बाधित शेतकऱ्यांची व्यथा अद्याप नुकसान भरपाई का? मिळाली नाही.- ( संकेश्वर बांदा महामार्ग.- लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष. मतदानावर बहिष्कार टाकणार. )
आजरा.- प्रतिनिधी.
संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्ग येथील बाधित शेतकरी यांच्या जमिनी महामार्गात गेले असून अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर दि. २८ राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकरी संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
संकेश्वर बांदा महागामंर्माचे काम गेली दोन वर्षे बातु आहे. सदर महामार्गामध्ये आम्हा शेतकयांच्या जमिनी गेल्या आहेत. तसेच त्या जमिनीमधील फळ झाडे, मेसकाटी, बांबू, बेटे, घरे, विहिरी व बोअरवेल ही उध्वस्त झालेली आहेत. त्याची रीतसर नुकसान भरपाई अद्याप आम्हाला मिळालेली नाही, याकामी आम्ही मोर्चे काढले, आंदोलने केली, ज्या त्या कार्यालयाचे अधिकारी व शासन, आमदार, खासदार यांना निवेदने दिली. तरी सुध्दा आजतागायत कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई व बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे होणारे नुकसान अद्याप मिळालेले नाही. असे असताना रस्ता महामार्गांचे ठेकेदार यांनी ९०% काम पूर्ण केलेले आहे.
याकरिता भुसंपादन अधिकारी (उपविभागीय अधिकारी गारगोटी) यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये ३१ मार्च पर्यंत निवाड्याची रक्कम आदा करण्याचे मान्य केले होते. त्यानंतर आता आम्हा शेतकऱ्यांना फक्त निवाडा नोटीत्ता दिलेल्या आहेत. अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. काही शेतकन्यांच्या जमिनी वाढीवमध्ये दुसरा निवाडा करण्याचे ठरले आहे. तो सुध्दा अद्याप झालेला नाही. ज्या शेतकऱ्यांनी निवाडा नोटीस प्रमाणे कागदपत्राची पुर्तता करून दिलेली आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम अद्याप मिळालेली नाही.
निवाडा रक्कमेपैकी २०% कपात न करता संपूर्ण रक्कम मिळावी व रेडीरेकनर दराच्या धौपट रक्कम आम्हा शेतकऱ्यांना मिळावी. ही नुकसान भरपाई दि. ५/५/२०२४ पर्यंत न मिळालेस आजरा तालुक्यातील १३ गावातील शेतकरी व गडहिंग्लज तालुक्यातील ३ गावातील शेतकरी मिळून आम्ही मतदानावर बहिष्कार टाकत आहोत. वरील सर्व गोष्टीची योग्य ती खबरदारी घेऊन आम्हा महामार्गावरील बाधीत शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाईची रक्कम देऊन सहकार्य करावे असे दिलेल्या निवेदनात मध्ये आहे या निवेदनावर काँग्रेस शिवाजी गुरव, शिवाजी इंगळे, आप्पासो पाटील, दिगंबळे होरंबळे गणपती येसने,सह बाधित शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.