देऊळ बंद- प्रशासनाचे दुर्लक्ष. निषेधार्थ.- आजरा – हरपवडे गुरव समाजाचा लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार – जिल्हाधिकारी यांना निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.
देऊळ बंद बाबत आंदोलन करून निवेदन देऊन देखील प्रशासनाचे दुर्लक्ष केलेच्या निषेधार्थ. आजरा तालुक्यातील हरपवडे येथील गुरव समाजाने लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असले बाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हरपवडे गावचे ग्राम दैवत श्री रासुबाई देवीचे मंदिर गेली ६ महिने कुलूप बंद आहे. गावातील काही मोजक्या मंडळीमुळे संपूर्ण गावच्या रासुबाईच्या भक्तांना अडचण निर्माण झाली आहे.

सदर मंदिर हे पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्याकडे देखभाल दुरुस्ती साठी आहे. त्यांच्याकडून गावातील स्थानिक व्यवस्थापन कमिटीकडे देखभालीसाठी दिले जाते. स्थानिक देवस्थान समिती हरपवडे व पुजाऱ्यांच्या मध्ये वाद होऊन मंदिराला टाळा ठोकण्यात आला. हा विषय घेऊन पुज्यार्थ्यांनी १३/१०/२०२३ पासून बेमुदत आंदोलन केले. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर चे पदाधिकारी आंदोलन स्थळी येऊन (ग्रामपंचायत हरपवडे निवडणूक) आचार संहितेचे कारण पुढे करून आचार संहिता संपल्या नंतर आम्ही हरपवडे या गावी येऊन आपल्याला निर्णय देऊ असे तहसिलदार कार्यालय आजरा या ठिकाणाच्या बैठकीत सांगून गेले. ते आज तागायत हरपवडे या गावी फिरकलेच नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर गेली ४ महिने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर यांनी काहीही कार्यवाही केलेली नाही.

मौजे हरपवडे गावातील ग्रामस्थांचा घोर अवमान करीत आहेत. हरपवडे गावातील ग्राम दैवत श्री रासुबाई देवी हे ग्रामस्थांचे आराध्य दैवत असून देव कार्य करणेसाठी व इतर सर्वच कार्यासाठी लोकांना अडचणी येत आहेत. त्या मुळे आपण लोकसभा निवडणूक २०२४ मतदानाच्या अगोदर श्री रासुबाई देवी मंदिर हे आपल्या प्रशासनामार्फत भक्तांसाठी खुले करून देऊन पूर्वी प्रमाणे परंपरागत पूजा अर्चा करण्यास व देखभाल करण्यास आपण प्रशासनाला आदेश द्यावेत. दि.०६/०५/२०२४ पर्यंत श्री रासुबाई देवीचे मंदिर प्रशासनामार्फत खुले करून देऊन परंपरागत पूजा अर्चा करण्यास आदेश द्यावेत. असे होत नसेल तर श्री रासाई देवी चे भक्त उद्याच्या लोकसभा निवडणुकीवर पूर्णतः बहिष्कार टाकतील, याची आपण दखल घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर
देवदास गुरव, बाळासो संकपाळ
वैशाली गुरव, अनुसया बाळासो संकपाळ सह ग्रामस्थ यांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती सचिवसो, देवस्थान व्यवस्थापन कमिटी, कोल्हापूर., प्रांताधिकारीसो, आजरा – भुदरगड. तहसीलदार आजरा यांना देण्यात आल्या आहेत.
