Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रसंकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गाचा सावळा गोंधळ.- आजरा शहरात दोन महिन्यापासून - रस्ता...

संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गाचा सावळा गोंधळ.- आजरा शहरात दोन महिन्यापासून – रस्ता खुदाई – अद्याप दुर्लक्षित.- आजरावासीय संतप्त.. आंदोलनाच्या पवित्र्यात.

संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गाचा सावळा गोंधळ.- आजरा शहरात दोन महिन्यापासून – रस्ता खुदाई – अद्याप दुर्लक्षित.- आजरावासीय संतप्त.. आंदोलनाच्या पवित्र्यात.

आजरा.- प्रतिनिधी.

संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील दोन वर्षापासून सुरू आहे परंतु आजरा शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौक ते बस स्थानक परिसर येथील मेन रोड व आजरा नगरपंचायत हद्दीतील प्रमुख रहदारीचा आंबोली गोवा मार्ग आहे. हा मार्ग दोन महिन्यापासून खुदाई करून ठेवला आहे परंतु पुढील कामकाज काही चालू नाही यामुळे मागील चार दिवसापूर्वी वळवाचा आलेला मोठा पाऊस यामध्ये साचलेले पाणी व झालेला चिकल व यापूर्वी व सद्यस्थितीत धुळीच्या साम्राज्यात रहिवासी व येथील व्यापारी आजरावासीयांना आहेत वेळोवेळी तोंडी सूचना देऊन देखील याकडे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्षच राहिलेले आहे. यामुळे आता आजरेकर संतप्त झालेले आहेत. येथील संभाजी महाराज परिसर व बस स्थानकापर्यंत रस्ता झाल्याशिवाय कोणतेही दुसरे काम करून देण्याचा निर्णय आजरावासिनी घेतला आहे असे समजते. याबाबत आजरा शहरातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते यांनी उठाव घेतल्यास हा रस्ता लवकरात लवकर होण्यास काही अडचण येणार नाही परंतु याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला विचार करणे गरजेचे आहे. मान्सून लवकरच चालू होणार आहे यामुळे यापुढे पावसामध्ये होणारा त्रास थांबवायचा असेल तर आजच या आजरा शहरातील प्रमुख चौक व बस स्थानक या परिसरातील रस्ता होणे गरजेचे आहे. या रस्त्याचा व धुळीचा सर्वात अधिक त्रास महामार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या दुकानदार व्यापारी यांना होत आहे. गटरी झाल्या मग आता रस्ता होण्यास कोणता अडथळा महामार्गासमोर निर्माण झाला आहे तो दोन महिन्यापासून निर्णय होत नाही कशासाठी थांबवला आहे याचं कारण समजत नाही. अद्याप लेंडहोळ चे काम हातात घेतले नाही.. आजरा शहरांमध्ये प्रचंड पाऊस असतो या पावसामध्ये संभाजी महाराज चौकातील लेंडहोळ काम कसे करता येणार याबाबतची माहिती महामार्ग प्रशासनाला असेलच परंतु आजरा शहरवासीयाने एकदा कान उघडली महामार्ग प्रशासनाची केली पाहिजे. अन्यथा ऐन पावसाळ्यात रस्ता करायचा पाण्याचा व चिखलाच्या साम्राज्याचा नाहक त्रास आजरा वासियासह तालुक्यातील येणाऱ्या नागरिकांना होणार आहे याची सर्वस्वी जबाबदारी आजरा नगरपंचायत ची आहे परंतु आजरा नगरपंचायत याकडे कानाडोळा करत असल्याने लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते आजरावासीय यांनी हा विषय हातात घेणे गरजेचे आहे. अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांच्या कडून होत आहे.

Oplus_131074

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.