Homeकोंकण - ठाणेपतीसाठी पत्नी प्रचाराच्या रिंगणात तर पित्यासाठी कन्या मैदानात!.- रत्नागिरी - सिंधुदुर्गात नीलम...

पतीसाठी पत्नी प्रचाराच्या रिंगणात तर पित्यासाठी कन्या मैदानात!.- रत्नागिरी – सिंधुदुर्गात नीलम राणे, रूची राऊत यांचा प्रचाराचा जोरदार धडाका.

पतीसाठी पत्नी प्रचाराच्या रिंगणात तर पित्यासाठी कन्या मैदानात!.- रत्नागिरी – सिंधुदुर्गात नीलम राणे, रूची राऊत यांचा प्रचाराचा जोरदार धडाका.

सिंधुदुर्ग:- प्रतिनिधी.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा सध्या जोरात दणाणत आहेत.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी नीलम राणे त्यांना उमेदवारी जाहीर होण्याआधीपासूनच म्हणजे ५ एप्रिलपासून जोरदार प्रचार रिंगणात उतरल्या आहेत.

🟥तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी त्यांचा मुलगा गितेश आणि मुलगी रूची प्रचारात उतरली आहे.

🛑रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघामध्ये एकूण ९ उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघामध्ये दुहेरी लढतीचे चित्र आहे.महायुतीकडून भाजपाचे नारायण राणे तर महाविकास आघाडीतून उद्धवसेनेचे विनायक राऊत यांच्यातच खरी लढत आहे. दोन्ही उमेदवारांसह कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीयदेखील या राजकीय आखाड्यात प्रचारासाठी उतरले आहेत.

🔴नीलम राणे या आपल्या पतीसाठी डोअर टू डोअर भेटी देत आहेत

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे गृहिणी आहेत. यापूर्वी निलेश राणे यांच्यासाठी त्यांनी प्रचार केला आहे. सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला पदाधिकाऱ्यांना घेऊन डोअर टू डोअर भेटी देत आहेत, मेळावे घेत आहेत. तसेच गावागावात फिरून महिलांशी संवाद साधत आहेत.

🟥रूची राऊत व गितेश राऊत हे दोघेही वडीलांच्या प्रचारात मग्न.

*खासदार विनायक राऊत यांची मुलगी रूची राऊत आणि मुलगा गितेश राऊत दोघेही प्रचारात मग्न आहेत. रूची राऊत या निवडणुकीच्या अगोदरपासूनच विविध ठिकाणी उध्दवसेनेच्या व्यासपीठावर दिसत होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.