होते. त्यांच्याशी गप्पा मारत मारतच चिनकटे निघाले होते. मतदान केंद्राच्या अगदी जवळ पोहोचलेही होते. पण मतदान केंद्र फक्त 100 मीटर अंतरावर असतानाच त्यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे ते जागीच कोसळले. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना जागं करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रुग्णालयातही नेलं.पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. अचानक झालेल्या या धक्कादायक प्रकाराने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. आपला सोबती अचानक आपल्याला सोडून गेल्याच्या घटनेवर गावकऱ्यांचाही विश्वास बसेनासा झाला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रकाश चिनकटे यांना लगेच महाडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना ब्रॉट डेड म्हणजेच रुग्णालयात आणण्याआधीच मृत्यू झाला, असं घोषित केलं. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यासंदर्भातील चाचण्या आणि तपासण्या केल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण समोर येईल असं सांगितलं जात आहे.

🟥दुचाकीवरून पडून वृद्धा जखमी

भुये (ता. करवीर) येथे मतदान करून मुलाच्या दुचाकीवरून बालिंगे पाडळी (ता. करवीर) येथे परत जाताना तोल जाऊन पडल्याने वृद्धा जखमी झाली. कमल विलास पोवार (वय ६०, मूळ रा. भुये, सध्या रा. बालिंगे पाडळी) असे जखमीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि. ७) सकाळी अकराच्या सुमारास कांचनवाडी (ता. करवीर) येथे घडली. जखमी कमल यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.