आजऱ्यात महाविकास आघाडीची शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ जंगी जाहीर सभा. कमळाबाईला हद्दपार करा आमदार भास्कर जाधव.
आजरा.- प्रतिनिधी.
महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराजांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव व आमदार सतेज पाटील यांची जाहीर सभा शनिवार २७ एप्रिल रोजी दाजी टोपले नाट्यगृह, भाजी मार्केट आजरा येथे संपन्न झाली जाहीर सभेत आमदार भास्कर जाधव बोलताना म्हणाले. एक पक्ष विरुद्ध सर्व भारत जनता ही वेळ विचार करण्याची नाही. तर आव्हान स्वीकारण्याची आहे. आज या वेळेपर्यंत तुम्ही मणिपूर मद्ये गेलात का? जातीय दंगली घटवणे हेच ह्यांचे काम देशातील हुकूमशाही नष्ट करण्यासाठी कोल्हापूरमधून शाहू महाराजांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले. यावेळी उमेदवार
शाहू महाराज म्हणाले आजरा घणासाळ साशोधन क्रेंद्रा स्थापन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. काजुला हमीभाव मिळावा यासाठी प्रयत्न करणार. MIDC चां विकास करावा लागेल. अग्निविर पद्धत बंद करून पूर्विपर पद्धत सुरू राहील असे उमेदवार शाहू महाराज म्हणाले.
यावेळी आम. सतेज पाटील म्हणाले – आजरा तालुक्यातील अनेक प्रश्न आहेत. या प्रत्येक तालुक्यात खासदाराचे संपर्क कार्यालय असेल. शाहू महाराज गेले तर कोणतेही प्रश्न उरणार नाहीत. पूर्वीच्या खासदारांनी कोणतेही काम केले नाही. किराणा मालाच्या करा मद्ये सवलत देण्यात येणार.
शिवसेना उपनेते म्हणाले संजय पवार दोन वेळा ज्यांनी फसवल आता आपण फसणार आहात काय? विकास कामांचे नियोजन काहीच नाही पण ते गलिच्छ राजकारण करत आहेत. त्यांना ४०० पार नाही. तडीपार करा असा उध्दव ठाकरे यांनी संदेश दिला.
शिवसेना ता. प्रमुख युवराज पोवार – उध्दव ठाकरे यांनी वैद्यकीय सुविधा पुरवल्या. गद्दार यावेत म्हणून मोदींना यावे लागते हीच आमची जित आहे. गोरगरीब जनतेचे महागाईने कंबरडे मोडले आहे. मतदान ला जातेवेळी सिलेंडरकडे पहावे आणि मतदान करावे.
वंचित जिल्हाध्यक्ष – दयानंद कांबळे म्हणाले संविधान धोक्यात असून हुकूमशाहीला घडण्यासाठी व संविधान वाचवण्यासाठी शाहू महाराज यांना विजयी करणे काळाची गरज आहे.
माजी नगरसेवक अभिषेक शिंपी म्हणाले – सर्व स्तरावर मोदी सरकार अपयशी. कर आकारून २००० रुपयांचे दान देतात. शासकीय नोकऱ्या रिक्त असून सुधा भरती होत नाही. राहुल गांधी यांनी हजारो किलोमिटर प्रवास करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेऊन जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी संपत देसाई म्हणाले- ज्यांच्या कडे मुद्दे नसतात तीच मंडळी गुद्यावर येतात देश कुठे घेऊन चालला आहे याचे भान मोदींना नाही महाराष्ट्रातील रोजगार सर्व गुजरात मध्ये नेऊन ठेवले महाराष्ट्रातल्या तरुण पिढीने काय करायचं. हा प्रश्न तरुण पीढी समोर उपस्थित होत आहे.
यावेळी नंदाताई बाभुलकर म्हणाल्या – ही निवडणुक ठरवेल पुढे निवडणूक होईल की नाही? त्यांचा छोटा परिवार त्यात अडाणी , आंबनी , अंबानी, हा परिवार . विकास करण्यासाठी कोणतेही पद असावे लागत नाही तर तळमळ लागते. माजी जि प अध्यक्ष उमेश आपटे -: अप्रत्यक्षपणे पैसे काढून घेत आहेत. सर्वसामान्य शेतकरी लाचार कसा बनेल हे पाहत आहेत. आमची लोकशाही संपुष्टात आणयचे कार्यक्रम यांनी केलाय. घबरणाऱ्याना घरात बसवा.
या जाहीर सभेला जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, मुकुंदराव देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, संभाजी पाटील, गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंचित चे संतोष मासुळे यांनी आभार मानले.