लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडी आघाडीवर असून शाहु महाराजांना विजयी करण्यासाठी हात हे चिन्ह घराराघरात कार्यकर्त्यांनी पोहचवावे असे अवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले. आजरा येथील इंडिया आघाडीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आमदार श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यात तीन लाख मतदारांना शाहु महाराज निवडणूकीसाठी उभे असल्याचे सर्व्हेक्षणातून माहीती मिळाली आहे.मात्र त्यांच्यापर्यंत चिन्ह पोहचवण्याची आवश्यकता आहे.आज-यातील कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्याचप्रमाणे संपर्क कार्यालय सुरू करून जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. यावेळी काँ.संपत देसाई यांनी स्वागत करून प्रचाराची पार्श्वभूमी सांगितली. यावेळी मुकुंदराव देसाई, अंजना रेडेकर, उमेश आपटे, उदयराज पोवार, संभाजी पाटील, अभिषेक शिंपी, अशोक तर्डेकर, संजय सावंत,रशिद पठाण, राजेंद्र सावंत, युवराज पोवार, संजय तर्डेकर, कृष्णा सावंत, नौशाद बुढेखान, विजय गुरव, संकेत सावंत, रविंद्र भाटले, किरण आमणगी, संजय उत्तूरकर, विक्रम देसाई, किरण कांबळे, राजू देसाई, संजय येसादे आदी उपस्थित होते. राजू होलम यांनी आभार मानले.