गडहिंग्लज मध्ये हेल्मेट सक्तीला विरोध.- संकेश्वर – बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन. (शालेय विद्यार्थी यांच्या सुरक्षिततेसाठी जे उपाय करणे गरजेचे आहे त्याबाबत पोलिसांनी सरकारला अहवाल द्यावा.)
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.
गडहिंग्लज मध्ये हेल्मेट सक्तीला विरोध.- संकेश्वर – बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गडहिंग्लज मधुन संकेश्वर – आंबोली असा महामार्ग बनवण्याचे काम चालू आहे. सुरुवातीपासून आम्ही सरकारकडे निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या जमिनी रीतसर संपादन करून मोबदला देणे, तसेच जिथे रस्ता क्रॉस करावा लागतो तेथे हायवेवर प्रवेश करण्यासाठी तरतूज करा. गडहिंग्लज व आजरा शहराच्या हद्दीतून रस्ता करताना बायपास रस्त्याची व्यवस्था करा अशी मागणी अनेक वेळा निवेदन देऊन केली आहे याकडे मात्र डोळे झाक करून रस्ता बनवला जात आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक गावाच्या मधून रस्ता महामार्ग गेला आहे तिथे उड्डाणपुलाची गरज आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी अत्याळ – बेळगुंदी जवळ रस्ता पास करताना एका महिलेला जीव गमवावा लागला. चालत जाणारी महिला हेल्मेट घालू शकते का? हेल्मेट मुळे वाहन चालवणारा सुरक्षित राहील मात्र नागरीक, शालेय विद्यार्थी यांच्या सुरक्षिततेसाठी जे उपाय करणे गरजेचे आहे त्याबाबत पोलिसांनी सरकारला अहवाल देऊन कंपनीला कामाबाबत व पर्यायी मार्गा बाबत सूचना देणे गरजेचे आहे तसेच शहरामध्ये वाहतूक कोंडी होते त्याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. आवश्यक त्या प्रमाणात पोलिस नसल्याने बर्याच वेळा या समस्या निर्माण होतात त्यामुळे पोलिसांची भरती करण्यासाठी सरकारनेही लक्ष देणे आवश्यक आहे. कोल्हापूर मध्ये हेल्मेट सक्तीला विरोध करून नागरिकांनी डाव हाणून पाडला होता. आता तोच प्रयोग गडहिंग्लज मध्ये चालू करण्याचा प्रयत्न आहे. कृपया हेल्मेट सक्ती करू नये. हायवेला दीर्घ प्रवास करण्यासाठी दुचाकीस्वारांना हेल्मेट असावे; मात्र सक्ती नसावी. नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. याबाबत प्रबोधन आवश्यक आहे. मात्र हेल्मेट सक्ती करून गोरगरीब शेतकरी कामगार कामा निमित्त शहरात ये-जा करत असतात. अशा नागरिकांना विनाकारण त्रास दिला जाऊ शकतो. महसूल गोळा करण्याचा हा नवा प्रयोग असावा. असे वाटते. कृपया जनतेच्या भावना लक्षात घेऊन हेल्मेट सक्तीचा निर्णय मागे घ्यावा अशी नागरिकांची मागणी आहे. कृपया विचार व्हावा अन्यथा विनाकारण नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागेल. कृपया हेल्मेट वापराबाबत प्रबोधन असावे; मात्र सक्ती नसावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ह्या निवेदनावर बाधित शेतकरी संघटना पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.
