पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त ७७.५७ टक्के मतदान.- महाराष्ट्रात ५४.८५ टक्के इतके मतदान तर बिहारमध्ये ४६.३२ टक्के एवढे सर्वात कमी मतदान ( महाराष्ट्रातील मतदान केंद्राबाहेरील बुधवर स्लीप वर कमळाचे चिन्ह देऊन आचारसंहिता भंग सोशल मीडिया वायरल)
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था.
देशात लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंपर मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये ७७.५७ टक्के आणि महाराष्ट्रात ५४.८५ टक्के मतदान झाले.
🟥लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. 21 राज्यातील 102 जागांवर एकूण 1600 उमेदवार उभे होते. त्यांचं भवितव्य मतदारांनी ईव्हीएममध्ये बंद केलं. सकाळी 7 वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होते. देशात सरासरी 59.71% नोंद झाली आहे. मतदानात पश्चिम बंगालने बाजी मारली. पश्चिम बंगालमधअये तब्बल 77.57% टक्के मतदान झालं. तर बिहारमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. बिहारमध्ये 46.32 मतदान झालं.
🅾️महाराष्ट्रात आज पहिल्या टप्प्यात 5 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं. सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 57.06 टक्के मतदान झालं. पहिल्या टप्प्यात आज विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर या मतदार संघात मतदान झालं. 102 जागांवर 16.63 कोटी मतदार होते. यात 8.4 कोटी पुरुष, 8.23 कोटी महिला आणि 11,371 ट्रान्सजेंडर मतदार होते. 35.67 लाख मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार होते. 13.89 लाख दिव्यांग मतदारांचा समावेश होता. त्यांना घरातून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली होती.

{ महाराष्ट्रातील काही निवडणूक मतदान केंद्राच्या बाहेर बुथवर मतदान क्रमांकाची चिठ्ठी देताना मागील बाजूस भाजपचे कमळ चिन्ह असल्याची मशीन मधून चिट्टी येत होती यावर काही मतदाराने विरुद्ध दर्शवला तर एका मतदारांनी त्याला विरोध केला. यावरती संबंधित उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी या विरोधाला समर्थन करत आम्ही चिट्टी फाडून टाकतो तरीही चिठ्ठी देण्याचे काम चालू होते यामुळे संबंधित विरोध करणाऱ्या व्यक्तीने पुढल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकींद्रावरती असे प्रकार घडू नये मतदारांनी सतर्क रहावे असे आवाहन केले सदरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. आचारसंहिता आहे की नाही.. }