🟥राहुल गांधी यांची संपत्ती २० कोटी रूपयांपेक्षा जास्त.
🛑रत्नागिरी जिल्ह्यात ४२९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई.- तर निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील तिघांना करण्यात आले तडिपार.- जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी.
नवी दिल्ली.- वृत्तसंस्था.

🅾️वायनाडचे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना आपली संपत्ती जाहीर केली. वायनाडमधून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, राहुल गांधी यांची एकूण संपत्ती २० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती बिझनेस स्टॅण्डर्डने आपल्या संकेतस्थळावर दिली.यापैकी राहुल गांधींकडे ९.२४ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे आणि स्थावर मालमत्ता सुमारे ११.१४ कोटी रुपयांची आहे. गांधी यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात ४९.७९ लाख रुपयांचे दायित्वही जाहीर केले.
🔴१५ मार्च २०२४ पर्यंत राहुल गांधी यांची शेअर बाजारात ४.३३ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. गांधी वंशजांनी अल्काइल अमाइन्स केमिकल्स, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, दीपक नाइट्राइट, डिवीज लॅबोरेटरीज, डॉ लाल पॅथलॅब्स, फाइन ऑरगॅनिक इंडस्ट्रीजमध्ये शेअर्स खरेदी केले आहेत. , गरवारे टेक्निकल फायबर्स, GMM Pfaudler, हिंदुस्तान युनिलिव्हर, ICICI बँक, Info Edge (India), Infosys, ITC, LTI Mindtree, Mold-Tek Packaging, Nestle India, Pidilite Industries, Suprajit Industries, Tata Consultancy Services (TCS), Tips. , Tube Investments of India, Vertoz Advertising. विनाइल केमिकल्स (भारत), आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज ५.५ लाखाची गुंतवणूक आहे.याशिवाय, त्यांच्याकडे काँग्रेस समर्थित नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची मूळ कंपनी यंग इंडियनचे १,९०० इक्विटी शेअर्स आहेत, ज्याची किंमत १.९० लाख रुपये आहे. गांधी यांनी म्युच्युअल फंडात ३.८१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. राहुल गांधींनी घेतलेल्या म्युच्युअल फंडांमध्ये HDFC MCOP DP GR, HDFC Small Cap DP GR, ICICI EQ&DF D ग्रोथ, PPFAS FCF D ग्रोथ, HDFC स्मॉल कॅप Reg-G, HDFC हायब्रीड डेट फंड-G आणि ICICI प्रुडेन्शियल Reg बचत-G यांचा समावेश आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी १५.२१ लाख रुपयांचे सुवर्ण रोखे (SGBs) २२० युनिट्स खरेदी केले. त्यांनी राष्ट्रीय बचत योजना (NSS), पोस्टल बचत योजना, विमा पॉलिसी आणि पोस्ट ऑफिस किंवा विमा कंपनीमधील कोणत्याही आर्थिक साधनांमधील गुंतवणूक आणि रक्कम यासारख्या योजनांमध्ये ६१.५२ लाख रुपयांची गुंतवणूक घोषित केली.तसेच राहुल गांधी यांच्याकडे ३३३.३०० ग्रॅम सोने आणि ४.२० लाख रुपये किमतीचे इतर दागिने आहेत. गांधींनी बहीण प्रियंका गांधी वड्रा यांच्यासमवेत शेतजमिनीची मालकी घोषित केली असून त्याची किंमत २.१० कोटी रुपये आहे.
🛑रत्नागिरी जिल्ह्यात ४२९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई.- तर निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील तिघांना करण्यात आले तडिपार.- जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी.
रत्नागिरी:- प्रतिनिधी
आचारसंहितेनंतर प्रतिबंधात्मक कारवाईंवर अधिक भर देण्यात आला आहे. आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात ४२९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून १५९ जणांना अजामीनपात्र नोटीसा बजावण्यात आल्या आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील तिघांना तडिपार करण्यात आले आहे. अंमली पदार्थांचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
🟥निवडणुकीशी संबंधित गुन्हे दाखल करण्यावर अधिकाधीक भर दिला जात आहे. अवैध दारूधंद्यांवर कारवाई सुरू आहेत. या कालावधीत १११ छापे टाकण्यात आले असून त्यातून लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ९३ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात ९ लाख ४२ हजार ६७८ किंमतीची १०४७ लिटर हातभट्टीची दारू, ७३.४८ लिटर विदेशी दारू, ४२.४८ लिटर देशी दारू तसेच रसायन जप्त करण्यात आले आहे.तसेच अजामीनपात्र नोटीस बजावण्यावरही भर देण्यात येत आहे. पाहिजे असलेले आणि फरीरी असलेले आरोपी यांची शोध मोहीम सुरू आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने चिपळुणातील एक आणि रत्नागिरीशहरातील दोन अशा एकूण तीन जणांना तडिपार करण्यात आले आहे. अजुनही जे प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्याचा पाठपुरावा करण्यात येत असल्याचे पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.
🅾️लोकांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा, कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चांगली आहे. त्यामुळे सर्वांनी न भिता मतदानाचा हक्क बजावावा, या उद्देशाने रत्नागिरी, चिपळूण, दापाेली आदी शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागामध्येही पोलिसांचे पथसंचलन सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागातही असेच पथसंचलन करण्यात येईल, असेही पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघात १९ मार्च रोजी कणकवली मतदार संघात १० लाख आणि २५ मार्च रोजी सावंतवाडी मतदार संघात ४ लाख अशी एकूण १४ लाख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. या दोन्ही मतदार संघात मिळून १ कोटी १३ लाख ५८ हजार ३५० रूपये किंमतीची १६ लाख ३०० लिटर दारू जप्त करण्यात आली. तसेच या कालावधीत १७०० रूपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
🟥लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात ४ हजार ३०७ शस्त्रे पोलिसांच्या ताब्यात
रत्नागिरी:- प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी – सिंदुधुर्ग मतदार संघात आत्मसंरक्षण तसेच शेती संरक्षणासाठी असलेल्या एकूण ७ हजार ५४८ परवानाधारक शस्त्रांपैकी ४ हजार ३०७ शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यात आली आहेत.अपवादात्मक काही बँका तसेच विशेष व्यक्ती यांना सवलत देण्यात आली असून एकूण २५५ शस्त्रे ही जमा करण्यात आलेली नाहीत.
कोणत्याही निवडणुकीवेळी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी, यासाठी उमेदवार आणि मतदार यांच्यासाठी आचारसंहिता लागू करण्यात येते. या आचारसंहितेच्या नियमांचे पालन काटेकोररित्या करण्यासाठी अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांकडे दिली जाते. त्यामुळे निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यापासून ते मत मोजणीपर्यंत आचारसंहितेचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक असते.निवडणुकीच्या काळात कुठल्याही बाबीमध्ये नागरिक किंवा उमेदवारांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणुन ज्यांच्याकडे शस्त्र आहेत, ती सर्व शस्त्रे पोलिस विभागाकडे जमा करावी लागतात.
🟥शस्त्रे बाळगणाऱ्यांना शस्त्रे घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने परवाना मिळतो. त्यासाठी पोलिस विभागाकडून त्या व्यक्तीची पूर्ण माहिती घेतली जाते. त्यानंतरच त्याला शस्त्र परवाना मिळतो. शेती संरक्षणासाठी आणि आत्म संरक्षणासाठी अशा दोन प्रकारची शस्त्रे असतात. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदार संघातील एकूण ७,५४८ शस्त्रांपैकी ४,३०७ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.जिल्ह्यातील विविध प्रकारची शस्त्रे बाळगणारे ३०८३ शस्त्रधारक आहेत. त्यापैकी २८६६ जणांना शस्त्रे जमा करण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी २५५९ जणांची शस्त्रे जमा करण्यात आली आहेत.
🔴बँका तसेच अपवादात्मक व्यक्ती अशा २१७ जणांना यातून वगळण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ४४६५ शस्त्रधारक आहेत. त्यापैकी ४३८९ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या. त्यापैकी २०३५ जणांची शस्त्रे जमा करण्यात आली आहे तर ३८ जणांना सवलत देण्यात आली आहे. दोन्ही जिल्ह्यातील मिळून ७२५५ शस्त्रे बुधवार, दि. १० एप्रिलपर्यंत प्रशासनाकडे जमा करण्यात आली आहेत. २५५ जणांसाठी विशेष सवलत देण्यात आली आहे.शुक्रवार, दि. १२ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची सुरूवात होणार आहे. तोपर्यंत शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले आहे.