सख्ख्या भावाने केला भावावर कोयत्याने वार – आजरा तालुक्यातील एका गावात घटना.- आजरा पोलिसात गुन्हा नोंद.
आजरा.- प्रतिनिधी.
मेंढोली तालुका आजरा येथे शेताच्या हद्दीच्या वादाच्या कारणावरून दशरथ आप्पा चौगुले यांच्यावर म्हंकाळी आप्पा चौगुले या सख्या भावाने कोयत्याने वार करून त्यांना जखमी केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दशरथ चौगुले व म्हंकाळी चौगुले यांच्यामध्ये शेत जमिनीच्या हद्दीचा वाद असून हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. दशरथ हे लाकडे तोडण्यासाठी शेतामध्ये गेले असता शुक्रवारी सायंकाळी ११. २० वाजण्याच्या सुमारास म्हंकाळी हे तेथे गेले त्यांनी दशरथ यांच्या हातातील कोयता काढून घेऊन त्याच कोयत्याने दशरथ यांच्यावर वार केले. यामध्ये दशरथ हे जखमी झाले आहेत. दशरथ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हंकाळी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अंबुलकर करीत आहेत.
