HomeUncategorizedजुन्या पद्धतीने घरफाळा व पाणीपट्टी भरा व सहकार्य करावे.- आजरा रहिवासी अन्याय...

जुन्या पद्धतीने घरफाळा व पाणीपट्टी भरा व सहकार्य करावे.- आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचे नागरिकांना आवाहन.🛑वडकशिवालेतील जेष्ठ नागरिक बंडू शिंदे यांचे दुःखद निधन.

🛑जुन्या पद्धतीने घरफाळा व पाणीपट्टी भरा व सहकार्य करावे.- आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचे नागरिकांना आवाहन.
🛑वडकशिवालेतील जेष्ठ नागरिक बंडू शिंदे यांचे दुःखद निधन.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने आजरा येथील रहिवाशांना आवाहन केले आहे.‌ मुख्याधिकारी नगरपंचायत आजरा यांनी सन २०२३-२४ साठी नवीन सुधारीत वाढीव घरफाळा व पाणीपट्टी आकारणी बाबत वैयक्तिक नोटीसा दिल्या होत्या. सदर काढलेल्या नोटीसा जनतेस मान्य नसलेने सदर वाढीव घरफाळा रद्द करणेबाबत दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी नगरपंचायत कार्यालयावर विराट मोर्चा काढणेत आला होता.
सदर मोर्चास सामोरे जात मुख्याधिकारी नगरपंचायत आजरा यांनी वाढीव घरफाळा नोटीसा मागे घेत असून जो पर्यंत नगरपंचायतीत नवीन सदस्यांनी नियुक्ती होत नाही. तो पर्यंत जुन्या पध्दतीनेच घरफाळा व पाणीपट्टी जमा करून नगरपंचायतीस सहकार्य करावे असे सांगितले होते. यास अन्याय निवारण समिती सहमत आहे.
या निर्णयानुसार समितीतर्फे आवाहन करणेत येत आहे की, आजरा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील रहिवाशी यांनी आपला राहिलेला घरफाळा व पाणीपट्टी जुन्या आकारणीनुसार तात्काळ भरून नगरपंचायतीस सहकार्य करावे. असे समितीच्या वतीने प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे या प्रसिद्धी पत्रकावर परशुराम बामणे अध्यक्ष, सुधीर कुंभार उपाध्यक्ष
पांडुरंग सावरतकर सेक्रेटरी
विजय थोरवत सचिव, गौरव देशपांडे सह सेक्रेटरी, राजु विभुते सहसचिव सह रहिवासी यांच्या सह्या आहेत.

जेष्ठ नागरिक बंडू शिंदे यांचे दुःखद निधन.

आजरा.- प्रतिनिधी.‌

वडकशिवाले ता. आजरा येथील जेष्ठ नागरिक व वडकशिवाले पंचक्रोशी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित वडकशिवाले माजी चेअरमन बंडू दत्तु शिंदे वय वर्षे ६७ त्यांचे दि. १२ रोजी उपचारादरम्यान रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्याचे पश्चात पत्नी एक मुलगा, सुन विवाहित मुलगी नात नातवंडे असा परीवार आहे.
रक्षा विसर्जन रविवारी सकाळी ९ वा. वडकशिवाले येथे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.