HomeUncategorizedशेतकऱ्यांना पुर्व सुचना न देता.- शक्तीपीठ महामार्गच्या सर्व्हे पथकाला शेतकऱ्यांनी पाठवले माघारी.(...

शेतकऱ्यांना पुर्व सुचना न देता.- शक्तीपीठ महामार्गच्या सर्व्हे पथकाला शेतकऱ्यांनी पाठवले माघारी.( आजरा – खेडगे पारपोलीच्या महिला सरपंच व ग्रामस्थांचा पुढाकार.)

शेतकऱ्यांना पुर्व सुचना न देता. – शक्तीपीठ महामार्गच्या सर्व्हे पथकाला शेतकऱ्यांनी पाठवले माघारी.
( आजरा – खेडगे पारपोलीच्या महिला सरपंच व ग्रामस्थांचा पुढाकार.)

आजरा – प्रतिनिधी.

शक्तीपीठ महामार्गचे सर्व्हेक्षण करण्यासाठी आलेल्या पथकाला आज आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध करून माघारी पाठवले. आज कोणतीही पूर्वसूचना न देता आजरा तालुक्यातील खेडगे, पारपोली, सुळेरान, शेळप येथे महामार्गचे पथक आले होते. या पथकाला शेतकऱ्यांनी विरोध केला. खरंतर या महामार्गला शेतकऱ्यांचा विरोध आहेच, गेले अनेक दिवस शेतकरी निवेदने, मेळावे, परिषदा सभा घेऊन आपला विरोध दर्शवत आहेत. पण या विरोधाला सकारात्मक प्रतिसाद न देता त्यांचा विरोध लक्षात न घेता सरकार बळजबरीने सर्व्हे करू पाहत आहे. आज आलेल्या पथकाला खेडगे येथे पारपोलीच्या सरपंच प्रियांका शेटगे, धोंडिबा सावंत, प्रकाश कवीटकर, धाकु कविटकर, अनिल अमुनेकर यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांनी एकत्र येत सर्व्हे पथक माघारी पाठवले. २५ तारखेला वाघापूर ता भुदरगड येथे शक्तीपीठ महामार्ग विरोधी मेळाव्याला कॉ संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचा निर्धारही यावेळी शेतकऱ्यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.