Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा आगाराच्या भोंगळ कारभारामुळे प्रवासी संतप्त.- आगाराच्या कारभारात सुधारणा करा अन्यथा आंदोलन.

आजरा आगाराच्या भोंगळ कारभारामुळे प्रवासी संतप्त.- आगाराच्या कारभारात सुधारणा करा अन्यथा आंदोलन.

आजरा आगाराच्या भोंगळ कारभारामुळे प्रवासी संतप्त.- आगाराच्या कारभारात सुधारणा करा अन्यथा आंदोलन.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील आजरा एस.टी. आगार कारभारात सुधारणा करणेबाबत येथील आजरावासीयांनी आगार प्रमुखांना निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
आजरा तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी असणाऱ्या आजरा आगाराचा कारभार दिवसेंदिवस भोंगळ बनत चालला आहे. मुळातच आजरा तालुका हा दुर्गम व डोंगराळ आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात व वाडीवस्त्यांवर दळणवळणाची व इतर कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे बहुतांशी तालुका वासियांचा प्रवास एस.टी. बसवरच अवलंबून आहे. मात्र आगार प्रशासनाचा भोंगळ कारभाराचा फटका तालुका वासियांना बसत आहे. बऱ्याचवेळा आजरा-कोल्हापूर, आजरा-पुणे या गाड्या सावंतवाडी गाडी आजरा बसस्थानकात आलेनंतर त्याचेपूर्वी या गाड्या सोडल्या जातात. त्यामुळे त्या बऱ्याचवेळा मोकळ्या धावतात. तरी सावंतवाडी आगारच्या गाड्यांचे वेळापत्रक पाहुन आपल्या गाड्यांचे वेळापत्रक अॅडजेस्ट करावे म्हणजे दोन्ही गाड्यांना प्रवाशी मिळतील. तसेच आजरा-पुणे या मार्गावर धावणाऱ्या गाड्या फारच जुन्या व अस्वच्छ असतात. त्याबद्दल प्रवाशांच्या तक्रारी आहेत. तसेच आपणाकडून जुन महिन्यामध्ये नवीन वेळापत्रक तयार करणेचे आश्वासन दिले आहे. तोपर्यंत सद्या चालु असलेने वेळापत्रकाप्रमाणे गाड्या वेळेवर सोडणेची व्यवस्था करावी. अनेक बसेसचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. याबाबत एस.टी. महामंडळाकडून काय उपाययोजना करणेत येत आहे याची माहिती मिळावी. वरील सर्व बाबींचा विचार करून प्रवाशांची गैरसोय दुरु होणेच्या दृष्टीने तातडीने प्रयत्न करुन आम्हा आजरेकर प्रवाशी, नागरीक यांना सहकार्य करावे अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल याची नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर समिती अध्यक्ष परशुराम बामणे,अध्यक्ष एस.टी प्रवासी संघटना सचिन इंदुलकर, समिती उपाध्यक्ष सुधीर कुंभार, तसेच पांडुरंग सावरतकर, रौनक कारेकर, गौरव देशपांडे विजय थोरवत, डॉ. प्रविण निंबाळकर, जोतिबा आजगेकर जावेद पठाण नौशाद बुड्ढेखान, नाथ देसाई यांच्या सह्या आहेत.‌

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.