Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा अर्बन बँकेच्या ३३ व्या बेळगुंदी, ता.जि. बेळगावी शाखेचा उद्घाटन समारंभ होणार...

आजरा अर्बन बँकेच्या ३३ व्या बेळगुंदी, ता.जि. बेळगावी शाखेचा उद्घाटन समारंभ होणार २३ एप्रिल रोजी.

आजरा अर्बन बँकेच्या ३३ व्या बेळगुंदी, ता.जि. बेळगावी शाखेचा उद्घाटन समारंभ होणार २३ एप्रिल रोजी.

आजरा.- प्रतिनिधी.

आर्थिक सक्षमतेचे आणि व्यवसाय वाढीचे निकष पूर्ण करीत आजरा अर्बन बँकेची वाटचाल सुरू आहे. या वाटचालीमध्ये नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेने १५०० कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. केवळ व्यवसाय हा निकष न पाहता समाजाची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे संस्था आणि शाखा विस्तार हे तत्व संस्थापक कै. आण्णा आणि कै. भाऊ यांनी विचारात घेतले होते. याच विचारांचा पाठपुरावा करत विद्यमान संचालक मंडळाने कर्नाटक राज्यामध्ये बेळगुंदी येथे शाखा विस्ताराचा प्रस्ताव ठेवला आणि दिनांक २३ एप्रिल २०२४ रोजी सर्व अद्ययावत सेवासह या शाखेचे उद्घाटन होत आहे. आजरा बँकेची ही ३३ वी शाखा आहे. या भागात छोटे उद्योग आणि व्यवसाय उभे रहावेत आणि त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळावी हा दृष्टीकोन बँकेच्या व्यवस्थापनाने ठेवला आहे. उद्घाटनाच्या दिवशी पूजा आणि तीर्थप्रसादाचे आयोजन केले आहे त्याला बँकेचे सर्व ग्राहक, सभासद आणि हितचिंतक यांनी उपस्थित राहावे असे आग्रहाचे निमंत्रण आण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी, चेअरमन रमेश कुरुणकर, व्हा. चेअरमन सुनील मगदुम, संचालक सुरेश डांग, विलास नाईक, डॉ. दीपक सातोसकर, डॉ. अनिल देशपांडे, किशोर भुसारी, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके, सौ. प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, सौ. अस्मिता सबनिस, सुनिल मगदूम, सुर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण, अॅड. सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.