आजरा शहरातील प्रमुख चौक व बस स्थानक या परिसरातील रस्ता झालाच पाहिजे.- अन्यथा आंदोलन.. अन्याय निवारण समितीचे निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा शहरातील प्रमुख चौक व बस स्थानक परिसरातील रस्ता झालाच पाहिजे अशा आशयाचे निवेदन आजरा अन्याय निवारण समितीने उपविभागीय अधिकारी तसेच आजरा तहसीलदार यांना दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कि आजरा शहरातील प्रमुख येथील रस्ता खुदाई करून ठेवला आहे. याकडे पावसाळा तोंडावर आला तरी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गाचा हा सावळा गोंधळ थांबावा व संभाजी महाराज चौक आजरा येथील रस्ता ताबडतोड करावा. संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील दोन वर्षापासून सुरू आहे. परंतु आजरा शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौक ते बस स्थानक परिसर येथील मेन रोड व आजरा नगरपंचायत हद्दीतील प्रमुख रहदारीचा आंबोली गोवा मार्ग आहे. हा मार्ग दोन महिन्यापासून खुदाई करून ठेवला आहे. परंतु पुढील कामकाज काही चालू नाही. यामुळे मागील चार दिवसापूर्वी वळवाचा आलेला मोठा पाऊस यामध्ये साचलेले पाणी व झालेला चिकल व यापूर्वी व सद्यस्थितीत धुळीच्या साम्राज्यात रहिवासी व येथील व्यापारी आजरावासीयांना आहेत वेळोवेळी तोंडी सूचना देऊन देखील याकडे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्षच राहिलेले आहे. येथील संभाजी महाराज परिसर व बस स्थानकापर्यंत रस्ता झाल्याशिवाय कोणतेही दुसरे काम करून देण्याचा निर्णय आजरावासिनी घेतला आहे. आजरा शहरातील प्रमुख चौक व बस स्थानक या परिसरातील रस्ता होणे गरजेचे आहे. या रस्त्याचा व धुळीचा सर्वात अधिक त्रास महामार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या दुकानदार व्यापारी यांना होत आहे. गटरी झाल्या मग आता रस्ता होण्यास कोणता अडथळा महामार्गासमोर निर्माण झाला आहे. तो दोन महिन्यापासून निर्णय होत नाही कशासाठी थांबवला आहे याचं कारण समजत नाही. अद्याप लेंडहोळ चे काम हातात घेतले नाही.. आजरा शहरांमध्ये प्रचंड पाऊस असतो या पावसामध्ये संभाजी महाराज चौकातील लेंडहोळ काम कसे करता येणार याबाबतची माहिती महामार्ग प्रशासनाला असेलच तसेच ऐन पावसाळ्यात रस्ता करायचा पाण्याचा व चिखलाच्या साम्राज्याचा नाहक त्रास आजरा वासियासह तालुक्यातील येणाऱ्या नागरिकांना होणार आहे. याची सर्वस्वी जबाबदारी आजरा नगरपंचायत ची आहे. परंतु आजरा नगरपंचायत याकडे कानाडोळा करत असल्याने लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते आजरावासीय यांनी हा विषय हातात घेतला सदर रस्त्याचे काम येणाऱ्या दोन दिवसात चालू नाही केल्यास लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर याच रस्त्यावर काम थांबवून रस्ता रोको अन्याय निवारण समिती आजरा व आदरा तालुक्यातील तमाम नागरिक लोकप्रतिनिधी यांच्या वतीने करण्यात येणार आहे. यावेळी प्रशासकीय कामकाजात अडथळा आल्यास याला सर्वस्वी जबाबदार राष्ट्रीय महामार्ग प्रशासन असेल याची असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर परशुराम बामणे, पांडुरंग सावरतकर, यशवंत इंजल, गोपाळ आजगेकर, राजु विभुते, सह समितीचे सदस्य उपस्थित होते.