हाळोली ता. आजरा श्री शंकर लिंग देव मंदिर वास्तुशांती व कलशारोहण सोहळा उत्साहात
( होळीलीत आज महाप्रसादाचे नियोजन)
आजरा.- प्रतिनिधी.
हाळोली ता. आजरा येथील श्री शंकर लिंग देव मंदिर वास्तुशांती व कलशारोहण सोहळ्यास गुरुवार दि २ मे पासून उत्साहात सुरुवात झाली असून आज दि. ३ रोजी शुक्रवारी उर्वरित धार्मिक कार्यक्रमांसह दुपारी १.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर वास्तुशांती व कलश रोहन सोहळ्याच्या धार्मिक कार्यक्रमातला गुरुवारी सकाळी कलश नंदीसह मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. अतिशय भक्तिमय वातावरणात निघालेल्या या पालखी मिरवणुकीमध्ये पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर माहेरवाशीयांचा गारवा, घागरींचे पूजन करण्यात आले. स्थानिक व बाहेरून आलेल्या महिलांचे हळदीकुंकू व ओटी भरण्याचा कार्यक्रमही पार पडला. मिरवणुकीमध्ये मेढेवाडी व शेळप येथील भजनी मंडळ सहभागी झाले होते.

त्यानंतर प्रायश्चित्त, गणेश पूजन, पुण्याहवाचन, स्थलशुद्धी, शांतीहोम, देवता स्थापना, नवग्रह स्थापना, होम हवन व आरतीचा कार्यक्रम पार पडला.
या सोहळ्यात प्रामुख्याने गावातील माघारणी अनेक वर्षांनी आपल्या गावी मंदिराच्या वास्तुशांती व कलश रोहन सोहळ्यासाठी दुरडी व कलश घेऊन आनंद व उत्साहाने सहभागी झाल्या आपल्या दिसून आल्या
ह.भ. प. सौ. वनिताताई पाटील यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

आज दि ३ रोजी देवता पूजन, मुख्य देवता पूजन, नंदी स्थापना, प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण, नैवेद्य, पूर्णाहुती, अभिषेक, पूजा, गा-हाणे, इत्यादी कार्यक्रम होणार असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी देवस्थान व्यवस्थापन कमिटी उपसमिती हाळोलीचे अध्यक्ष दशरथ अमृते, उपाध्यक्ष गोविंद केरकर, सचिव बंडोपंत बांदेकर, दयानंद गोवेकर, सखाराम बांदेकर, भिकाजी गुरव, सुरेश तावडे, हरिबा सुतार, राजाराम केरकर, दिगंबर धुरी, संदेश सुतार, रामदास गुरव, जानबा तावडे, सुरेश पाटकर, पांडुरंग धुरी, डॉ गोविंदराव पोवार, महादेव गुरव, गोविंद कापडुस्कर, ते सहदेव गुरव, आनंदा कांबळे, जितेंद्र सुतार यांच्यासह ग्रामस्थ मंडळ हाळोली / मुंबई, ग्रामस्थ मंडळ दर्डेवाडी / मुंबई चे सदस्य व हाळोली पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.