आजरा अर्बन बँकेच्या ३३ व्या बेळगुंदी, ता.जि. बेळगावी शाखेचा शुभारंभ संपन्न.
बेळगांव.- प्रतिनिधी.
मल्टी स्टेट दर्जा प्राप्त केलेली देशातील २१ वी नॉन शेड्यूल्ड नागरी सहकारी बँक व शेड्यूल्ड दर्जाकडे वाटचाल असलेल्या दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेची ३३ व्या बेळगुंदी, ता. जि. बेळगावी शाखेचा उद्घाटन समारंभ दि. २३ एप्रिल २०२४ रोजी सर्व अद्ययावत सेवासह पार पडला.
याप्रसंगी अण्णा भाऊ संस्था समूह प्रमूख व बँकेचे संचालक अशोकअण्णा चराटी यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणेसाठी बेळगुंदी येथे शाखा सुरू केलेचे आपले मनोगतामध्ये संगितले. बेळगुंदी व परिसरातील ग्राहकांना बँकेमार्फत अद्यावत व तत्पर सेवा देणेची ग्वाही चेअरमन रमेश कुरुणकर यांनी दिली. तसेच चेअरमन मा.श्री. रमेश कुरुणकर व त्यांच्या सौभाग्यवती सौ. मंगल कुरुणकर यांचे हस्ते नवीन जागेत सत्यनारायण पुजा करणेत आली.
बेळगुंदी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. सुभाष हदगल यांनी शाखा सुरू केलेबद्दल शुभेच्छा दिल्या असून बँकेकडून जलद सोयी सुविधा देणे विषयी बँकेचे संचालक मंडळाला आवाहन केले.

यावेळी बँकेचे व्हा. चेअरमन सुनील मगदुम, संचालक सुरेश डांग, विलास नाईक, डॉ. दीपक सातोसकर, डॉ. अनिल देशपांडे, किशोर भुसारी, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके, सौ. प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, सौ. अस्मिता सबनिस, सुर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण, अॅड. सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशांत गंभीर तसेच बेळगुंदी व परिसरातील प्रतिष्ठित मंडळी नानासाहेब पाटील, शामराव बेनके, प्रसाद बोकडे, सूरज बेटगेरीकर, विक्रम बाचीकर, अमितकुमार पाटील, मोहन परब आदि मान्यवर उपस्थित होते