Homeकोंकण - ठाणेरत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंताचे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत...

रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंताचे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत नॉट रिचेबल. ( मतदानाच्या दिवशीच कोकणात हायव्होल्टेज ड्रामा.)🛑तुमच्या कुटुंबातील ‘हा’ व्यक्ती कुणाचीही परवानगी न घेता संपूर्ण प्रॉपर्टी विकू शकतो !*सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम निर्णय🛑अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवा. – हायकोर्टाचे पोलीसांना आदेश.

🛑रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंताचे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत नॉट रिचेबल. ( मतदानाच्या दिवशीच कोकणात हायव्होल्टेज ड्रामा.)
🛑तुमच्या कुटुंबातील ‘हा’ व्यक्ती कुणाचीही परवानगी न घेता संपूर्ण प्रॉपर्टी विकू शकतो !*
सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम निर्णय
🛑अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवा. – हायकोर्टाचे पोलीसांना आदेश.

( 🛑किरण सामंत यांना तातडीने पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे आ. वैभव नाईक )

रत्नागिरी:- प्रतिनिधी.‌

देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. राज्यातील 11 मतदारसंघात आज मतदान होत आहे. महाराष्ट्रात बारामती, सोलापुर, माढा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आज मतदान होत आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे विरुद्ध राऊत असा सामना होत आहे. कोकणात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. कोकणात आज मतदान होत असताचा रत्नागिरी जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर किरण सामंत नॉट रिचेबल असल्याने शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरणारे आहे.
🔴सकाळपासून किरण सामंत नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. सकाळपासून किरण सामंत यांचा फोन नॉटरीचेबल असल्याचे समजतेय. कार्यकर्ते किरण सामंत यांच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न अयशस्वी होत आहे. किरण सामंत हे कार्यकर्त्यांच्या संपर्कात नसल्याने एकच खळबळ उडाली आहे.
🟥महाराष्ट्रात कोणत्याही नेत्याचा फोन नॉट रिचेबल झाल्यावर काहीतरी भयानक घडत असेल. पण इथे काही घडणार नाही. माझ्याकडे ग्रामीण भाग आहे. शेवटी एक कुटुंब आणि राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे. प्रत्येकांमध्ये समज-गैरसमज झाले असतील तर आम्ही कुटुंब सक्षम आहोत मार्ग काढण्यासाठी. एखादा व्यक्ती नॉट रिचेबल आहे म्हणजे माणूस वेगळेच काहीतरी करतो, ही भावना निर्माण करणे हे पण लोकशाहीमध्ये एक आक्षेप घेतल्यासारखे आहे. सगळं काही व्यवस्थित सुरू आहे, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी बोलताना दिली आहे.

🛑किरण सामंत यांना तातडीने पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे आ. वैभव नाईक – किरण सामंत हे आज सकाळपासून नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर आल्या आहेत. कोकणात झालेल्या या आधीच्या निवडणुकांमध्ये दहशतवादी प्रवृत्तीने कायम डोकेवर काढले आहे. आणि दहशतवादी प्रवृत्ती आज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना समोर पराभव दिसू लागल्याने त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे किरण सामंत यांना तातडीने पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे. अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

🛑तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान

तिसऱ्या टप्प्यासाठी 95 जागांसाठी मतदान पार पडणार होते. मात्र, सुरत इथं कॉंग्रेस उमेदवाराने अर्ज परत घेतल्यानं आणि जम्मू काश्मीरमधील हवामान खराब असल्यानं अनंतनाग – राजौरी इथं मतदान तिसऱ्या टप्प्यात होणार नाही. आता अनंतनाग राजौरी लोकसभेसाठी सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 10 राज्य आणि 1 केंद्रशासीत प्रदेशातील 93 जागांवर मतदान होत आहे.

🛑तुमच्या कुटुंबातील ‘हा’ व्यक्ती कुणाचीही परवानगी न घेता संपूर्ण प्रॉपर्टी विकू शकतो !*
सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम निर्णय

नवी दिल्ली – वृत्तसंस्था.

आपल्या देशात प्रॉपर्टीवरुन मोठमोठे वादविवाद पाहायला मिळतात. संपत्तीचे अनेक प्रकरणे न्यायालयात न्यायप्रविष्ट आहेत. भावंडांमध्ये संपत्तीच्या कारणांवरून नेहमीच वाद पाहायला मिळतात. दरम्यान भारताच्या सुप्रीम कोर्टाने संपत्ती विषयक एका प्रकरणांमध्ये नुकताच एक मोठा निकाल दिला आहे. यात अविभाजित हिंदू कुटुंब किंवा संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेबाबत निर्णय देण्यात आला आहे.
🔴सर्वोच्च न्यायालयाने हिंदू कुटुंबातील कोणत्या व्यक्तीला कुटुंबाची संपूर्ण प्रॉपर्टी कुणाचीही परवानगी न घेता विकण्याचा अधिकार आहे? या संदर्भात एका प्रकरणांमध्ये महत्त्वाचा निकाल दिलाय. माननीय न्यायालयाने एका प्रकरणात निकाल देताना असे म्हटले आहे की जर हिंदू कुटुंबातील ‘कर्ता’ म्हणजेच कुटुंबप्रमुख इच्छित असेल तर तो संयुक्त मालमत्ता विकू शकतो किंवा गहाण ठेवू शकतो.यासाठी त्याला कुटुंबातील कोणत्याही सदस्याची परवानगी घेण्याची गरज राहणार नाही. म्हणजे तुमच्या कुटुंबातील कुटुंबप्रमुख हा कोणाचीही परवानगी न घेता कुटुंबाची प्रॉपर्टी विकू शकतो. या निकालात असे देखील म्हटले गेले आहे की, जर भागधारक अल्पवयीन असला तरी, कर्ता हा कुणाचीही परवानगी न घेता मालमत्तेबाबत निर्णय घेऊ शकतो.
🟥कुटुंबाचा कर्ता किंवा कुटुंबप्रमुख हा कुटुंबातील सर्वाधिक वयस्क व्यक्ती असतो. जर कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला तर त्यानंतर जो वयाने मोठा असतो किंवा सीनियर असतो तो कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी पाहतो. मात्र काही प्रकरणांमध्ये इच्छापत्राद्वारे देखील कुटुंबप्रमुखाची नियुक्ती होऊ शकते.म्हणजे कुटुंबातील जो सध्याचा कुटुंब प्रमुख असेल तो इच्छापत्र तयार करून पुढील कुटुंबप्रमुखाची नियुक्ती करू शकतो. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टात आलेले हे प्रकरण 1996 चे होते. या प्रकरणावर मद्रास हायकोर्टाने आधीच निर्णय दिलेला होता.
🔴या प्रकरणावर 2023 मध्ये मद्रास हायकोर्टाने निकाल दिला होता. परंतु निकालावर असंतुष्ट याचिकाकर्त्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यात त्याने दावा केला की, त्याच्या वडिलांनी एक मालमत्ता गहाण ठेवली होती जी संयुक्त कुटुंबाची मालमत्ता होती.तथापि, याचिकाकर्त्याने असेही म्हटले आहे की त्याचे वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे होते म्हणजे कर्ता अर्थातच कुटुंबप्रमुख होते. दरम्यान या प्रकरणात आधीच मद्रास उच्च न्यायालयाने मालमत्तेबाबत कर्ता निर्णय घेऊ शकतो आणि यासाठी कोणाला विचारण्याची गरज नाही, असा निकाल दिला होता.
🟥दरम्यान सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जाण्यास नकार दिला. म्हणजेच मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला. अर्थातच हिंदू कुटुंबातील कर्ता किंवा कुटुंबप्रमुख हा कुटुंबाची प्रॉपर्टी कोणाचीही परवानगी न घेता विकू शकतो, असाच निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

🛑अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवा. – हायकोर्टाचे पोलीसांना आदेश

मुंबई :- प्रतिनिधी.

शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची ८ फेब्रुवारी रोजी फेसबूक लाइव्ह करत मॉरिस नोरोन्हा याने हत्या केली होती. याहत्येप्रकरणी आज मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी हायकोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी घोसाळकरांच्या हत्येसंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवा, असे आदेश हायकोर्टाने पोलिसांना दिले आहेत. दरम्यान आरोपपत्रात दाखल करण्यात आलेलं सर्व कुटुंबियांना दिल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला आहे. तसेच हत्या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज गुगल टाईमनुसार ताब्यात घेतल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
🔴अभिषेक घोसाळकरांच्या कुटूंबीयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आरोप केला की, आरोपपत्र दाखल करण्याची मुदत ९० दिवसांची असताना ६० दिवसांतच मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले. तसेच तक्रारदार आणि मृत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांचं म्हणणंही नीट ऐकून घेतलं नाही. दुसरीकडे तक्रारदार दररोज काहीतरी नवीन कागदपत्रे सादर करत असल्याची तक्रार पोलिसांनी न्यायालयात केली.त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण लागले असून पोलीस विरुद्ध तक्रारदार असा वाद निर्माण झाला आहे.
🟥अभिषेकच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी हत्या प्रकरणाच्या तपासावर व पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली व पुढील सुनावणी जून महिन्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मुंबईतील दहिसरमध्ये राहणारा सामाजिक कार्यकर्ता मॉरिस नोरोन्हा याने फेसबुक लाईव्ह करत अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली होती. तसेच राजकीय वातावरणही तापलं होतं. या हत्येच्या चार महिन्यानंतरही या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झालेली नाही. सोमवारी या प्रकरणी सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांनी महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येसंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवा, असे आदेश हायकोर्टाकडून पोलिसांना देण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.