श्रीमती विजया बाबूराव देशपांडे – भावपूर्ण श्रद्धांजली.- रविवार दि.१४ व सोमवार दि.१५ एप्रिल रोजी त्यांचे दिवस कार्य.
आजरा.- प्रतिनिधी.
खेडे ता.आजरा येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित महिला श्रीमती विजया बाबूराव देशपांडे (सद्या रा.एकता कॉलनी ,राईस मिल समोर आजरा) वय ७७ वर्षे यांचे बुधवार दि.३ एप्रिल २०२४ रोजी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांचा अल्प परिचय थोडक्यात. स्व. श्रीमती विजया देशपांडे यांचा स्वभाव साधा मनमिळावू व प्रेमळ असा होता .त्या उत्कृष्ठ गृहिणी होत्या. सातारा हे त्यांचे माहेर होत. त्यांचे शिक्षण ११ वी पर्यंत झाले होते. त्यांना भजनाची आवड होती.त्या भक्तिगीते व भावगीते गायन करीत असत तसेच त्यांना वाचनाचीही खूप आवड होती. त्यांच्या अचानक जाण्याने गावासह तालुक्यात शोककळा पसरली आहे. खेडे चे सरपंच व आजरा सुतगीरणीचे संचालक डॉ. संदीप देशपांडे यांच्या आई होत.रविवार दि.१४ व सोमवार दि.१५ एप्रिल रोजी त्यांचे दिवस कार्य आजरा येथील राहत्या घरी संपन्न होणार आहेत.