अन्नदाता शेतकरी केंद्रबिंदू मानून संसदेत काम करणार - छत्रपती शाहू महाराज.
( आजरा ता. दौरा – उत्तुर, पेरणोली, गवसे पोळगाव मलिग्रे गावात प्रचार सभा.)
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांचा आजरा तालुक्यातील दौरा उत्तुर, पेरणोली, गवसे, पोळगाव, वांटगी, मलिग्रे गावात प्रचार सभा मोठ्या शक्ती प्रदर्शनाने संपन्न झाल्या. यावेळी बोलताना उमेदवार छत्रपती शाहू महाराज म्हणाले शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून भविष्यात व संसदेत काम करणार आहे या विभागात भात पिकासह बांबू काजू या उद्योगाला चालना मिळावी यासाठीही काम करणार आहे. येणाऱ्या काँग्रेसच्या राजवटीत महागाई सह जीएसटी कमी केला जाईल शाहूंच्या क्षमतेचा विचार सोबत घेऊन पुढे जाऊ मी आपल्याला नेहमी उपलब्ध राहील. मागील दोन-तीन वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिका जिल्हा परिषद या निवडणुका झालेल्या नाहीत भविष्यात विधानसभा किंवा लोकसभा होतील की नाही याची शास्वती नाही वेगवेगळ्या पक्षांचे तुकडे करून महाराष्ट्र दिशाहीन करून ठेवला आहे अशा प्रवृत्तीला वेळेतच थांबवले पाहिजेत महाराष्ट्र सोबत देश सुखी आणि समृद्ध पाहायचा असेल देश आज कोणत्या दिशेने जात आहे. हे सर्वश्रुत आहे. आमिषांना बळी पडून जर पुन्हा भाजपकडे सत्ता दिली तर देशात हुकूमशाही येईल. त्यामुळे जनतेने ठरविण्याची हीच वेळ आहे. असे मत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केले. आजरा तालुक्यात झालेल्या विविध प्रचारसभांतत संबोधित करत होते. देशात महाराष्ट्र अग्रेसर होते. मात्र या राज्याची अवस्था या सरकारने दैनीय करुन ठेवली आहे.येथील महत्वाचे उद्योग गुजरात व अन्य ठिकाणी नेले आहे.रोजगार देण्याची घोषणा करणाऱ्या केंद्र व राज्य सरकारने तरुणांची स्वप्ने धुळीस मिळवली आहे. आजरा तालुक्यात बांबू,काजू,घनसाळ मुबलक प्रमाणात आहे.येथे प्रक्रिया उद्योग नाही.उद्योगधंदे उभारले गेल्यास येथे रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यापुढील काळात शेतकरी केंद्र बिंदू माणून काम करणार असल्याचे आश्वासन शाहू महाराजांनी या सभेतून दिले.
पेरणोली सभेत कॉ.संपत देसाई, जयवंतराव शिंपी, प्रकाश पाटील तर गवसे सभेत अभिषेक शिंपी, संजय तर्डेकर यांनी मनोगत व्यक्त केले. आपला देश ऐतिहासिक निवडणुकीला सामोरे जात आहे. देशात अघोषित आणिबाणी आहे. हिटलरशाही कार्यपद्धत सुरु आहे.घटनेच्या मुलभूत हक्कावरच घाला घातला जात आहे. हे सरकार कोणत्याच घटकाचे हित जोपासणारे नाही. देश व संविधान वाचविण्यासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी निर्धार करुया असे मत मांडण्यात आले.

मलिग्रे येथील दिवसभराच्या शेवटच्या प्रचार सभेत गडहिंग्लज येथील प्रा. कुराडे, नंदाताई बाबुळकर, रामराजे कुपेकर, अमर चव्हाण, कागल शिवानंद माळी, यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. तर उभाठा गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंदे यांनी शिवसेनेची भूमिका मांडताना शिवसेनेत फूट पडून झालेल्या गद्दारीला व गद्दारांना जागा दाखवण्याची हीच वेळ असल्याचे आवाहन शिवसैनिकांना केले श्री. शाहू महाराजांच्या विजयात उभाठा गटाच्या शिवसेनेचा सिंहाचा वाटा असेल असे श्री शिंत्रे म्हणाले.
या सभांना राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, माजी जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, गोकुळ संचालिका अंजना रेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख (ठाकरे) सुनिल शिंत्रे यांच्यासह मुकुंद देसाई, राजेंद्र सावंत, उदय पवार, रणजित देसाई,उमेश आपटे, संकेत सावंत, पेरणोली सरपंच प्रियांका जाधव, रविंद्र भाटले, अनिकेत कवळेकर, उत्तम देसाई, प्रकाश मोरुस्कर, संजय तरडेकर किरण कांबळे,संभाजी पाटील, रशिद पठाण, वंचित चे संतोष मासुळे , आजरा कारखाना संचालक हरिबा कांबळे अशोक तरडेकर, तसेच संजय सावंत व राष्ट्रीय कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.