आजऱ्यातील मुख्य बाजारपेठेत इंडिया आघाडी चे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांचे पॅम्पलेट वाटून प्रचार.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील मुख्य बाजार पेठत, आजरा इंडिया आघाडी चे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांचे जाहिरात पत्रक वाटून प्रचाराला शहरात सुरवातु करण्यात आली आहे. कुपे. ता. गडहिंग्लज येथील प्रचार सभेत जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांचे जाहिरात पत्रक वाटप करत प्रचाराला सुरुवात करायचा सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने करताना आजरा तालुक्याचे जेष्ठ नेते जयवंतराव शिंपी, नगरसेवक किरण कांबळे, सौ. नगरसेवक संजयभाऊ सावंत, सौ. नगरसेवक अमित खेडेकर, नगरसेवक इम्रान सोनेखन , नगरसेवक मंजूर मुजावर, शिवसेना नगरसेवक संभाजी पाटील, शिवसेना ता प्रमुख युवराज पोवार, विक्रमसिंह देसाई , रवी भाटले , कॉ. संपत देसाई , विक्रम पटेकर (चेअरमन आजरा सेवा संस्था), शहरप्रमुख ओंकार माद्याळकर यांच्यासह मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते सह. अभिषेक शिंपी टिम सतेज आजरा सहभागी झाली होती.