Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रश्रीमती सरस्वती नार्वेकर, यांचे शेवटचे मतदान… दुःखद निधन.तर मडिलगेतील शामराव घाटगे यांचे...

श्रीमती सरस्वती नार्वेकर, यांचे शेवटचे मतदान… दुःखद निधन.तर मडिलगेतील शामराव घाटगे यांचे अल्पशा आजाराने निधन

श्रीमती सरस्वती नार्वेकर, यांचे शेवटचे मतदान… दुःखद निधन.
तर मडिलगेतील शामराव घाटगे यांचे अल्पशा आजाराने निधन

आजरा.- प्रतिनिधी.

भारतीय निवडणूक आयोगाने वय वर्षे ८५ पेक्षा जास्त वय असणारे व दिव्यांग मतदार यांचेकरिता होम वोटींग ही संकल्पना राबवली. हा उपक्रम कोरीवडे ता. आजरा येथे दि. २ मे २०२४ रोजी राबविण्यात आला होता. या मध्ये श्रीमती सरस्वती नार्वेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला होता, श्रीमती नार्वेकर यांचे वय ९४ असून दिनांक ०७/५/२०२४ रोजी यांचा सकाळी ६.३० वाजता मृत्यू झाला. निवडणूक आयोगाच्या होम वोटिंग धोरणामुळे आयुष्यातीलशेवटचे मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे पुण्य श्रीमती सरस्वती नार्वेकर यांना प्राप्त झाले आहे.
निवडणूक आयोगाने होम वोटिंग सुविधा उपलब्ध करून दिली नसती तर कदाचित श्रीमती सरस्वती नार्वेकर यांचे मतदान झालेच नसते त्यामुळे आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे मतदारां च्यातूनसमाधान व्यक्त होत आहे.

मडिलगेतील ज्येष्ठ नागरिक शामराव शंकर घाटगे यांचे निधन.

मडिलगे तालुका आजरा येथील ज्येष्ठ नागरिक शामराव शंकर घाटगे यांचे पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात विवाहित चार मुली पत्नी असा परिवार आहे.‌ मयत घाटगे यांनी देखील 2024 मधील शेवटचा मतदानाचा अधिकार बजावला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.