महायुतीचे उमेदवार मा.प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आकुर्डे जिल्हा परिषद मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक गारगोटी, ता.भुदरगड येथे संपन्न.
राधानगरी. प्रतिनिधी .

महायुतीचे उमेदवार मा.प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आकुर्डे जिल्हा परिषद मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक गारगोटी, ता.भुदरगड येथे संपन्न झाली. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी पाटबंधारे राज्यमंत्री असताना दुधगंगा नदीचे पाणी वेदगंगा नदीमध्ये टाका नल्यात टाकून मुदाळ, कूर, कोनवडे, टिक्केवाडी, दारवाड, बसरेवाडी, मिणचे यासह पंचक्रोशीतील शेकडो एकर शेती सिंचनाखाली आनून हा परिसर सुजलाम-सुफलाम करण्याचे काम केले. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारले. यामुळेच सन 2009 सालच्या लोकसभा निवडणूकीमध्ये या खोरीने स्वर्गीय मंडलिक साहेब यांच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली होती. त्याचीच पुनरावृत्ती यावेळच्या लोकसभा निवडणूकीमध्ये करावी असे आवाहन त्यांनी केले.
खासदार संजय मंडलिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या सन 2019 व 2021 सालच्या महापुरामध्ये केलेले काम, कोवीड आजरामध्ये केलेले काम प्रेरणादायी असून त्यांनी आपला संपुर्ण खासदार फंड कोवीड-19 च्या उपाययोजनांकरीता शासनाकडे वर्ग केला. अडचणीच्या काळात अनेकांना मदत केली त्यामुळे ते आपले हक्काचे खासदार म्हणून ओळखले जात असल्याचे सांगितले.
यावेळी गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, राहूरी कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य दत्तात्रय उगले, कल्याणराव निकम, माजी पंचायत समिती सदस्य मदनदादा देसाई, अशोकराव भांदीगरे, माजी सभापती आक्काताई नलवडे, जयवंतराव चोरगे, टी.एम.देसाई, संजय देसाई, शरदराव देसाई, संजय गांधी समिती अध्यक्ष विक्रम पाटील, दिनकरराव देसाई, शामराव पाटील, बाबुराव देसाई, धनाजी देसाई (बापू,) विभाग प्रमुख बाळ देसाई, उमाजी पाटील, सचिन गुरव, एस.पी.पाटील, टी.डी.पाटील, अतुल पाटील, शामराव मोहिते, लक्ष्मण राऊळ, युवराज देसाई, रायाण्णा वायदंडे, तानाजी पाटील, अमर पाटील, यांच्यासह प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.