Homeकोंकण - ठाणेभीषण आगीच्या घटना.मुंबईतील भाजपच्या कार्यालयाला आग.- अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल.- आग...

भीषण आगीच्या घटना.मुंबईतील भाजपच्या कार्यालयाला आग.- अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल.- आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. 🟥मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खाजगी बसला भीषण आग.-बस जळून खाक.- चालकाच्या प्रसंगवधानामुळे सर्व प्रवाशांचे वाचले प्राण.

मुंबई :- प्रतिनिधी.‌

एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपच्या मुंबईतील नरीमन पॉइंट येथील कार्यालयाला आग लागली आहे. आग लागल्यानंतर अवघ्या काही वेळातच आग भडकली. त्यामुळे धूर आणि आगीचे लोट पसरले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आग अटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे.
🟥आज दुपारी ४.३५ वाजण्याच्या सुमारास भाजपच्या कार्यालयाला आग लागली आहे. नरीमन पॉइंट येथील भाजपच्या या कार्यालयाचं नुतनीकरणाचं काम सुरू होतं. कार्यालयातील किचनमध्ये काम सुरू होतं. या ठिकाणी वेल्डिंगचं काम सुरू असताना अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि त्यानंतर आग लागली. त्यानंतर ही आग अधिकच भडकत गेली. ऑफिसमध्ये कागदपत्रे आणि लाकडी फर्निचर असल्याने आगीने अधिकच पेट घेतला आणि त्यामुळे धुराचे लोटही पसरले. हे धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरले. त्यामुळे या परिसरात काळोख पसरल्यासारखं वातावरण झालं.
🛑या कार्यालयात भाजपचं सोशल मीडियाचं काम चालतं. त्यामुळे निवडणुका असल्याने आजही सोशल मीडियाचं काम सुरू होतं. तेवढेच कर्मचारी ऑफिसमध्ये होते. आग लागल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी हातातील काम टाकून तात्काळ बाहेर धाव घेतली. सर्व कर्मचारी एका क्षणात ऑफिसच्या बाहेर पडले. त्यामुळे आगीत कोणीही अडकले नाही. अग्निशमन दलाला या आगीची माहिती देण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही वेळात अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्याचं प्रयत्न सुरू आहेत.

🟥मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खाजगी बसला भीषण आग.-
बस जळून खाक.- चालकाच्या प्रसंगवधानामुळे सर्व प्रवाशांचे वाचले प्राण.

खोपोली :- प्रतिनिधी.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास खाजगी बसला भीषण आग लागली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवाशी सुखरुप आहेत. ही बस लग्नाचे वऱ्हाड घेऊन चालली होती अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. बसला आग लागल्यानंतर काही क्षणातच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या बसमधून सुमारे ४२ प्रवासी प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे.
🔴याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही बस मुंबईहून सोलापूरकडे वऱ्हाड घेऊन निघाली होती. रात्री दोनच्या सुमारास ही बस मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खोपोलीजवळ आली असताना या बसला आग लागली. आग भडकल्याचे दिसताच प्रवाशांनी प्राण वाचवण्यासाठी आरडाओरडा करत मदतीसाठी याचना सुरू केली. दरम्यान, महामार्ग पोलीस, अग्निशमन दल, डेल्टा फोर्स आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असणाऱ्या संस्था यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आले. घटनेची माहिती घटनास्थळी खोपोली अग्निशामक दल देवदूत रेस्क्यू टीम, आयआरबी डेल्टा फोर्स, दस्तुरी बोरघाट महामार्ग पोलीस आणि खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीची टीम पोहोचली.यावेळी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. या प्रकारामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र आता वाहतूक पूर्व पदावर येत असून चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली याबाबत स्पष्ट माहिती समोर आली नाही, मात्र शॉर्टसर्किटमुळे हि आग लागल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचा असा मार्ग आहे. दररोज हजारो प्रवासी या महामार्गावरून प्रवास करत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे ही मोठी चिंतेची बाब आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.