Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा शहरात परंपरेनुसार शिवजयंती होणार उत्साहात साजरी.- संयुक्त श्री शिवजयंती उत्सव समिती...

आजरा शहरात परंपरेनुसार शिवजयंती होणार उत्साहात साजरी.- संयुक्त श्री शिवजयंती उत्सव समिती आजरा.‌

आजरा शहरात परंपरेनुसार शिवजयंती होणार उत्साहात साजरी.- संयुक्त श्री शिवजयंती उत्सव समिती आजरा.‌

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शहरात परंपरेनुसार होणाऱ्या शिवजयंतीचे आयोजन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.गेली कित्येक वर्षे आजरा शहरात शिवजयंती ही अत्यंत उत्साहात साजरी होताना दिसते.दरवर्षी सुमारे २५ हून अधिक मंडळे या पारंपरिक शिवजयंतीत एकत्र होऊन सहभागी असतात. यंदाच्या वर्षी सदर शिवजयंती ही वैशाख शु.द्वितीया,शके १९४६,गुरुवार दि.०९ मे २०२४ रोजी होत असून यानिमित्ताने पुढील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार वैशाख शु.प्रतिपदा दि.०८ मे रोजी सकाळी ११:०० वाजता छ.शिवरायांच्या मूर्तीवर घातल्या जाणाऱ्या अभिषेकासाठी हिरण्यकेशी नदीच्या उगमाचे पवित्र जल आणले जाणार आहे. गुरुवार वैशाख शु. द्वितीया, ०९ मे ( शिवजयंती दिनी ) सकाळी ७:०० वाजता शिवरायांच्या अर्धाकृती मूर्तीस महाभिषेक करण्यात येणार असून सकाळी १०:०० वाजता पाळणा होणार आहे. गुरुवारी सायंकाळी शिवजयंती निमित्त भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे.यामध्ये लेझीम, सजीव देखावे, हलगी, घोडे, लहान मुलांची शिवकालीन वेशभूषा, लाईटशो व अजून बर्याचश्या गोष्टी असणार आहेत.ज्या १५ वर्षाखालील लहान मुलांना शिवकालीन वेशभूषेत सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी खालील क्रमांकाच्या व्हाट्सएप नंबरवर सहभाग नोंदवायचा आहे.सदर मिरवणूक ही सायंकाळी ४:३० वाजता व्यंकटराव हायस्कुल पासून सुरू होणार असून आजरा तालुक्यातील तमाम शिवभक्तांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन संयुक्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.