आजरा/ खेडे येथील समीर सावरतकर या तरुणाची शेतातील घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या.
आजरा.- प्रतिनिधी.
खेडे ता. आजरा येथील समीर अंतु सावरतकर (वय ३८ वर्षे ) याने शेतातील घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असून.
याबाबत खेडे मधुन मिळालेली माहिती अशी की
समीर याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये शेतातील घरामध्ये आज दुपारी आढळून आला. समीर याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, भावजय व मुले असा परिवार आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास आजरा पोलीस करीत आहेत.
